एकदा शांत मनाने वाचा,
Good Thoughts In Marathi On Life,
तुमच्या जीवनाचा आलेख तुम्हीच बनवा | सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो…. 🙏
दर दिवशी एक ना एक बातमी आपल्या ऐकण्यात…. बघण्यात…. वृत्तपत्रात…..
अथवा टीव्हीवर ऐकायला येतेच की आज याचे हृदयविकाराणे दुःखद निधन
झाले आहे….
एखादा अपघात झाला आहे…. तिथे पण दुःखद निधनच…. आणि त्यात बातमी राहते…
याचे वय २६ ते ३२ वर्ष…! कुणाचे काही महिन्या अगोदरच लग्न झाले आहे…..
जुळले आहे… कुणाला वर्ष – चार वर्षाचे बाळ आहे….! तर कुणाला पोटात आहे…
असे ऐकून… वाचून… बघून मन फार दुखते…..
आपणच विचार करा… ही वय आहे का जग सोडून जाण्याची….?
जर चांगल्या प्रकारे विचार केला तर या घटनेला कारणीभूत आहे…
आजची जीवनशैली……!
किती तणाव…. नेहमी जिंकण्यासाठी स्पर्धा करणे… लहान लहान गोष्टीत
दुखी होणे…
तो माझ्या समोर गेला…. मी हरलो आहे…. असा विचार करून ताण आणणे…..
स्वतःलाच एक प्रश्न विचारले पाहिजे की…. आपण नक्की कुणासाठी
जगत आहोत…..? स्वतःसाठी जगतो….? की पैशासाठी जगतो…?
आयुष्य क्षणभंगुर झाले आहे….! आता तर खरोखरच जगायची वेळ आली आहे…..
आपल्या जीवनावर प्रेम करायची वेळ आली आहे….. तर मग चला… आपल्या
जीवनात काहीतरी सकारात्मक बदल करूया….
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
१] नेहमी चिडचिड करून….
उगाच आरडा ओरडा करून कुणाचे तरी
भले झाले आहे का….?
ना आपले भले होते…. ना समोरच्याचे….. तर मग आजपासून चिडचिडपणाला
दुरूनच रामराम ठोका आणि किती म्हणजे कितीही तणाव…. दुखः जरी असला
तरी ही स्वतःच स्वतःला समजवावे.
सगळे काही होणार…. मी आहे ना मग सगळे होणारच…! अगदी शांत व्हा…
मस्त मोठा श्वास घ्या आणि हसत हसत आपल्या कामाची सुरुवात करा….!
२] आपली तुलना दुसऱ्या बरोबर कधी करूच नका.
मी कशा दिसत आहे…? तूझी उंची चांगली आहे…. मलाच देवाने असा
बुटका का बनविला असेल…? तू खूप हुशार आहेस…. माझे तर डोकं
चालतच नाही….! अशा कसल्याही तक्रारी करणे बंद करा.
एकदम बंदच.
तुम्ही जगात एकमेव आहात…. तुमची दुसरी कॉपी नाही आहे…! जरी तुमचे
कान लहान असेल तरीही तुम्हाला तुमच्या मानाने सुंदर असलेल्या कानावाल्या
इतकेच ऐकायला येते… हे लक्षात ठेवा.
जरी तुमची नाक लहान असेल… तरीही तुम्ही श्वास तर लांब नाक असलेल्या
माणसा सारखेच घेत आहात ना…?
तो गोरा आहे…. मी खूप सावळा आहे….! आता तुम्ही विचार करा…. श्री कृष्ण हि
सावळेच होते कि…. तरी पण ते देव आहेत…. आपल्यासाठी ते महान आहेत….
तुम्ही साध्या रंग… रूपावरून खचुन जाऊ नका….!
जरी तुम्ही लहान असाल तरीही मनाने तर मोठेच आहात ना…..! तर मग
आज पासून कुणाकडेही पाहून जळायचे नाही…. स्वतःला कमी समजायचे नाही.
तुम्ही स्वतः एक नशीबवान व्यक्ती आहात…. जे या सुंदर जगाचा एक भाग आहात…!
३] टेन्शन घ्यायचे तर नाहीच नाही….
परंतु कुणालाही टेन्सन मुळीच द्यायचे नाही….!
मित्रांनो….
चिंता केल्याने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत हे त्रिकाल सत्य आहे. उगाचच
कसे होणार…. आता मी काय करू असे म्हणत स्वतःची नखे खाने कमी का..
बंदच करा….!
जिथे संकट असतात तिथे उपायही असतोच…. केवळ आपल्या चिंतेने तो
अजूनच धुसर होत जातो…! त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या.
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
सगळ काही व्यवस्थीत होईल… आणि जर का तुमच्या हातात काहीही नसेल तर…
जिथे सगळा त्याच्या हातात आहे तर थोडी फार श्रद्धा त्याच्यावर हि ठेवा…
पण फक्त श्रद्धाच ठेवा…. अंधश्रद्धा नको. कारण मंदिराच्या दानपेटीत शंभर रुपये
टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्या जीवाला दिलेला दहा रुपयाचा बिस्कीट
पाकीट हि तुम्हाला मानसिक शांतता देवू शकतो…!
आता काय ते तुमचे तुम्हीच ठरवा…!
४] खूप जण तक्रार करतात…. ते बंद करा….!
तक्रार करून कशाला स्वतः चा आणि दुसऱ्याचा देखील दिवस खराब करायचा….!
शेजारी बघा… त्याने हे घेतले…. त्याने असे केले…. त्याने तसे केले…. तो असा करतो….
तो तसा करतो…. असे म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाची हिंमत खचवू नका….!
सगळेच पैसा कमावितात…. अगदी कंपनी चा मालक आणि रोडाच्या कडेला बसलेला
भिकारी ही…..! परंतु त्यापेक्षा तुम्ही नाती कमवा…. प्रेम कमवा….. कारण सध्या
त्याची जास्त गरज आहे.
जरी तुम्ही पैशाने श्रीमंत नसाल…. पण समाधानी तर नक्की बना….. मग बघा….
किती मस्त वाटते…..!
आपण आपल्या घरासाठी ढाल म्हणून उभे राहील पाहिजे.
जरी आपल्या घरात रंगीबेरंगी पडदे नसले तरी चालेल…. परंतु आपुलकी……
जिव्हाळ्याने आपले घर भरलेले असावे….!
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
५] जर मनात कुणाबद्दल राग असेल ना….
तर तो तसाच खदखदत ठेवू नका….!
त्याने तुम्ही स्वतःला कमजोर बनवू नका… तर सरळ त्या व्यक्ती जा समोर आणि
एकदाच सगळा राग…. त्रास…. बोलून टाका. त्याने तुमच्या मनाचा भार कमी होईल
आणि समोरच्या व्यक्तीलाही समजेल की…. नक्की काय चालले आहे तुमच्या मनात…..
आणि जर काही गैरसमज असेल तर तो ही दूर होईल…. शक्यतोवर प्रश्न बोलूनच
सोडवावेत…..!
आणि समजा जर असे करणे तुम्हाला शक्य नाही…. तर सरळ मोठा पेपर घ्या.
त्या माणसाचे नाव मधोमध लिहा आणि जी काही धगधग आहे ती त्या पेपरवर
उतरवून टाका….! आणि नंतर त्या पेपराला सरळ फाडून टाका…! आणि
नव्याने सुरुवात करा…! व त्या माणसाकडे तुम्ही आता नव्याने बघायला
सुरुवात करा…..! मग पहा…. तुम्हालाच चांगले वाटणार…..!
६] समोरच्याचे म्हणने शांतपणे ऐकून घ्या…..
उगीच लहान – लहान गोष्टींसाठी गैरसमज टाळा…. उलट लहान लहान गोष्टीत
आनंद अनुभवायला करायला शिका….!
जर कुणी आपल्या बद्दल वाईट बोलते…. तर बोलू द्या….! उगीच आकांड तांडव
करून त्या माणसा सोबत भांडू नका….! एक तर तो माणूस तुमच्या सारखा बनूच
शकत नाही…. म्हणून तसे बोलतो…. अथवा तुमची प्रगती होते आहे आणि तो
जळत आहे. म्हणून तो मनाचा समाधान होण्यासाठी वाईट बोलत आहे….!
जर तुम्ही प्रतिक्रिया दिलात तर…. त्या माणसाचा विजय आहे. म्हणून तसे नका वागू….
तुम्ही तुमचे काम करत राहा…..! तुमचा दुर्लक्ष पणा त्या माणसाचे बोलणे हळू हळू
नक्की कमी करेल…! फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका….!
७] जीवन खूप लहान होत चालले आहे….
उगाचच आपल्या अहंकार…. तणाव….
स्पर्धा….. यामध्ये गुंतू नका….!
जिथे उद्याचा भरवसा नाही आहे…. तिथे तुमच्या जीवन भराचा पैसा…. प्रतिष्ठा….
काय कामाला येणार….?
तर सगळे सोडा आणि हसत हसत जगा…..! काम करायचेच आहे……
परंतु स्पर्धा सोडा…..! जे आहे त्यात समाधानी राहायला शिका….!
लहान से जीवन आपले… प्रत्येक दिवस आनंदी बनवा….! इतरांचे अनुकरण सोडा
आणि अद्वितीय बना…!
तुमचे जीवन तुम्हीच खुलवायचे…..! तर उठा आणि हसत हसत जगा…!
जे आहे ते सुंदरच आहे…. आणि तुम्हीच ते अजून सुंदर बनवणार आहात…..!
बघा पटले तर घ्या काही नाहीतर द्या सोडून…!
निर्णय तुमच्यावर सोडला आहे…. रोज एका नव्या आशेने उठा…. माझ्या कडून काल
ज्या चुका झाल्या आहेत त्या आज पुन्हा नाही करायच्या…. आजचा दिवस माझा आहे…..!
अशा आशेने दिवसाची सुरुवात करा. काल जे झाले ते झाले…. नवीन दिवस….!
नवीन आशा…..! दररोज मस्त गाणी गा…. मस्त गुण गुणा….!
जसे तुम्हाला आवडेल तसेच वागा….. दुसरे लोक काय म्हणतात त्यापेक्षा
तुम्हाला काय वाटते… तेच करा…. लोक जे काही म्हणतील ते त्यांना म्हणू द्या
कारण त्यांचे कामच ते आहे आणि ते त्यांना प्रामाणिकपणे करू द्या….!
म्हणून आनंदी राहा…. आणि नशीबवान बना…..!
तुमच्या जीवनाचा आलेख तुम्हीच बनवा….!
आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजुन खुलवा….!
जीवनही ही तुमचेच आणि निर्णय हि तुमचाच….!
[…] Thoughts In Marathi On Life ( सुंदर विचार […]