Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार | कर्माचा सिद्धांत

2
629
Good Thoughts In Marathi On Life , सुंदर विचार , कर्माचा सिद्धांत
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार | कर्माचा सिद्धांत

Good Thoughts In Marathi On Life,
सुंदर विचार – कर्माचा सिद्धांत

नमस्कार मित्रांनो,
हा विषय काही लोकांना पटणार नाही… पण ज्यांनी जग बघितले आहे…..
ज्यांनी अनुभवले आहे…. त्यांना नक्कीच पटेल.

जुनी माणसे म्हणत असे…. कुणाच्याही आत्म्याचा श्राप घेऊ नये. कुणाचे
मन दुखेल असे कार्य करूच नये. कुणालाही शारीरिक….. मानसिक…
किंवा आर्थिक रुपाने प्रताडीक करूं नये.

कुणाचीही हाय लावून घेऊ नये…. त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या
आयुष्यात भोगावे लागतात.

खूप कारणांनी मन दुखावते…. मनातून हाय निघते….

Good Thoughts In Marathi On Life,
सुंदर विचार – कर्माचा सिद्धांत

जसे की :-
1) शारिरीक….. मानसिक….. आर्थिक……
2) अपमानास्पद वागणुक करणे….
3) कुणाचे मन दुखावले असू शकते….
4) कुणावर अन्याय केला गेलेला असतो….
5) कुणाचे काही कारण नसतांना खोटेबोलून
सामाजिक बदनामी केलेली असते……
6) जर छळ केलेला असेल……
7) कुणाची हक्काची प्रॉपर्टी त्याला फसवून हडपली असेल…..
8) कुणाला अनिती करायला बळ दिल असेल……
9) शारिरीक दुखापत केलेली असेल……
10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल……
11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी
त्याच्याच पाठीत चाकू खुपसला असेल…..

त्रास देण्याचे हे कारण असोत अथवा कोणतेही दुसरे कारण असो….
पण हे नक्की लक्षात ठेवा… या गोष्टींचा समोरच्या माणसाला
खूप त्रास होत असतो…

तो प्रचंड दुःखी होतो….. त्याचे मनोबल कमकुवत होत असते…..
याने तो आत्महत्या ही करू शकतो….. किंवा तो मानुष प्रचंड
अवसादा मध्ये ही जाऊ शकतो….!

मुद्दामून त्रास देणाऱ्या माणसाला हे कळत नसेल… परंतु ज्या माणसाला
त्रास झालेला असतो, त्या माणसा कडुन काही चमत्कार तर होत नाही…
अथवा देव देखील शाप देत नाही…. अथवा काठीने मारत ही नाही….
परंतु त्या दुखावलेल्या माणसा कडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक
उर्जा शक्ती निघते आणि समोरच्या माणसामध्ये शोषली जाते…..!
मग समोरच्या माणसाला हाय लागते…. त्यालाच शाप असे म्हटले जाते.

मग ज्याने कोणी हा त्रास दिलेला असतो….. त्याचे ते कार्य यशस्वी होत नाही….
आणि जरी झाले…. तरी फार काळ ते टिकून नाही….! सतत हाती अपयश येणे….
घरात आजारपण येणे….. इतर ही काही घटना घडू शकतात….

आपण किती खरे आहोत आणि किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला
आणि आपल्या अंतरात्म्यालाच माहीत असते.

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड
याच जन्मात करावी लागते. मग तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आहात….
चांगल्या – वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह याच जन्मात परत करावाच लागतो.

माझ्या वाचनात आले आहे की…. महाभारतात राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या – शंभरही पुत्र
युध्दात मारले गेले. तेव्हा धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे…?

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा कोणताही मोठा पापकर्म केलेलाच नाही….
की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या – सर्वच पुत्रांचा मृत्यु मी आपल्या
डोळ्यांसमोर बघणार आणि त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी येणार…?

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजा धृतराष्ट्राला आपले पुर्व- जन्म बघण्याची दिव्य-दृष्टि दिली.
राजा धृतराष्ट्राने दिव्य- दृष्टिद्वारे बघितले की….. साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक
पारधी होता…. आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती….

आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले…. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक
पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगित होरपळून
मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक
जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.

कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच….
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे.

चांगले कर्म…. चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म….
वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते.
हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे…. आपले कर्म कसे पाहिजे….

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ॥
क्षणीक सुखासाठी अपुल्या….
कुणी होतो नितीभ्रष्ट ॥

मन चांगले ठेवा….
शेवटी हिशोब पैशाचा नाही….
तर कर्माचा होणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here