लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा –
Happy Birthday Wishes with
Images in Marathi
वडील होण्याच्या आनंदा सारखा जगात
दुसरा कोणताच प्रचंड आनंद नाही आणि
जर मुलगी झाली तर मग त्याहून बेधुंद कोणतेच सुख नाही…!
जेव्हा तू पोरी मुठ आवळून माझा बोट धरतेस…
तेव्हा तो माझा प्रत्येक क्षण विशेष होतो. आणि
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जणू
पूर्ण जग जिंकल्याचा भास होतो.
माझ्या गाण्यापेक्षा जरी बेडकाचे किंचाळणे मधूर आहे…
तरी माझ्या अंगाईने माझे पिल्लू झोपते हे समाधान भरपूर आहे.
पुण्यवान असावे लागते आणि त्यापेक्षा ही खूप भाग्यवान…
ज्या बापाच्या हात उरकती सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान…!
मुला-मुलीत भेदभावाचा तो तर मी प्रश्न उगारतच नाही
मुलीवर प्रेम जास्त असते बापाचे, हे सत्यही मी झुगारत नाही.
संसारात रमण्या पेक्षा मी आपल्या मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर नंबर येतो.
पप्पा जी… पप्पा जी म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
तसेच समाधानाची इवली इवली फुले
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
तू नेहमी आनंदाने राहावीस…
देवाकडे एवढेच मागणे आहे…
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी…
दिवसरात्र झिजणे आणि जागणे आहे.
आनंदाचे अगणित क्षण
तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसते ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
नसीब ज्याला म्हणतात
ते माझ्या मुलीतच सापडले आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडले आहे.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणे
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
आकाशा एवढे सुख काय आहे,
ते मुलगी झाल्यावरच कळते…
एक वेगळच आपलेपण
तिचे प्रत्येक हास्य उधळत जाते.
इतरांचे नशीब घेऊन येण्याच्या बाबतीत
मुली खूप माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसे जग जाहीर आहेच.
मुलींचे एक मात्र छान असते…
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी.
मान, शान व सन्मान असतो.
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा –
Happy Birthday Wishes with
Images in Marathi
आज आपला वाढदिवस
वाढणाऱ्या प्रत्येक दिवशा गणिक
आपले यश, आपले ज्ञान आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो… आणि सुख समृद्धी ची
बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…
आपणास उदंड आयुष्य लाभो… ह्याच
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
|
आजची तारीख शतदा यावी…
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृद्ध व्हावा…
सुखाचा ठेवा, मनोमनी साठवावा.
|