Good Thoughts In Marathi-on-life | नाती जपा | मराठी सुविचार

0
973
Good Thoughts In Marathi-on-life | नाती जपा | मराठी सुविचार

Good Thoughts In Marathi-on-life | नाती जपा | मराठी सुविचार

माझ्या वाचनात आलेली छान गोष्ट. इंग्रजीतून हा मराठी अनुवाद…
  
जपानमध्ये घडलेली ही अगदी खरीखुरी घटना आहे. तेथे एका माणसाने एकदा आपल्या घराचे 
नूतनीकरण करायला सुरुवात केली. तो आपल्या घराच्या भिंती तोडत होता…! 
त्याचे घर लाकडाचे बनलेले होते. 
 

असे म्हणतात कि जापानी घराच्या भिंती लाकडी असतात. आणि लाकडाच्या घरात सहसा 
पोकळी राहतेच.
 
असेच लाकडी घराच्या भिंती तोडत असतांना त्या घरमालकाच्या लक्षात आले कि आतमध्ये 
एक पाल अडकलेली आहे, जेव्हा त्याने नवीन घर बनविले होते तेव्हा भिंती मध्ये खिळा 
ठोकतांना खिला तिच्या एका पायात चिणला गेला आहे. 
 
हा दृश्य पाहून तो थबकलाच… पालीची अवस्था पाहून त्याला त्या पालीची खूप दया आली 
आणि तसेच त्याचे कुतुहलही जागृत झाले की मी हे घर जवळपास ५ वर्षा अगोदर बनविला आहे… 
त्यावेळी हा खिळा ठोकला गेला होता. मग हि पाल पाच वर्षा पासून या अवस्थेत जिवंत कशी 
राहिली असेल…? एकतर इथे पूर्ण अंधार आहे…! वरून पायात खिळा चीनला आहे त्यामुळे हि 
हालचाल हि करू शकत नाही…! हि जिवंत कशी आहे…? हे कसे शक्य आहे. 
सगळे काम थांबवू तो तिथेच बसला… 
त्याच्या डोक्यात खूप प्रश्न निर्माण व्हायला लागले… शेवटी त्याने ठरविले कि आपण ह्या पालीवर 
लक्ष ठेवू कि ते आपले पोट कसे भरते…!     

Good Thoughts In Marathi-on-life | नाती जपा | मराठी सुविचार

 
पाहता पाहता काही वेळाने त्याच्या लक्षात आले कि एक दुसरी पाल आली आहे, तिच्या तोंडात 
अन्न आहे. ती पाल आपल्या तोंडातील अन्न हळू हळू ती खिळा चिणलेल्या पालीला ते भरवत आहे.  
 हे पाहून तो माणुस एकदमच अवाक झाला…! आणि गहिवरला हो…!

तुम्हीच करा कल्पना १,२ नाही तर सतत ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी
सेवा करते, तेही आशा न सोडून  देता…!
 
एक पाली सारखा उपेक्षणीय प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता…
अशा प्रकारे त्याची काळजी घेतो, 
तर आपण माणसे यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.

तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला…. जवळच्या व्यक्तीला…. नेहमी आधार द्या. 
जेंव्हा त्या व्यक्तीला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जग
असू शकता.  नाते, विश्वास किंवा गोष्ट कोणतीही असो…. तुटण्यासाठी फक्त एका क्षणाचे दूर्लक्ष 
पुरेसे असते. परंतु जोडण्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावावे लागते…!
 

 

नाती-जपा-मराठी सुविचार-Good-Thoughts-In-Marathi-sunder vichar-marathi suvichar-vb
नाती-जपा-मराठी सुविचार-Good-Thoughts-In-Marathi
 नाती जपण्यात खूप मजा आहे…!
आयुष्यचे बंध विणण्यात मजा आहे.
जुळलेले सूर गाण्यात खूप मजा आहे…!
येतांना जरी एकटे असलो तरी… 
सर्वांचे होऊन जाण्यात खूप मजा आहे.
 
 नशीब दुसरे कुणीही लिहित नसते…
आपले नशीब आपल्याच हाती असते.
येताना काही आणायचेही नसते…
तसेच जातांना काही न्यायचेही नसते.
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचे असते.

 

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचे असते.

Good Thoughts In Marathi-on-life | नाती जपा | मराठी सुविचार

 तुम्ही आहात सावरायला म्हणुन पडायला आवडते
तुम्हीआहात हसवायला म्हणुन रडायला आवडते
आहात तुम्ही समजवायला म्हणुन चुकायला आवडते.

 

माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे मित्र 

आहेत म्हणुन मला जगायला आवडते.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here