Good Thoughts In Marathi On Life | एक मानस शास्त्रीय सत्य

0
319
Good Thoughts In Marathi On Life - एक मानस शास्त्रीय सत्य

InGood Thoughts In Marathi On Life |
एक मानस शास्त्रीय सत्य

खुप गोड बोलणारी…. अति नम्रता दाखवणारी… पाया पडणारी….
अति स्तुती करणारी…. अति आदर – सत्कार करणारी माणसे अत्यंत
धोकादायक…. दांभिक…. आतल्या गाठीची…. लबाड…. बेरकी… संधिसाधू….
आणि विश्वासघातकी असतात.

तुमच्याच खांद्यावर हाथ ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र
ती रचत असतात.

याउलट जी माणसे तोंडावर रागाने… कडवट…. टीकात्मक…… जहरी…
फटकळ…. परंतु स्पष्ट बोलतात… त्यांचे अंतर्मन वरच्या प्रवृत्तींपेक्षा
नक्कीच चांगले असते.

विश्वासघात करणे… फसवणे…. त्यांच्या रक्तातच नसते. ती खरेच
मनमोकळी आणि विश्वासू असतात…..!

म्हणून आयुष्यात आपण बाकी काही शिको…. अथवा ना शिको…..
परंतु माणसे वाचायला नक्कीच शिकले पाहिजे…!

💙💚💛💜

खऱ्या माणसावर तितकाच विश्वास ठेवा….
जितका तुम्ही औषधांवर ठेवता.
थोडे कडू असतील परंतु तुमच्यासाठी
फायद्याचे असतील……!
💙💚💛💜

कुणापासून कितीही दूर व्हा
पण चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होत असतेच.
म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने
कमावलेले सर्वात मोठे धन आहे.
💙💚💛💜

जिद्दीच्या प्रवाशात
शांतता आणि संयम
खूप महत्वाचा असतो.
💙💚💛💜

काटा रुतल्या शिवाय
वाटा सापडत नाही….
हा यशाचा सिद्धांत आहे.
💙💚💛💜

सहकार्य आणि सत्कर्म
आवाज न करता केले तर
त्यातून निर्माण होणारे
माधुर्य आणि समाधान हे
अतुलनीय असते…..!
💙💚💛💜

माणसा जवळ धन नसले तरी चालेल….
परंतु प्रेमाने काठोकाठ भरलेले एक मन
नक्कीच असावे…!
💙💚💛💜

Good Thoughts In Marathi On Life |
एक मानस शास्त्रीय सत्य

आपण जरी भगवंताला घाबरले नाही
तरी ही चालेल…. परंतु
आपण आपल्या ” कर्मा ” पासून
नेहमी घाबरून रहा….! कारण
शिव्या अथवा ओव्या….
शाप अथवा आशिर्वाद…..
निंदा अथवा स्तुती….
सुख अथवा दुःख….
यापैकी जे ही आपण दुसऱ्याला देवू….
ते न चुकता आपल्याकडे परत येणार….!
हा चैतन्यशक्तीचा स्वभावधर्म म्हणजेच….
निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाला
भगवंत पण चुकलेला नाही…..!

माणसाने नेहमी
वेळेसोबत चालावे….
काळाप्रमाणे बदलावे….
परंतु आपल्या संस्कारांना
शेवटपर्यंत आपल्याबरोबर ठेवावे….

या नियमाला भगवंत ही चुकलेला नाही |
Sunder vichar Status Suvichar Status |
चांगले विचार | सुविचार

हे विचार ही वाचा :-

Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here