[ Best ] Good Thoughts In Marathi On Life | जीवनावर सुविचार

0
680
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life - marathi suvichar - vb -सुविचार मराठी
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life

Good Thoughts In Marathi On Life – 
आयुष्य मराठी सुविचार – 

जीवन अजिबात अवघड नसतेच…! 
 जीवनावर मराठी सुविचार 

कधी पाणीच नसते नळाला…
तर कधी असून पाणी घोटभर देणारेच
कुणी नसते…!
कधी पगार झालेला नसतो…!
तर कधी झालेला पगार उरलेलाच नसतो…! 
कधी कमावलेला पगार खर्च कुणावर करायचा…?
हाच प्रश्न सुटलेला नसतो…!

कधी जागा नसते…!
कधी जागा असली तर त्यात पोकडी नसते…!
कधी जर जागा आणि पोकडी दोन्ही असली
तरी त्यात नात्याची उब नसते…!

कधी डब्यात भाजी आपली आवडती नसते…!
कधी आपल्याला भाजी आवडलीच तर…
करपलेलीच पोळी डब्यात असते…! आणि
जर का दोन्हीही गोष्टी मनासारख्या असल्या तरी…
शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंगच्या वासात आपली
इच्छा अडकलेली असते…!


कधी कोणी सोबत असूनही एकटेपणा असतोय…!
कधी कोणी सोबत नसतानाही उगाच 
प्रत्येक क्षण भरल्या – भारावल्या सारखा वाटतेय…!

Good Thoughts In Marathi On Life – 
आयुष्य मराठी सुविचार – 

कधी काही आवडते शब्द कानावर पडतात…

कधी नको ते शब्द कानावर आदळतात…!

कधी अपेक्षीत असलेल्या व्यक्तीकडून
नको ते अनपेक्षित अनुभव येतात…! 
तर कधी अनपेक्षित असलेल्या व्यक्तीकडून
नको ते अपेक्षीत अनुभव येतात…..!


कधी आपण वागायचे तरी कसे समजत नाही…!
कधी समोरचा का बर असा वागतोय…!
याचे उत्तर सापडत नाही….!


कधी कुणाला दोष द्यायचा समजत नाही…!
कधी कोणाचे आभार मानायचे हे ही उमजत नाही…!

कधी डोके टेकायला जागाच सापडत नाही…!
आणि कधी जर का जागा सापडलीच तर… 
नमस्कार करायची इच्छा होत नाही…!


कधी कुठे कठोरतेने वागायचे… आणि
कुठे नरमाईने वागायचे हेच उमजत नाही….!


कधी समोरचा व्यक्ती आपल्याला
विनाकारण हक्काचा वाटू लागतो…! 
तर कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क

आपल्याला नकोसा वाटू लागतो…!

Good Thoughts In Marathi On Life – 
आयुष्य मराठी सुविचार – 


कधी पैसा असल्यावर नात्यांची आवड होते…! आणि

नाती असली तर त्यांच्या मौज मज्जा च्या गरजा 
पूर्ण करता येत नाहीत म्हणून मन हिरमुसते…! 


यामध्ये आणखीन ५ – ६ गोष्टी वाढवल्या तर
मला सांगा यापेक्षा वेगळे आपण काय जीवन जगतो…? 


ताण घेतलाच तर तणाव होतो…!
आज निभावून घेतले म्हणून आनंद आणि उद्याच

काय म्हणून चिंता जीवन कठीण करते….!आपण वाहत्या नदी सारखे जगावे…

सतत वाहत राहावे…!

नेहमी या जीवनावर…. या जन्मावर….

आणि या जगण्यावर प्रेम करावे…!

 

Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - vb - vijay bhagat
झाडाला पाणी आणि 
नात्याला सुसंवाद 
मिळाल्यावरच ती टिकतात…!
नाहि तर ती तुटतातच.
एक मुळापासून आणि एक मनापासून
 
Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - vijay bhagat
 
फुलांचा सुगंध फक्त 
हवेच्याच दिशेने पसरतो…!
पण व्यक्तीचा चांगुलपणा 
प्रत्येक दिशेला पसरतो.
 
Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - suvichar on life
 
जीवनात मागें पाहिले तर अनुभव मिळेल
जीवनात पुढे पाहिले तर आशा मिळेल
इकडे तिकडे पाहिले तर सत्य मिळेल
आणि स्वत: मध्येच आत पाहिले तर…
आत्मविश्वास मिळेल.
 
suvichar on life- Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार
जगाची एक सवय आहे…
जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच 
 भेटनार आहे, नाहीतर दुरुनच 
नमस्कार आहे… म्हणुन
जीवनात पुढे बघून चालायचे 
आणि… मागे बघून शिकायचे.
 
Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - suvichar marathi
भविष्यात जर का राजा सारखे 
जगायचे असेल तर…!
आज संयम हा खुप कडवट असतो
पण… त्याचे फळ फार गोड असते.
 
Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - vb good thoughts
 
फ़क्त समाधान शोधा…
गरजा तरआयुष्यभर संपणार नाहीत…!
थोड्याशा तडजोडीने जर…
सुख मिळत असेल तर…
तडजोड करायला काय बिघडतेय…!
 
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life - marathi suvichar - vb -सुविचार मराठी -vijay bhagat- suvichar images

Good Thoughts In Marathi On Life – 
आयुष्य मराठी सुविचार – 

आयुष्याच्या चित्रपटाला Once More  नाही…
हव्या-हव्याशा वाटणारा क्षणाला  Download
ही करता येत नाही…!
नको-नकोश्या वाटणारा क्षणाला  Delete
ही करता येत नाही…!
कारण हा रोजचा तोच – तो असणारा 
Relity Show नाही… म्हणुन भरभरून
पुर्णपणे जगा कारण LIFE हा चित्रपट
पुन्हा लागणार नाही…!
 
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life - marathi suvichar - vb -सुविचार मराठी -vijay bhagat - suvichar images - life
 
काही लोक आयुर्वेदिक उपचार असतात…! 
म्हणजे … वागायला आणि बोलायला उत्तम …
पण इमर्जन्सीत कामाला येत नाहीत…!

तर काही लोक अलोपॅथीक उपचार असतात… 
म्हणजे… कामाला येतात, पण 
साईड इफेक्ट कसा काढतील सांगता येत नाही…!

बाकी सगळी मंडळी होमिओपॅथीक उपचार असतात…! 
म्हणजे… काही कामाची नसतात,
पण… सोबत असली की बरे वाटते…!
 
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life - marathi suvichar - vb -सुविचार मराठी - suvichar images
 
जगासाठी तुम्ही फक्त कोणी
एक व्यक्ती असाल…!
पण…! तुमच्यावर प्रेम करणार्‍याचे
संपूर्ण जगच तुमच्यात असते…!
 
[best ] good thoughts images - good thoughts in marathi on life - marathi suvichar - vb -सुविचार मराठी -happy suvichar - vijay bhagat -suvichar images
 
आयुष्यात फक्त बालपणीचाच काळ
सुखाचा असतो. कारण…
तो अहंकारापासून लांब असतो.
नंतर “आम्ही ही काही आहोत” हा भाव
एकदा जागा झाला की त्यानंतर
सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष.
आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण…
 
Good Thoughts In Marathi On Life - आयुष्य मराठी सुविचार - जीवन अजिबात अवघड नसतेच...! - जीवनावर मराठी सुविचार - good thinking

जीवनात काय करायचे…
हे ठरविण्यासाठी वेळ 
वाया नका घालवू नाहीतर…

तीच वेळ तुम्ही काय करायचे हे ठरवेल.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here