नमस्कार मित्रांनो,
आजच्या पोस्ट मध्ये आपल्यासाठी
आयुष्यावर सुविचार, चांगले विचार,
आयुष्य असेच जगायचे असते,
जीवनावर सुविचार, life quotes in marathi,
suvichar marathi, sunder vichar, naati suvichar,
नाते कसे जपायचे, सकारात्मक सुविचार,
मनाला भावलेले सुविचार, good thoughts in marathi,
असे सुंदर सुंदर विचार आणले आहेत. हे विचार वाचून
तुम्हाला नक्कीच आनंद होईल. तसेच आयुष्य जगण्याला
मदत होईल. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
नक्की बदलेल. चला सुरुवात करूया सुंदर विचारांना,
सुविचारांना.
Life Quotes In Marathi |
आयुष्य असेच जगायचे असते…!

अचानक मन उदास होणे
हळूच डोळ्यांत पाणी येणे
ही एका वेदनेची जाणीव असते.
जी दुसऱ्याला सांगता येत नाही
आणि स्वतःला सहन होत नाही.

“नशिबाने मिळालेली गोड माणसे
क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून
टाकू नये.”कारण… काय सांगावे
उद्या सगळे असेल. पण सोबतीला
कुणी हक्काने भांडणारे… रुसणारे…
आणि छोट्याशा समजुतीने लगेच
खुदकनं हसणारे गोड प्रेम आयुष्यात
नसेल.

ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा
आत्ताच बागेची काळजी घेण
चांगले आहे…..!
चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…
आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात…!!

कमीपणा घेणारे कधीच लहान
अथवा चुकीचे नसतात.कारण…
कमीपणा घेण्यासाठी खुप मोठे
मन असावे लागते.

जी व्यक्ती तुमच्याशी बोलल्याशिवाय
राहू शकत नाही… अशा व्यक्तीला
कधीच ignore करु नका. किंवा
त्याच्याशी वाईट वागून त्याला गमवू
नका. कारण जीवनात वेळ काढून
बोलणारे लोक तुम्हाला खूप भेटतील
पण तुमच्याशी बोलण्यासाठी आतुरतेने
वाट पाहत बसणारे जगात मोजकेच
असतात…..!

मित्रांनो, !!.. आयुष्य असेच जगायचे असते..!!
!!.. आयुष्य असेच जगायचे असते..!!
जे घडेल ते सहन करायचे असते
बदलत्या जगाबरोबर बदलायचे
असते. कुठून सुरु झाले हे माहीत
नसले तरी, कुठेतरी थांबायचे असते.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे
करायचे असते. स्वत च्या सुखापेक्षा
इतरांना सुखवायचे दुख आणि
अश्रूंना मनात कोडुन ठेवायचे असते
हसता नाही आले तरी हसवायचे असते
पंखामध्ये बळ आल्यावर
घरटे सोडायचे असते.
आकाशात झेपावुनही धरतीला
विसरायचे नसते. मरणाने समोर
येउन जीव जरी मागितला तरी
मागुन मागुन काय मागितलस
असेच म्हणायचे असते.
इच्छा असो वा नसो
जन्मभर वाकायचे असते.
पण जग सोडताना मात्र
समाधानाने जायचे असते.
आयुष्य असेच जगायचे असते.
#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार
Life Quotes In Marathi |
आयुष्य असेच जगायचे असते…!
DP म्हणजे काय असते….?
माझ्या वाचनात आलेला…
पण खूप छान विवरण असलेला
लेख. हा लेख कुणी लिहला आहे
माहीत नाही. पण आवडला म्हणून
तुमच्या सोबत शेअर करत आहे.
चला तर मग पाहूयात
DP म्हणजे काय असते….?
खरेतर त्यात काही नसते….?
म्हणायला आपला एक छानसा फोटो…
पण पारखून निवडलेला असा.
अंदाजे सहा महिन्या अगोदर सोशल मीडियामध्ये
एक पोस्ट फिरत होती. तुमच्याही वाचनात आली
असेलच. त्या पोस्टमध्ये असे सांगितले होते की…
जे आपली डीपी रोज बदलतात ते चंचल असतात
आणि ज्याचा डीपी स्थिर ते शांत… अरे….?
कुणी ठरवले हे आणि कशाच्या आधारावर….?
गंमतीशीर दुनिया… मजेशीर माणसे… मंडळी
खरोखर सांगा… मला नको… पण स्वतःलाच…
आपला छान आलेला फोटो आपण पुन्हा पुन्हा
पाहतोच ना….? आवडते आपल्याला… तसेच
social media वरचे फोटो… इतरांचे डीपी ही…
मग ज्याला आवडेल त्याने वरचेवर बदलला
तर काय हरकत आहे हो. मान्य आहे की यात
स्त्रिया आघाडीवर असतात. पण आवडीने
वरचेवर स्वतःचा स्टायलिश असा वा कुटुंबाचा
मस्त फोटो डीपी म्हणून ठेवून… I love my family….
my sweet family….
I m happy… Happy life असे गोड about
ठेवणार्या पुरुषांची संख्याही कमी नाही आहे…
बरं का….!
कधीतरी आपला फोटो पाहून कुणीतरी
छान हं…! असे आपल्याला म्हटले की
कसे मूठभर मांस अंगावर चढते…
मन भरुन येते… गालावर हसू उमटते….
गुपचूप आपला डीपी पुन्हा पाहून होतो….
वर्ष – वर्ष एकच डीपी ठेवणार्यांना काय
कळणार त्यातील गंमत… ते एकाच
कोषात राहून आम्ही किती busy राहतो….
हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात.
नवीन पिढी मात्र याबाबतीत दिलखुलास आहे…
आपल्या आयांबायांनी छान फोटो काढावेत….
जगासोबत हौसेने जगावे म्हणून आग्रही
असतात ही मुले. कौतुक वाटते त्यांचे….
आणि काही मोठी माणसे मात्र काय त्यात
मोठे…. आम्हांला नाही वेळ म्हणून खुशाल
नाक मुरडतात.
काही जण, लोक काय म्हणतील
या भीतीने मन मारुन डीपी बदलणे
टाळतात… काही लोक मात्र एखाद्याचा
फोटो आवडला तर मनमोकळी दादही
देतील…
काही लोकांजवळ चांगल्या गोष्टींचे
कौतुक करण्याइतकं मोठे मन नसते.
ते फोटो पाहून नुसतेच कुढतात….
तर काहींचा डीपी मूडवरही बदलतो
तर कधीकधी डीपीतून राग…. प्रेम….
माया… सलोखा… शहाणपण…..
कधी अतिशहाणपण अशा भावनांचा
display दिसत असतो.
काहीजण इकडे तर एखाद्याला
नावे ठेवतील पण आवर्जून बदललेल्या
डीपीवर नजर ठेवतील…!
मित्रांनो, आजपासून शक्य तेव्हा बिनधास्त
DP बदला….. आणि Enjoy करा…. कारण….
डीपी जिवंतपणाचे लक्षण आहे….तुम्ही जागृत
असल्याचे प्रमाण…. आणि सर्वात महत्त्वाचे
म्हणजे… तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखात
असल्याचे शाश्वत वचन.
By the way…. DP म्हणजे Display Picture 💐
Life Quotes In Marathi |
आयुष्य असेच जगायचे असते…!

आयुष्यात असे एक नाते असावे.
आयुष्यात असे एक नाते असावे…
दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारे…
जगाला दाखवण्यासाठी नाही….
आपल्या दोघात जग निर्माण करणारे….
आयुष्यात असे एक नाते असावे.
कितीही भांडणे झाली तरीही
साथ न सोडणारे…
आपली मनापासून विचारपूस
करून… आपली काळजी करणारे…
आयुष्यात असे एक नाते असावे…
एक उदास असताना दुसऱ्याने
ते न सांगताच ओळखनारे…
डोळ्यात न दिसणार पाणी
मनातल्या नजरेने अलगद टिपणारे….
आयुष्यात असे एक नाते असावे.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल :-
Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes
निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील