Marathi Bodhkatha – संधीचे सोने – मराठी बोधकथा – सुंदर विचार

0
947
Marathi Bodhkatha, संधीचे सोने - मराठी बोधकथा, सुंदर विचार

Marathi Bodhkatha,
संधीचे सोने – मराठी बोधकथा,
सुंदर विचार

एका नदीच्या काठावरील झाडावर एक माकड आणि एक माकडीण बसलेले

होते. त्याच वेळी अचानक आकाशातून आवाज यायला सुरुवात झाली की….

ही आवाज बंद जशी बंद होईल… तसाच जो कोणी ह्या नदीच्या पाण्यात उडी

मारेल तो खूप सुंदर असा राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल.

 

आकाशातून आवाज सुरूच असते. माकड आणि माकडीण ऐकत असतात.

त्यांच्या मनात विचारांचे गोंधळ सुरू असते…. काय करू…? काय करू…. ?

काय करू… ? दोघेही विचार करत असतात.

आता आकाशातील आवाज बंद झाली…

तशीच माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते… माकड ओरडतो

वेडी झालीस का तु…? से कधी होते का?

आकाशातील आवाज खोटा असेल तर…

 

तेवढ्यातच पाण्यातून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते.

ती माकडाला म्हणते  अरे माकडा जरी आकाशातील आवाज खोटा ठरला असता…

तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते. परंतु एक संधी घेतल्यामुळे

आता मी राजकुमारी झाली आहे.

Marathi Bodhkatha

आपल्या समोर एक संधी असूनही आपण केवळ विचारच करत राहिलो अथवा

वेळेवर निर्णय घेतला नाही म्हणून आज तु माकडच राहिलास.

 

दररोज ही संधी मिळत नाही. आणि आज मिळालेली संधी तु ओळखला नाही.

केवळ शंका घेत बसला आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास…!

 

मित्रांनोमनातील आवाज हा आकाशातील आवाजा सारखाच असतो.

जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे.

नाहीतर माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून माकड बनून राहावे लागेल.

 

संधीचे सोने – मराठी बोधकथा,
सुंदर विचार

 

संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha
संधीचे सोने – मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha

 

बोधकथा, खरा पुण्यवान | मराठी कहाणी

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi | सुंदर विचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here