Husband Wife Relationship Quotes In Marathi | नवरा बायको प्रेम

4
2494
Husband Wife Relationship Quotes In Marathi | नवरा बायको प्रेम

Husband Wife Relationship Quotes In Marathi |
नवरा बायको प्रेम

nawara-bayko-prem-sunder-vichar-vijay-bhagat-vb-good-thoughts-नवरा-बायको-प्रेम-सुविचार
नवरा आपल्या बायको वर खूप जास्त प्रेम करीत असतो परंतु आपले प्रेम तो 
कधीही आपल्या बायकोला दाखवत नसतो. 
 
मागील वर्षी ते दोघे आपल्या लग्नाचा पंचीसावा वाढदिवस साजरा करीत असतांना 
नवऱ्याच्या हातात बायकोने लिहलेली डायरी हाती लागते त्यात तो एक दोन पान 
वाचतोय…. त्यामध्ये नवऱ्याच्या काही लहान सहान तक्रारी लिहलेल्या असतात…
डायरी वाचत असतांना बायको नवऱ्याला बघून घेते… पण दुर्लक्ष करते….

त्या दिवसी लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते दोघेही ठरवितात की… 
आजपासून आपण पुढील वाढदिवस येई पर्यंत आपल्या दोघांच्या मनात 
एकमेकांविषयी जे काही राग… प्रेम…. चूक… आभार येईल तो डायरीत लिहून 
ठेवायचा आणि लग्नाच्या वाढदिवसी एकमेकांची डायरी वाचायची.

आज एक वर्ष पूर्ण झाले…! नवऱ्याने प्रथम बायकोची डायरी वाचायला सुरुवात केली…
डायरीचा पहिला पान….. दुसरा पान…. तिसरा पान….
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवशी मला यांनी माझ्या आवडीची भेट दिली नाही….
आज बाहेर जेवण करायला जायचे होते… परंतु यांनी नकार दिला…
आज माझ्या आवडीची पनीरची भाजी बनवायची होती पण हे पनीर आणायला विसरलेत…
 आज माझ्या माहेरचे काही पाहुणे आलेले होते… त्यांच्यासोबत हे साधे बोललेही नाहीत.
आज खूप दिवसांनी माझ्यासाठी साडी घेऊन आले… परंतु मला कलर मुळीच आवडला नाही.

सगळ्याच पानावर अशाच लहान – मोठ्या चुकांनी बायकोच्या डायरीची पाने भरलेली होती.
हे सगळे वाचून नव-याचे डोळे भरून आले. तो बायकोला म्हणाला माझ्या हातून इतक्या चुका झाल्या आहेत हे मला माहीत नव्हते. आता परत या प्रकारच्या चुका होणार नाहीत… 
याची नक्कीच काळजी घेईन.

Husband Wife Relationship Quotes In Marathi |
नवरा बायको प्रेम


या नंतर बायकोने नव-याची डायरी वाचयला हातात घेतली.
नवऱ्याच्या डायरीचे पहिले पान कोरे…. दुसरे पान कोरे…. तिसरे पान कोरे… 
आणखीन काही पाने पलटवली परंतु ती ही सगळी कोरीच…

बायकोला खूप राग आला…. रागात नवऱ्याला म्हणाली… तुम्ही माझी ही एक 
लहानशी गोष्ट ही ऐकली नाही…  आपण दोघांनीही डायरी लिहायचे ठरविले होते ना….? 
तुम्ही तर डायरीत काहीच लिहिले नाही.

मी वर्षभर तुमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून लहान – लहान 
गोष्टी लिहून ठेवल्या आहेत…  आणि तुम्हाला वाचायलाही दिले… 
परंतु तुम्ही मात्र काहीपण लिहिलेले नाही.

नवरा हळूच हसला आणि बायकोला म्हणाला मला जे काही लिहायचे होते… 
ते मी डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेले आहे. ते वाचून घे….

बायकोने पटकन डायरीचे शेवटचे पान उघडले…. त्या पानावर लिहिलेले होते की…
जरी मी तुझ्या तोंडावर कितीही दोषारोप केले तरी तु जो त्याग माझ्यासाठी आणि 
आपल्या कुटुंबासाठी आजपर्यंत केलेला आहेस… एवढया वर्षात जे अमर्याद प्रेम 
आजपर्यंत दिले आहेस 
 
त्या तुलनेत मला या डायरीच्या पानात लिहावे अशा एक पण दोष तुझ्यात दिसला नाही.
तुझ्यात काहीही दोष नाही असे नाही परंतु तु केलेला परीत्याग तुझे प्रेम या सर्वांपेक्षाही 
खुप अधिक आहे. माझ्या अक्षम्य…. अगणित…. चुकांनंतरही तु माझ्या जीवनातील 
प्रत्येक लहान लहान गोष्टीत माझी छाया बनून मला साथ दिलीस. 
आता माझ्याच छायेत मला चूक तरी कशी दिसेल….?

आता रडण्याची वेळ बायकोची होती. तीने नव-याच्या हातात असलेली आपली डायरी 
ओढून घेतली आणि तिला जाळून टाकली. त्या जळलेल्या डायरीत आजपर्यंतचे 
सर्व रुसवेफुगवे ही जळून गेले. लग्नाच्या 26 वर्षांनंतर त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा 
नवीन लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे प्रेम फुलु लागले.

मित्रांनो…. पहिले तर ही एक काल्पनिक गोष्ट आहे… बायकोच्या जागेवर नवरा…. 
नवऱ्याच्या जागेवर बायको ही राहू शकते. 
 
यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची….  ती म्हणजे…. 
जेव्हा यौवनाच सुर्य अस्त व्हायला लागला की… एकामेकांच्या 
चुका काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी…. घरादारासाठी….. 
संसारासाठी…. कीती त्याग केला…. किती गोष्टी मुद्दामून केल्या… 
किती गोष्टी सोडून दिल्यात… किती प्रेम केले… त्यालाच आठवायचे…. 
 
पदोपदी जोडीदाराने कशी साथ दिली ते आठवायचे. मग पहा… 
ते पहिल्यासारखे प्रेम परत उमलते की नाही….!

Husband Wife Relationship Quotes In Marathi |
नवरा बायको प्रेम

 

 

4 COMMENTS

  1. Wow, incredible weblog structure! How lengthy have you been running a blog for?
    you make blogging look easy. The overall glance of your site is wonderful, as smartly as the content!
    You can see similar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here