Inspirational Marathi Story | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

1
720
Inspirational Marathi Story | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Inspirational Marathi Story |
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

एक व्यापारी चांगला उंट विकत घेण्यासाठी बाजारात गेला…
बाजारात उंट पाहत – पाहत शेवटी त्याने एका उंटा ची निवड केली.

आता व्यापारी उंटाची किंमत ठरविण्यासाठी उंट मालकासोबत बोलणी करू
लागला… व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये एका रकमेवर बोलणी पक्की झाली
आणि विक्रेत्याला रकम देवून व्यापारी उंट घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी
निघाला….!

घरी आल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाच्या पाठीवर असलेली बैठक
काढण्यास सांगितले.

नोकर ती बैठक काढत असतांना त्याच्या लक्षात येते कि…. बैठकीच्या खाली
सुंदर कपड्याची एक लहानशी पिशवी आहे. पिशवी उघडून बघितली तर
नोकराला समजले हि पिशवी मौल्यवान हिरे आणि रत्नांनी भरलेली आहे.

तो जोरात आवाज देत घराच्या आत मालकाकडे धावत गेला आणि म्हणाला…
मालक आपण जो उंट विकत घेऊन आणला आहात… त्या उंटा बरोबर
काय फुकट मिळालेले आहे ते बघा…..!”

Inspirational Marathi Story |
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

व्यापारी मौल्यवान हिरे आणि रत्नांनी भरलेली पिशवी बघताच एकदम
आश्चर्यचकितच झाला. त्याने ते रत्न आणि हिरे आपल्या हातात घेतले…
ते सूर्यप्रकाशामध्ये आणखीनच चमकायला लागले.

काही वेळ ती चमक पाहून व्यापाराने सर्व हिरे आणि रत्न परत जसे च्या तसे
पिशवीत ठेवले. आणि नोकराला म्हणाला….
“मी केवळ उंट विकत घेतला आहे…. हे हिरे-रत्न नाही.”
हे मला लगेच परत करायला पाहिजे…!”

तो नोकर आपल्या मनात विचार करायला लागला…. ”
हा माझा मालक केवढा मोठा
मूर्ख माणूस आहे …!”

नोकर म्हणाला :- “मालक हे काय आहे….?
हे कुणालाही माहित होणार नाही….!”
तरीही व्यापाऱ्याने नोकराचे काहीच ऐकले नाही आणि लगेच
बाजारात जाण्यासाठी निघाला.

पोहोचताच सरळ ती पिशवी त्या उंट विक्रेत्याच्या हातावर ठेवली.

उंट विक्रेता खूप आनंदित झाला आणि म्हणाला…. “मी विसरलोच होतो की
मी माझे मौल्यवान हिरे गादी खाली लपविलेले होते…..!
आता आपण कृपया बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा….!

व्यापारी म्हणाला….
“मी उंटासाठी योग्य किंमत तुम्हाला दिली आहे म्हणून मला
आता कोणत्याही भेटवस्तू
आणि बक्षिसाची गरज नाही आहे….!”

तो व्यापारी जितका नकार देत होता…..
तितकाच उंट विकणारा आणखीनच
आग्रह धरीत होता…..!

शेवटी…. व्यापारी हसला आणि म्हणाला….
खरे तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी
दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते.

या कबुली नंतर…. उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली
रिकामी केली…. आणि त्यातील हिरे मोजले….!

परंतु जेव्हा त्याला लक्षात आले की माझे सर्व हिरे जशेच्या तसे आहेत…
आणि एकही हिरा यातून कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला…
“हे माझे सर्व हिरे अगदी बरोबर आहेत…. तर मग तुम्ही ठेवलेले
दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते….?

Inspirational Marathi Story |
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

यावर व्यापारी म्हणाला :- ” माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान.

विक्रेता शांतच झाला….!

या पैकी दोन हिरे आपल्याजवळ आहेत की नाही हे शोधण्यासाठी
आपण स्वतःमध्ये पहावे.

ज्याच्या जवळ हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान…. आणि प्रामाणिकपणा….
तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.

Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here