स्वतःच शिट्टी वाजवून खेळाला थांबवू नका
Good Thoughts In Marathi |
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
काही वर्षा पूर्वी मी शाळेत खेळाच्या मैदानात सुरु असलेला
एक स्थानिक फुटबॉल सामना बघायला गेलो…
सामना सुरु झालेला होता.
एका ठिकाणी जागा बघून आरामात बसलो आणि फुटबॉल सामन्याचा
आनंद घेत होतो.
माझ्या बाजूला बसलेल्या एका मुलाला रंगलेल्या सामना चा स्कोर विचारला
असता, मुलाने खूप आनंदाने सांगितले की…. त्यांची टीम आमच्या टीम पेक्षा
३-० ने समोर आहे. मी मुलाला म्हणालो… खरोखर….!
म्हणजे मला त्या मुलाला असे म्हणायचे होते की… तुला निराशा वाटत नाही.
” निराशा…..!” अगदी आश्चर्याने तो मुलगा माझ्याकडे बघायला लागला.
कशाला मी निराश होणार….! आता पर्यंत खेळ समाप्त होण्याची शेवटची
शिट्टी पंचांनी वाजवलेली नाही.
माझा माझ्या संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे.
आम्ही नक्कीच जिंकणार.
काही वेळात खरोखरच तसेच घडले….. खेळ त्या मुलाच्या संघाने
५-४ च्या आघाडीने तो सामना जिंकला. त्याने एका स्मित हास्यासह
सावकाश माझ्याकडे पाहत हात हलवला आणि तो निघून गेला.
मी एकदम आश्चर्याने बघतच राहिलो…. इतका आत्मविश्वास….
इतका ठाम विश्वास….!
मी घरी परत आलो रात्र झाली… पण त्या मुलाचा प्रश्न काही माझ्या
डोक्यातून जाईना… सतत डोक्यातच फिरत होता…
कशाला मी निराश होणार….! आता पर्यंत खेळ समाप्त होण्याची
शेवटची शिट्टी पंचांनी वाजवलेली नाही.
Good Thoughts In Marathi |
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
मित्रांनो….
आपले जीवन हे सुद्धा एका खेळासारखे आहे……
शेवट पर्यंत धैर्याने सामोर जा….!
आयुष्य अजून संपलेले नसतांना निराश का व्हायचे….?
जो पर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही…..
तो पर्यंत आशा का सोडायची
खरी गोष्ट अशी आहे की खूप लोक खेळ संपण्याची
शेवटची शिट्टी स्वतःच वाजवून टाकतात.
मित्रांनो….
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काहीच अशक्य नाही….!
आणि तुमच्यासाठी कधीही
खूप उशीर झालेला नसतो.
अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.
स्वतःच शिट्टी वाजवून खेळाला थांबवू नका.
स्वतःच शिट्टी वाजवून खेळाला थांबवू नका | Sunder Vichar
Marathi Motivational video | Good Thoughts In marathi on life
हे ही वाचायला आवडेल :-
50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी
Good Thoughts In Marathi |
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्यानेच
चालायचा असतो. त्यामुळे लोकांचा
विचार करणे सोडून द्या.
*********
Good Thoughts In Marathi
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
मनापासून केलेली काळजी मनातील
दुःखाचा बराचसा भार हलका करून
जात असते.
*********
अती विचारामुळे आपण आपल्या
आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण
करतो. ज्या अस्तित्वातच नसतात.
*********
रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या
कष्टाचे नाही… तर स्वतःच्या
कष्टाचे पैसे खिशात असतील.
*********
निरागसता इतकी असावी की
चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी.
*********
लोक म्हणतात नाते हे विश्वासावर
टिकते. पण हे खरे नाही. नाते हे
समोरच्याला टिकवायचे असेल
तरच टिकते…..!
*********
जर आपण साठ वर्ष वयाचे एकटेच असाल
तर साठीचेच असता. साठी चे दोन मित्र एकत्र
आले तर ते तीस चे होतात. आणि समजा तिघे
मित्र जमले तर नक्की विशीचे होतात. आणि
चुकून जर साठ चे सहा जण एकत्र आले तर
शाळेच्या बालपणासारखा दंगा सुरु झालाच
म्हणून समजा.
*********
एखाद्या व्यक्तीला समजून घेता
नाही आले तरी ठीक आहे.
नका समजून घेऊ… पण त्या
व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून
दुसर्या कोणाला उलट – सुलट
सांगत ही फिरू नका….
*********
काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे
जगत असतात. तर काही दुसऱ्यांच्या
मनाचा विचार करून जगत असतात.
आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते…
जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून
जगत असतात.
*********
वाहन केव्हाही वळवता येते. पण
वळण आल्याशिवाय ते वळवू नये.
निर्णयाचे ही असेच असते. निर्णय
केव्हाही घेता येतो.. पण वेळ
आल्याशिवाय तो घेऊ नये.
*********
Good Thoughts In Marathi
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच
आणि निस्वार्थ पणाने कर्म करणे
याचे नाव परमार्थ.
*********
झोप आली तर सगळे विसरायला लावते
आणि नाही आली तर खूप काही
आठवायला लावते.
*********
आपल्याला चटके देणारे काही दिवे
तेच असतात, ज्यांना आपण
वाऱ्यामुळे वाचवलेले असते.
*********
Good Thoughts In Marathi |
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
मनाने जवळ असलेली माणसे
फक्त अंतराने दूर असतात.
जाईल तिथे आकाशातील
सूर्याप्रमाणे नेहमी बरोबर असतात.
*********
नात्यांना जोडायला प्रेमाची गरज
भासते. माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते. प्रत्येकाच्या
जीवनात वेगवेगळी माणसे येतात
पण माणसे भेटायला मात्र नशीबच लागते.
*********
मित्र नावाची ही दैवी देणगी
जीवापाड जपून ठेवा. कारण
जीवनातील अर्धा गोडवा ह्या
मित्रांच्या मुळेच असतो.
*********
आयुष्य जितके साधे असणार
तणाव तितकाच अर्धा राहणार.
*********
योग करा अथवा नका करू
परंतु गरज पडल्यावर एकमेकांना
सहयोग नक्कीच करा.
*********
वाईट वेळ आज ना उद्या निघून
जाईल. पण बदललेले लोक
कायम लक्षात राहतील.
*********
एक लक्षात ठेवा……
नशिबाचे दार कधीच
आपोआप उघडत नाही.
मेहनत करूनच उघडावे लागते.
*********
आपले आजचे निर्णय
आपली भविष्यातली
किंमत ठरवतात.
*********
माणसाच्या सवयी लाख बदलो
पण सवयीचा माणूस बदलला की
त्रास होतोच.
*********
धूर्त माणसे प्रामाणिक माणसांचा
योग्य वेळी आपल्या सोयीनुसार
पुरेपूर वापर करून घेतात.
*********
हलक्या मनाच्या माणसासमोर
कधीच मन हलके करू नका.
परिस्थिती जड व्हावी असे
वाटत नसेल तर…
*********
असामान्य बनायचे असेल तर
असे काम करा… ज्याचा सामान्य
लोक विचार पण करू शकणार नाहीत.
*********
चॉकलेट सारखे गोड लोक
आयुष्यात आहेत. आपल्याला
अजून काय पाहिजे…?
*********
गुलाबाच्या फुला प्रमाणे
दरवळत रहा.
*********
Good Thoughts In Marathi |
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
अनुभव वयाने नाही तर
परिस्थितिचा सामना
केल्याने येतो.
*********
पाण्यात आणि मनात साम्य ते काय…..?
दोन्ही जर गढूळ असतील तर
दोन्ही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर
धोक्याच्या पातळीकडेच ओढतात.
दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे
आनंदवनच फुलतात. पण पाण्यात आणि
मनात मुख्य फरक तो काय…?
पाण्याला बांध घातला तर पाणी “संथ”
आणि मनाला बांध घातला तर माणूस
“संत” होतो.
*********
आनंद ही अशी एक वस्तू आहे
जी आपल्याकडे नसतानाही
ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो.
*********
जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्ने लिहितात… त्यांच्या
नशिबाची पाने कधीच कोरी
नसतात.
*********
जे सुरू केले त्याच्या अंत नीट झालाच
पाहिजे. वाईट माणसे जिंकली तर चालेल
पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे.
*********
यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी
लवकर उठतो आणि आज कोणते काम
करायचे आहे, ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत
ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो.
*********
यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि
मित्रांची गरज असते. पण यशाचे शिखर
गाठायचे असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची
गरज असते.
*********
मनमोकळा संवाद साधायचा असेल तर
प्रथम संशय आणि आत्मविश्वासाच्या
भिंती पाडायला हव्यात.
*********
कोणीतरी आवडणे हे प्रेम नाही
त्या व्यक्ती शिवाय कुणीच आवडत
नाही… हे प्रेम आहे…!
*********
दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता
ज्यांच्याकडे असते ना त्यांची प्रगती
साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही.
*********
फार साधे राहू नका
लोक तुमचा घात करतील.
*********
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
तिचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
*********
यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्यानेच चालायचा असतो |
सुंदर विचार | Good Thoughts In Marathi |Marathi Quotes
प्रत्येकाला वाटते की समोरचा माणूस
सुखी आहे. पण तो हे विसरतो…
त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे.
******
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब
सारखा असला पाहिजे. वाजला तर
एकदम जोरात, नाही वाजला तरी
जवळ यायची कोणाची हिम्मत नाही
झाली पाहिजे.
******
Good Thoughts In Marathi
जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी
आपण नेहमीच उद्याचा दिवस
चांगला जावा म्हणून धडपडत असतो.
पण उद्याच्या दिवस उजाडतो तेव्हा
त्याचा आनंद घ्यायचा सोडून परत
उद्याच्या सुखासाठी धडपडत मागे
लागतो.
******
परंतु उद्याच्या दिवस चांगला
जावा म्हणून आजचा दिवस खराब
करून घेत आहात. एक लक्षात ठेवा,
उद्याचे उद्या बघू…. निदान आजचा
दिवस तरी आनंदाने जगू या….
******
जास्त चांगले असणे हे पण चांगले
नाही. कारण हे कलियुग आहे…
इथे जशाला तसे वागावे लागणार.
******
किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते.
******
निर्मिकाने सर्वांना ओठ हे
धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत…
पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की
त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही…
तर स्पर्श झाला पाहिजे.
******
ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा
सामना करावा लागतो तोच
अनुभव तुमची शक्ती…. धैर्य व
आत्मविश्वास वाढवतो.
******
सुख हे उमलणाऱ्या फुला सारखे
असावे. जे दररोज उमलत रहावे
आणि दुःख हे गळणार्या पानासारखे
असावे, जे क्षणात निघून जावे.
******
माझी माणसे हीच माझी श्रीमंती.
लोक म्हणतात…. जगण्यासाठी पैसा
लागतो. पैसा व्यवहारासाठी लागतो….
जगण्यासाठी लागतात…. प्रेमाची माणसे…!
******
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
कळत-नकळत काहीतरी शिकवून जाते.
काही कसे वागायचे ते शिकवतात तर
काही कसे जगायचे ते शिकवतात.
******
माणसाने वेळेसोबत चालावे
काळाप्रमाणे बदलावे. परंतु…
आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत
आपल्या बरोबर ठेवावे.
******
जग काय म्हणेल या भीतीने जगत
असाल तर तुमच्या मरणाला सुद्धा
अर्थ नाही.
******
धनवान होण्यासाठी एक एक कणाचा
संग्रह करावा लागतो. आणि गुणवान
होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग
करावा लागतो.
******
आपले विचार सरळ असले ना
मग आयुष्यात येणारी वळणे
कितीही वाकडीतिकडी असली
तरी काहीही फरक पडत नाही.
******
अडचणी या आपल्या आयुष्यात
नसतात तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय
मिळवाल… त्या दिवशी
आपोआपच मार्ग निघालेला दिसेल.
******
प्रत्येक कामात आपले बाळ यशस्वी
व्हावे.. सर्वात मोठे यश मिळावे असा
आशीर्वाद देणारी जगातील एकमेव
व्यक्ती म्हणजे आई.
******
फक्त लिहिता-वाचता येणे म्हणजे
शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे,
भावनेला माणुसकी कडे, शरीराला
श्रमाकडे नेण्याच्या मार्ग… म्हणजे
खरे शिक्षण…..!
******
नारळाला डोळे असतात पण
पाहता येत नाही.
कपाला कान असतात…
पण त्याला ऐकू येत नाही.
टेबलाला पाय असतात….
पण त्याला चालता येत नाही.
बाटलीला तोंड असते…
पण बोलता येत नाही.
सुई ला नाक असते
पण तिला वास येत नाही.
कंगव्याला दात असून ही
चावता येत नाही.
माणसाला सगळे असूनही
माणुसकी दाखवता येत नाही.
******
चुकलेल्या वाटाच नवीन वाटा
शोधण्याची प्रेरणा देतात.
******
घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा
शत्रू न लढता ही जिंकतो. म्हणून शिवतंत्र
सांगते…. जोडता नाही आले तर जोडू नका
पण आपल्या लोकांना तोडू नका.
******
कठीण काळात सतत स्वतःला सांगा की
शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी
अजून जिंकलो नाही.
******
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचे नसते. पण
जे आपल्या सुख दुःखात सामील होतात
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचे नसते.
******
प्रत्येक माणसाला आयुष्यभर
कुणाचा ना कुणाचा मत्सर
वाटत असतो. ज्या सुखाला
आपण लायक आहोत ते दुसऱ्या
कुणाला तरी मिळते याचे एक
ठसठसणारे दुःख तो कायम
जवळ बाळगून असतो आणि
त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की
हे कुठून बोलता येत नाही.
******
आपल्या मागे होणारी आपली चर्चा
आणि आपली बदनामी हीच आपली
खरी प्रगती आहे.
******
आनंदी राहण्याच्या सरळ साधा एकच
उपाय आहे, अपेक्षा स्वतःकडूननच ठेवा
समोरच्याकडून नको.
******
अपत्याला वाढवतांना प्रत्येक स्त्री काही
प्रमाणात आपल्या नवऱ्याची आई होत असावी.
पहिले मुल होण्यापूर्वी केवळ प्रेयसी असते.
कायम जीव टाकावा अश्या पात्रतेचा नवरा लाभला
तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचा ही अपत्या
सारखा सांभाळ करते, हे कोणत्याही पुरुषाला
कळायचे नाही. स्त्री जेव्हा जेव्हा संघर्षासाठी उभी
असते तेव्हा तेव्हा ती भले पत्नी असेल पण जेव्हा जेव्हा
क्षमा करते ते नाते आईचेच असते.
******
जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फक्त
एवढाच असतो की ते कधी आपल्या
चांगल्यासाठी असते, तर कधी दुसऱ्यांच्या
चांगल्यासाठी असते.
******
अंधार पडायला लागला
की समजावे आपली वाटचाल
प्रकाशाकडे होत आहे.
******
स्वतःवर विश्वास असला की
जीवनाची सुरुवात कुठूनही
करता येते.
******
Good Thoughts In Marathi | Sunder Vichar |
मराठी प्रेरणादायक सुविचार | Marathi Quotes | Happy Thoughts
[…] […]