Makar Sankranti in Marathi – मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

0
543
Makar Sankranti in Marathi - मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
Makar Sankranti in Marathi - मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

आकाशात उंचच उंच लहरू दे पतंग.
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंदाची तरंग

तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला
मकरसंक्रांत च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
Makar Sankranti in Marathi

मित्रांनो,
आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र हे सण
जसे महत्वाचे मानले जाते आणि खूप थाटात साजरे हि केले जाते… तसाच
मकरसंक्रांती हा एक महत्वाचा सण आपण साजरा करतो.

जेव्हा सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात जाण्यासाठी आपला मार्ग बदलतो
त्याच तिथीला संपूर्ण देशात मकरसंक्रांती हा सण साजर केला जातो.

याच दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.

या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता…

सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

सुर्य मकर राशीत पौष महिन्यात प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतो.
या उत्तरायणामुळे भारताच्या उत्तर गोलार्धात खूप जास्त उष्णता आणि प्रकाश मिळतो.
तसेच दिवस मोठा आणि रात्र हि लहान होत जाते…!

या भागात राहणाऱ्या आपण भारतीयांना हा बदल खूप आवडतो… म्हणून हा सण ही
आपण सर्वांना खूपच आवडतो. आणखीन एक महत्वाचे म्हणजे या उत्तरायणामुळे
थंडी ही हळूहळू कमी – कमी व्हायला सुरुवात होते.

संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान खूप पुण्यदायक मानले आहे.
म्हणूनच या दिवशी कुठेतरी बाहेर नदी किवा धार्मिक ठिकाणी स्नान करतात.
या वेळी खूप थंडी असते, मकरसंक्रांती नंतर सूर्य तापायला सुरुवात करतो…
म्हणून खूप प्रेमाने या सणाचा सगळे स्वागत करतात.

हा सण पूर्ण देशात साजरा केला जातो, भारत सरकारने या सणाला
राष्ट्रीय सण घोषित केले आहे, पण देशातील विविध राज्यात हा सण विविध
पद्धतीने साजरा करतात तसेच विविध नावाने हि साजरा करतात.

Makar Sankranti in Marathi 
मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

मकरसंक्रांती makar sankrati ( महाराष्ट्र )

संक्रांति sankranti ( बिहार,केरळ,आंध्रप्रदेश, कर्नाटक )

भोगाली बिहुं Bhihu ( आसाम )

पोंगल Pongal ( तामिळनाडू )

उत्तरायण Utarayan ( राजस्थान, गुजरात )

माघ मेला Magh Mela ( ओडिसा )

लोहरी Lohri ( पंजाब )

जरी प्रत्येक धर्म…. प्रत्येक राज्य…. आपआपल्या प्रथे प्रमाणे…. आपआपल्या पद्धतीने…
साजरा करतात पण उत्साह आणि आनंद हा सगळीकडे सारखाच असतो.

पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र साजरा
करण्याची परंपरा आहे.

या सणाची एक छान गंमत ही आहे. हा सण दरवर्षी जानेवारी महिन्याच्या
14 तारखेलाच येतो. ( एखाद्या वर्षी हा सण 13 जानेवारी किवा 15 जानेवारीला ही येतो.
हा एक अपवाद आहे. )

आपल्या देशातील मकरसंक्रांत हा एक शेतीसंबंधित सण आहे.
हा आपला आवडता भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत असून
अतिशय महत्वाचा सण आहे.
या सणाचा शेतीशी देखील एक महत्वाचा संबंध आहेच.

Makar Sankranti in Marathi 
मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

मकरसंक्रांती पासुन दिवस हा हळुहळु मोठा – मोठा होत जातो आणि
रात्र ही लहान लहान होत जाते. त्याच प्रमाणे सुर्य ही हळूहळू तेज होत जातो…
आणि जस जसा सुर्य पुढे – पुढे सरकत जातो तस तसा त्याची दाहकता ही वाढत जाते.

समोर 15 ते 20 दिवसाच्या मधात रथसप्तमी असते. सुवासिनी स्त्रिया मकरसंक्राती
पासुन रथसप्तमी पर्यंत वान वाटतात. ( हळदी कुंकवाचे आयोजन करतात. )

मकरसंक्रांती या सणाचे आहार च्या दृष्टिकोनातून ही विशेष महत्व आहे…!

मकरसंक्रांती सणाला सुवासिनी बाया ह्या एकमेकिंना सुगड्याचे वाण देतात.
सुवासिनी बाया या वाणात हरभरे…. मटर…. बोरं… उस… गहु… तीळ…. नाणे…. देतात…
हे आपल्याही पाहण्यात येतेच… ( हरभरे… मटर…. बोरं…. गव्हाच्या ओंब्या हे सगळे
फक्त याच दिवसात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते… म्हणूनच या वस्तूंचा समावेश
बाया वाणात करतात…! )

ऊस… हरभरे…. बोरं… गव्हाच्या ओंब्या… तीळ ह्या सर्वांना सुगडयात भरून…
ज्यापध्दतीने सुवासिनी बाया एकमेकिंना हे वाण म्हणून देतात…
अगदी त्याचप्रमाणे पंढरपुरला रूक्मिणी आईला देखील सुवासिनी महिला
आजच्या दिवशीच हे वाण देण्यासाठी पंढरपूर ला महिलांची चांगलीच गर्दी राहते…!

मकरसंक्रांती या सणाला महाराष्ट्रात असा साजरा करतात…!

महाराष्ट्रात मकरसंक्रांती या सणाला काळे कपडे घालण्याची आणि
एकमेकांना काळे कपडे देण्याची देखील प्रथा आहे. पण ही प्रथा
काही ठिकाणीच पाहायला मिळते…!

महाराष्ट्र – तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला

“ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ” या वाक्याने पूर्ण महाराष्ट्र गुंजते…
तसेच हे वाक्य म्हणण्याची संधी महाराष्ट्र वासियांना फक्त आणि फक्त
मकरसंक्रांती या सणालाच मिळते…!

तिळ आणि गुळ हे स्वभावाने उष्ण असते आणि या थंडीच्या काळात
आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज हे तिळगुळ पुर्ण करत असते…
आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा
सुरू झाली असेल…!

मकरसंक्रातीला तीळ…. गुळ…. गुळाची पोळी… तिळाचे लाडू…. मुऱ्याचे लाडू…
यांचे विशेष महत्व असते.

Makar Sankranti in Marathi – मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

मकरसंक्रांत आणि पतंग

या दिवसांमध्ये सुवासिनी बाया हळदी कुंकवाचे आपापल्यापरीने घरी आयोजन
करतात आणि आपल्या ओळखीच्या सुवासिनी महिलांना बोलवितात….
तसेच आपली पुरुष मंडळी…. बाल मंडळी… मित्र…. वडीलधारी… माणसांसोबत
पतंग उडविण्यात मस्त असतात…!

या दिवसात भरपुर ठिकाणी पंतग महोत्सवाचे आयोजन देखील आयोजित केले जातात….
तसेच पतंग बनविणे ही शिकविले जाते…!

खूप लोकं पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी आणि आयोजित महोत्सवाचे उत्सव
पाहाण्याकरता गुजरात राज्यात जातात… कारण गुजरात राज्यात या मकरसंक्रांतच्या
दिवसांमध्ये आकाशात विविध रंगाची… आकाराची…. पतंगे उडत असल्याचे आपल्याला
दिसत असते…!

या दिवसांत पतंग उडविण्याचे जर आपण शास्त्रीय कारण पहिले तर आपल्याला सहजच
लक्षात येईल की…. या थंडीच्या दिवसांमध्ये सुर्याची उन अंगावर घेण्यासाठी पतंग
उडविण्याच्या शिवाय दुसरे असे चांगले कारण असुच शकत नाही. आणि म्हणुनच
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी असे वाटते.

सण कोणतेही असोत… हे आपल्याला आनंद… उत्साह…. नवचैतन्य…
देण्याकरीताच येत असतात…! रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कामातून काही क्षण
काढुन, आपण निवांतपणे ह्या सणानिमित्ताने वेगळेपणाने जीवन जगतो…
त्यात रमून जातो… आणि आयुष्यात एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो…!

Makar Sankranti in Marathi 
मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

सणांच्या निमित्ताने मित्र – मंडळी… नातेवाइकांशी भेट होते आणि जीवनात एक नवीन
उर्जा तयार होते आणि हि उर्जा समोर कित्येक दिवस आपल्याला जीवनात आनंद देत असते…!
ही उर्जा संपायला लागली की समोर दुसरे सण आलेले असते.. आणि म्हणुनच
प्रत्येक सणाला आपण अगदी भरपूर उत्साहाने साजरा करायला हवा…!
हो की नाही….!

तीळ आणि गुळाच्या स्नेह गुणांचा सण म्हणजे मकरसंक्रांती…
आजच्या दिवशी कटुताला बाजूला सारून…
आपल्या जुन्या नात्यांना उजाळा देऊया… आणि
आपल्या नवीन नात्यांतील गोडवा वाढवू या…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला…

Marathi Suvichar – VijayBhagat.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here