नमस्कार मित्रांनो….
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण कर्मावर काही
marathi quotes, sunder vichar, suvichar,
बघणार आहोत.
Motivational Story In Marathi
कर्म म्हणजे काय…..? | Sunder Vichar
आपल्या राज्याचे निरीक्षण करण्यासाठी एक राजा एकदा
आपल्या हत्तीवर बसुन राज्यात फिरत होता.
फिरता फिरता तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलावले
आणि त्याला म्हणाला… प्रधान जी, पूर्वी कधीच हा दुकानदार माझ्या पाहण्यात
आला नाही. याला मी ओळखतही नाही…. तरीही माहित नाही का म्हणून
मला या दुकानदाराला फाशी द्यावे असे वाटते आहे.
प्रधान एकदम गोंधळला आणि… तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तिथुन
पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान ते दुकान पाहून ठेवले आणि तो
राजाच्या मागे जायला निघाला.
दुस-या दिवशी गावातल्या त्या दुकानात प्रधान साध्या वेशात पोहोचला.
त्यावेळी दुकानात दुकानदारा शिवाय दुसरे कोणीही नव्हते. दुकानात
जाण्यापूर्वी प्रधानाने आजूबाजूला विचारपूस केली होती. त्यात त्याला
कळले होते की, तो दुकानदार चंदनाचा व्यापारी आहे. आणि चांगल्या
प्रतीचे चंदन त्याच्याकडे मिळते.
प्रधान दुकानात जाताच लक्षात आले की खरोखर या दुकानात सुवर्णवर्णाचे
सुगंधी चंदन आहे. परंतु कोणी घेणारा नसल्यामुले दुकानदार खूपच वैतागला आहे.
चौकशी करता करता समजले की लोकं नुसते येतात…. चंदनाचा वास घेतात….
आणि साधा भाव ही विचारत नाहीत आणि निघून जातात.
रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला खूप वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा.
जर राजा मेला तर त्या भागात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने
राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल.
माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले
याचा उलगडा झाला.
राजाविषयीच्या व्यापा-याच्या मनातील वाईट विचारांच्या तरंगलहरीनी
राजा या दुषीत वातावरणात आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला
फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.
त्या दुकानदाराकडून प्रधान ने थोडे चंदन विकत घेतले आणि दुकानदाराला
खूप दिवसानंतर गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला.
प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून
चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने राजा एकदम मोहित झाला.
राजाने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन… ? प्रधानाने त्या व्यापाऱ्याचे नांव
सांगितले. राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले….!
राजाने त्या व्यापाऱ्याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला.
राजा अधूनमधून दुसर्यांना अनमोल भेटी देण्याकरिता चंदन विकत घेऊ लागला.
राजाच्या खरेदीने तो व्यापारी आता आनंदी राहू लागला..आणि आता त्याच्या मनात
आपला राजा मरावे हा विचार येणे बंद झाले.
आपल्या राज्यातील चांगल्या प्रतीचा चंदन व्यापारी म्हणून तो व्यापारी
राजाचा मित्र झाला.
दुसर्यांन विषयी आपल्या मनात जर चांगले विचार…. दयाळूपणा आणला तर
दुसऱ्यांच्या मनातूनही चांगले विचार…. चांगल्या भावना आपल्या पर्यंत येतील
आणि आपली समृद्धी होईल.
मग कर्म म्हणजे काय…..?
अनेकजण म्हणाले…. आपली भावना… आपले शब्द… आपली कृती…
परंतु हेच खरे ही आहे की…. आपल्या मनात येणारे विचार
हेच आपले खरे कर्म होय….!
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
कर्म हे रबरा सारखे असते
तुम्ही त्याला ताणवू शकता
आणि जसे ताणाल तसे ते
तुमच्या कडे परत येईल.
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल
तर तुम्हाला तुमच्या कर्माची
चिंता करावी लागेल…
फळाची नाही.
आपले कर्मच
आपली ओळख आहे….
नाहीतर एका नावाचे तर
करोडों माणसे आहेत.
उशिराच का होईना
कर्माचे फळ मिळतेच.
ज्याचा वर्तमानकाळ
प्रयत्नवादी आहे…
त्याचा भविष्यकाळ
उज्ज्वल आहे.
आयुष्य संपल्यावर
तुमचा धर्म काय आहे…
परमेश्वर बघणार नाही…
परमेश्वर फक्त तुमचे
कर्म बघेल.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मनुष्य हा कर्माने
महान ठरतो
धर्माने नाही.
आपली चांगली वेळ
जगाला सांगते की
आपण काय आहोत…
परंतु आपली वाईट वेळ
आपल्याला सांगते की
जग काय आहे.
सत्कर्मी माणसाला जीवनात
अडचणी येतात. परंतु
त्या सुटणाऱ्या असतात…
याउलट जो दुसऱ्याला
अडचणीत आणतो…
त्याची अडचण
जीवनभर संपत नाही…
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
तुमची चुक नसतांनाही
जर तुमच्यावर अन्याय होत असेल
तर समजून घ्या कि….
अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस
काही वेळेपुरते मर्यादित आहेत. वाहत्या पाण्याप्रमाणे
चांगले कर्म करत राहा…
वाईट गोष्टी कचऱ्या प्रमाणे
स्वतःहून किनाऱ्याला लागतील.
“नेहमी देवावर निःसंकोच विश्वास ठेवा..
योग्य वेळी तो इतके देतो की…
मागायला काही उरतच नाही…!”
तुम्हाला तेच मिळणार
जे तुम्ही दुसऱ्यांना देणार.
जर तुम्ही धर्म कराल
तर देवाकडून तुम्हाला
मागावे लागेल. आणि
जर तुम्ही कर्म कराल
तर देवाला तुम्हाला
द्यावे लागेल.
परमेश्वरा पेक्षा कर्माची
भीती बाळगा…. एकवेळ
परमेश्वर माफ करेल…
परंतु कर्म नाही.
आपले चांगले कर्म
हे आपल्याला नेहमी
पाहिजे असलेल्या गोष्टी देतात.
चांगले केलेले काम
कधीही वायाला जात नाही.
जरी आज यश मिळाले नाही…
तरी ” क्रिया तशी प्रतिक्रिया ”
या निसर्ग नियमानुसार
ते न मिळालेले यश भविष्यात
माणसाला दामदुप्पटीने मिळते.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
दुसऱ्यांसाठी जगणारेच
खऱ्या अर्थाने जिवंत असतात.
बाकी सर्व जिवंत असूनही
मेल्यासारखे होत.
तुम्ही जे पेरणार…
तेच उगवणार….!
ज्याचे कर्म चांगले आहे
तो कधी संपत नसतो…
कर्माचे फळ मिळण्यासाठी
कोणतीही मुदत नसते.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मनुष्य जन्मतः
कधीच भाग्यवान नसतो….
त्याचे नशीब कर्माने घडते.
जे तुमच्यासोबत होऊ नये
असे वाटत असेल तर….
ते इतरांसोबत करू नका.
भगवंत ही त्यांनाच आधार देतो…
ज्यांच्याबरोबर त्यांचे
चांगले कर्म असतात.
या जन्मात केलेल्या
चुकीची शिक्षा….
याच जन्मात मिळते.
त्यालाच कर्म म्हणतात.
जीवनातील कर्मावर आधारित विचार
Karma Quotes in Marathi
कर्माची परतफेड करावीच लागते
त्यासाठी कर्म करतांना नेहमी
सजग होऊन कर्म करा. कारण…
ब्रम्हांडातील कोणताही नियम
बदलू शकतो….. परंतु कर्माचा
सिद्धांत कधीही बदलत नाही…!
परमेश्वराने तर
पहिलेच सांगुन ठेवले आहे.
जर माझ्याकडे मागुन
मिळाले असते तर…
भिकाऱ्याला “भिक”
आणि शेतकऱ्याला
“पीक” कधीच
कमी पडू दिले नसते.
त्यासाठी माणसाने
कष्ट करणे हेच कर्म आहे.
जे द्याल तेच परत मिळेल
मग तो आदर असो की धोका.
मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात
उतरवतात…
जैसे ज्याचे कर्म
तैसे फळ देतो रे ईश्वर.
लोक तुमच्याशी कसे वागतात
हे त्यांचे कर्म. त्यावर तुम्ही
कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म.
चांगले करा किंवा वाईट….
जे द्याल तेच परत मिळेल….!
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मित्रांनो, तर हे होते कर्मावर काही सुविचार, सुंदर विचार, Quotes,
आशा करतो आपल्याला हे Marathi Suvichar, नक्कीच आवडले
असतील. जर आपल्याला आवडले असतील तर हे सुविचार, सुंदर विचार,
Good Thoughts In Marathi, आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद….!
पुढे वाचा
Marathi Suvichar Status Image | मराठी सुविचार संग्रह
Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar
Suvichar | मराठी सुविचार सोपे | शालेय सुविचार संग्रह मराठी
[…] […]
[…] गोष्ट [ कर्म […]
[…] […]
[…] […]