Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या

0
511
Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या
Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या

माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या | सुंदर विचार 
Good Thoughts In Marathi On Life

ग्रुप वर एक मॅसेज आला की अमुक बाई चे दहा दिवस आजारी राहून
दु:खद निधन झाले.

महिना – दीड महिन्या अगोदरच तीने आपला पन्नासवा वाढदिवस
साजरा केला होता.

तीन महिन्या नंतर सहजच तिच्या नवऱ्याला फोन केला… या अगोदर
एक – दोनदा फोन करण्याचा विचार आला होता. पण मनात विचार
येत होते की… त्या माणसाचा पूर्ण संसार विखरून पडलेला असेल…

नवऱ्याची फील्ड वर जायची नौकरी होती. दररोज सकाळी निघायचा
आणि रात्रीलाही यायला उशीर होत असे.

आज पर्यंत हीच सगळे बघत होती… घर सांभाळणे… मुलांचे शिक्षण….
सासू-सासरे… आले गेले पाहुणे…… सासू सासऱ्याचे आजारपण….
सगळी जवाबदारी हीच पार पाडायची.

कधी – कधी म्हणत असे की.. घर ही आपलेच.. माणसे ही आपलीच…
संसार ही आपलाच असला तरी…… कधीतरी या सगळ्यांचे आपुलकीचे
दोन शब्द मिळावे…… शाबासकी मिळावी… असे वाटतेच ना……
इतके कसे गृहीत धरू शकतात आपल्याला…….?

आज ही फोन लावतांना मनात आले…… बिचारा पूर्णतः गांगरून गेला असेल…
नव्याने आलेली घराची जबाबदारी… म्हातारे आईवडील…
ह्या वयातला एकटेपणा… कसे जमवून घेत असेल…?

शेवटी फोन लावला… बराच वेळ फोन वाजून थांबला…
उगाच मन चुटपूटले…

जवळपास एका तासानंतर त्यानेच फोन केला… मी फोन उचलला तसाच तो
म्हणाला… माफ करा आपला फोन नाही उचलू शकलो. सध्या संध्याकाळी
ब्याडमिंटन खेळायला पार्क मध्ये जातो. नवीन – नवीन मित्र भेटतात……
वेळ चांगला जातो. नांगपूरातच बदली करून घेतली आहे.

मी म्हणालो छान आहे. नंतर विचारलो… घरी सगळे काही ठीक आहे…?
त्यावर तो सांगायला लागला… स्वयंपाकासाठी घरी बाई ठेवली आहे.
तिलाच थोडे जास्त पैसे देतो… म्हणून ती भाजीचा आणि किराणा सामानही
आणते.

आईबाबांसाठी पूर्णवेळ काळजी घेण्यासाठी एक दुसरी बाई ठेवली आहे
होत आहे मॅनेज… तो सतत बोलत राहिला..
करायलाच पहिजे. जगाची रीत आहे… इत्यादि..

मी जसेतसे पुढची दोन वाक्य बोलून फोन ठेवला.
डोळे गच्च गच्च भरून आले…

डोळ्यासमोरून ती जाइच ना….

एकदा सासऱ्याला थोडे बरे वाटत नाही म्हणून ती राखी ला
माहेरला न जाणारी….

कधीतरी शाबासकी मिळावी असे म्हणणारी ती

मला आता तिला सांगावेसे वाटत आहे…
बाई गं…
कुणाचेच काही अडत नसते गं..

हे सगळे फक्त आपल्या मनाचे खेळ आहेत..
कदाचित आपणच आपली काढलेली समजूत म्हण..
पाहीजे तर..

That’s the problem with
putting others first…….
You have taught them
You come second…….!

वास्तव एकच…. ती गेल्यानंतर दोन कामवाल्या बायका अधिक ठेवल्या.
घर मार्गी लागले… आपणच आपला मान आणि आपली किंमत करत
नाही… खरे आहे ना…?

मग जीवनाचा आनंद घ्या. उगाच माझ्याशिवाय कोणी करत नाही…
याच्यातून बाहेर निघा. महत्त्वाचे म्हणजे स्वतः साठी वेळ काढा…!

माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या | सुंदर विचार 
Good Thoughts In Marathi On Life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here