Good Thoughts In Marathi On Life I
सुंदर विचार | Suvichar
काही वर्षा पूर्वी मी शाळेत खेळाच्या मैदानात सुरु असलेल्या एक स्थानिक
फुटबॉल सामना बघायला गेलो… सामना सुरु झालेला होता.
एका ठिकाणी जागा बघून आरामात बसलो आणि फुटबॉल सामन्याचा आनंद घेत होतो.
माझ्या बाजूला बसलेल्या एका मुलाला रंगलेल्या सामना चा स्कोर विचारला असता
मुलाने खूप आनंदाने सांगितले की…. त्यांची टीम आमच्या टीम पेक्षा ३-० ने समोर आहे.
मी मुलाला म्हणालो… खरोखर….!
म्हणजे मला त्या मुलाला असे म्हणायचे होते की… तुला निराशा वाटत नाही.
” निराशा…..!” अगदी आश्चर्याने तो मुलगा माझ्याकडे बघायला लागला.
कशाला मी निराश होणार….! आता पर्यंत खेळ समाप्त होण्याची शेवटची शिट्टी
पंचांनी वाजवलेली नाही. माझा माझ्या संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर
पूर्ण विश्वास आहे. आम्ही नक्कीच जिंकणार.
काही वेळात खरोखरच तसेच घडले….. खेळ त्या मुलाच्या संघाने ५-४ च्या
आघाडीने तो सामना जिंकला. त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे
पाहत हात हलवला आणि तो निघून गेला.
मी एकदम आश्चर्याने बघतच राहिलो…. इतका आत्मविश्वास…. इतका ठाम विश्वास….!
मी घरी परत आलो रात्र झाली… पण त्या मुलाचा प्रश्न काही माझ्या डोक्यातून जाईना…
सतत डोक्यातच फिरत होता… कशाला मी निराश होणार….! आता पर्यंत खेळ समाप्त
होण्याची शेवटची शिट्टी पंचांनी वाजवलेली नाही.
Good Thoughts In Marathi On Life I
सुंदर विचार | Suvichar
मित्रांनो….
आपले जीवन हे सुद्धा एका खेळासारखे आहे…… शेवट पर्यंत धैर्याने सामोर जा….!
आयुष्य अजून संपलेले नसतांना निराश का व्हायचे….?
जो पर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही….. तो पर्यंत आशा का सोडायची
खरी गोष्ट अशी आहे की खूप लोक खेळ संपण्याची शेवटची शिट्टी स्वतःच
वाजवून टाकतात.
मित्रांनो….
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काहीच अशक्य नाही….! आणि तुमच्यासाठी कधीही
खूप उशीर झालेला नसतो.
अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.