Good Thoughts In Marathi | Suvichar | नाती | सुंदर विचार

5
852
Good Thoughts In Marathi - Suvichar - नाती - सुंदर विचार - marathi suvichar

Good Thoughts In Marathi | Suvichar,
नाती | सुंदर विचार

मुलगी लग्न झाल्यावर सासरी जात असतांना
आपल्याला आपली मुलगी मुळीच परकी
वाटत नाही… पण जेंव्हा काही दिवासांनी
तीच मुलगी आपल्या माहेरी आल्यावर हाथ
तोंड धुतल्यानंतर आपल्या घरातील टॉवेल न घेता
मुलगी आपल्या बॅग मधुन काढुन छोट्याशा
रुमालाने तोंड पुसते…
तेव्हा ती खूप परकी वाटते.

पाणी पेल्यावर आपल्या हातातील ग्लास ठेवायला
जेंव्हा ती किचन च्या दारातूनच जागा शोधते…
तेंव्हा ती खुप परकी वाटते….

दमुन बसलेली असते…
त्यावेळीती विचारते पंखा लावू का…?
तेंव्हा ती खुप परकी वाटते….

जेवायला बसल्यावर
सगळे जेवण समोर असतांनाही
ती साधे भांड्याचे झाकणही उघडून
पाहत नाही…
त्या वेळी ती खुप परकी वाटते….

परत आपल्या सासरी जातांना
तिला विचारतात आता कधी येशील गं…?
तेंव्हा ती उत्तर देते, बघीन…!
आता काय माहित, कधी येणे होते ते…..
तेंव्हा ती खुप परकी वाटते….

गाडीत बसल्यावर खिडकी कडे तोंड करून
पाणावलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न करते…
तेंव्हा मात्र…सगळा परकेपणा नाहीसा होतो…

हा प्रेमाचा,आपुलकीचा,मायेचा खजिना त्याच्याच
नशिबात असतो….जो मुलगी झाल्याने
दु:खी न होता…आनंदाने गर्वाने फुलून जातो …

मुलगी ओझे नसून आयुष्यातली हिरवळ आहे..
तिला फुलू द्या…तिला बहरू द्या…..
तिला शिकू द्या…

Good Thoughts In Marathi | Suvichar | नाती | सुंदर विचार

सगळी नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी
गोडच असावीत असे मुळीच नाही.
ती तशी गोड मिट्ट असायला नकोच.
कारण… ती मग गुलाबजाम सारखीच
महाग आणि मर्यादितच असणार.

खरे तर आपली नाती ठेल्यावरच्या
पाणीपुरी सारखी असावीत
अगदी साधी पण हवी हवीशी वाटणारी.
कधीही कुठेही हाक दिली तर
क्षणाचाही विलंब न करता धावत येणारी.

नाती कडक चहासारखी असावीत….
एक घुट मारला की डोके आणि मन
ताजे करुन देणारी.

नाती साध्या वरण भातासारखी असावीत…..
अहंकाराचा गरम मसाला टाकलेल्या
मसाले वांगी सारखी तिखट आणि जळजळीत
असू नयेत. मसाले वांगी सोबत जेवतांना
मजा खूप येतो. पण दुसऱ्या दिवशी
मसाले वांगी आपला प्रताप दाखवितो.

नाती पुरणापोळी सारखीही असु नयेत…
जी पचायला खुप जड असतात.
नाती पॉपकॉर्न सारखी हलकी असावीत
आणखी आणखी फुलत जाणारी.

सीताफळा सारखी नाती तर मुळीच असु नयेत
ज्यामध्ये समज कमी आणि गैरसमज जास्त असते.
भले ती एकवेळ फणसासारखी असतील तरी चालेल.
दिसायला वरुन काटेरी पण… आतून मस्त रसाळ.

आयुष्यात कडु नाती ही असावीत
पण कारल्या इतकी कडु मुळीच असू नयेत.
ती असावी मेथीच्या भाजी इतकी कडवट
कारण… त्यांचा कडवटपणाही
जीभेला चव आणणारा असतो.

नाती श्रीखंडा सारखी
उच्च श्रेणीची नसली
तरी चालेल पण…
ताका सारखी शिणवटा
दूर करणारी नक्की असावीत.

एखादे नाते
कैरीसारखे आंबट असेल
तरी चालेल पण….
त्याचा गोड मुरब्बा आपल्याला
मात्र करता आले पाहिजे.

स्वतः माघार घेऊन
कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून… आजवर खूप नाती
सांभाळून माणसे कमावली…
फक्त हिच आमची श्रीमंती…

जर का तुम्हाला खरोखर
नाते सांभाळायचे असेल तर…
समोरील माणसाची
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी …
आणि जर का तुम्हाला
नाते टिकवावयाचे असेल तर…
नको तिथे समोरील माणसाची
चुका काढण्याची सवय नसावी
म्हणजे झाले.

आपली शक्ती आणि आपण कमावलेला पैसा
हे आपल्या जीवनाचे फळ आहे. पण…!
आपले कुटुंब आणि आपल्यावरील
मित्र प्रेम हे आपल्या जीवनाचे मूळ आहे.

आपल्या पाठीशी किती जण आहेत
हे मोजण्यापेक्षा…
आपण किती जणांच्या पाठीशी आहोत…
याला महत्त्व जास्त आहे.

आपल्यावर एखादे संकट आले की
घाबरायचे नाही. आपण समजायचे
त्या संकटाबरोबर एखादी
छान संधी पण आली आहे.
कारण संकट हे कधीच
संधी शिवाय एकटा प्रवास करीत नाही.

लक्षात ठेवा…
संकट हे संधीचा राखणदार असते.
फक्त संकटावर मात करा, मग…
संधी फक्त तुमचीच आहे.

लक्षात ठेवा वडाचे झाड
हे कधीच पडत नाही, कारण…..
ते जेवढे वर वर वाढते तेवढेच
ते जमिनी खालीही पसरते….
जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल
तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत ही वाढवा.

आयुष्यात नेहमी सुई बनून रहा.
कधीही कैची बनून राहू नका.
कारण…
सुई नेहमी दोन तुकड्यांना जोडते.
आणि कैची एकाचे दोन तुकडे करते.

धडा तर
लहान मुलांकडून घेतला पाहिजे…
जे आपलाच मार खाऊन
परत आपल्यालाच बिलगतात…!

नाती जपत चला. कारण…
आज आपण एवढे एकटे पडलोत की…
कुणी आपली फोटो काढणारा पण नाही…
स्वतः आपली सेल्फी काढावी लागते…
ज्याला आपण फॅशन समजतो.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here