Marathi Bodhkatha | marathi kahani | Story | बोधकथा | कहाणी

0
859
Marathi Bodhkatha -marathi kahani - Story - Good Thoughts In Marathi - बोधकथा - कहाणी - vb
Marathi Bodhkatha -marathi kahani - Story - Good Thoughts In Marathi - बोधकथा

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती.
तिथे आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला. व केस विचारू लागली.

इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळ्याला तो कंठा म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली
व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले.

मौल्यवान असा कंठ्यामधे हिरे जडलेले होते. कठोर असा हिऱ्यावर चोच मारून मारून
तो थकला व त्याने तो खाण्याचा नाद सोडुन दिला.

तो कंठा तसाच लटकत ठेवत त्याने आकाशात भरारी मारली…
ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की
आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे.

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

इकडे तिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना…! शेवटी ती रडत रडत राजा कडे गेली
व म्हणाली… महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे.
तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.

राजा म्हणाला.. दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला तोच कंठा कशाला पाहिजे…?

राणी ने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणुन हट्ट धरून बसली.
राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजन तो शोधु लागले, पण कोणाला काही तो
कंठा सापडेना.

राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की, आज च्या आज तु सगळे सिपाई,
सैनिक, प्रजा… सगळे मिळूनं त्या हाराचा शोध घ्या.

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

अर्धे राज्य बक्षिस मिळेल या आशेने सर्वजण कामाला लागले.

सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली.

शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणरेड्या पाण्याच्या
नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घानरेडे होते की जवळुन जातांना
सुध्दा किळस यावी. दुर्गंध सर्वत्र पसरलेला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला
दिसुन येत होता.

हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी
मारली. सगळीकडे शोधले त्याने, पण हार काही मिळाला नाही.
हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहुन कोतवालाच्या मनातही
लोभ निर्माण झाला.

त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली.पण हार पुन्हा गायब
झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला. व
सगळे जण बक्षिसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार
कुणाच्याच हातात येत नव्हता.

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

सगळेजण उडी मारताहेत पाहुण मंत्री, सरदार ही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या
राज्याची हाव सुटली, व तेही घाणरेड्या पाण्यात उड्या मारू लागले, पण हार काही सापडेना…
जेव्हा कुणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई.

हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याचा वास सहन न झाल्याने पटकन
पाण्यातुन निघून बाहेर येई, व तो बाहेर पडताक्षनी हार पुन्हा दिसु लागे.

मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणरेड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले
हे राजांच्या कानावर गेले. व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर…
मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तिथे आला व त्याने
आपले राजवस्त्र उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली.

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

त्याच वेळेस तिथुन एक संत जात होते. त्यांनी राजाला उडी मारतांना पाहिले आणि ते मोठमोठ्याने हसु लागले…
त्यांनी विचारले हे काय चालले आहे…! सगळेजण असे चिखलात घाणीत का माखला आहात…?
राजा असणारा माणुस असल्या घाणरेड्या पाण्यात का उडी मारतो आहे…?

लोकांनी उत्तर दिले, राणी चा हार पाण्यात पडला आहे, म्हणुन सर्व जण पाण्यात
उड्या मारत आहेत, पण… उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होत आहे.

संत अजुनही मोठ्याने हसु लागले. लोकांनी त्यांना विचारले काय झाले…!
संत त्यावर म्हणाले… अरे वेड्यांनो, तुम्ही ज्या हाराकडे पाहुन पाण्यात उड्या मारत आहात…
तो हार झाडावर आहे आणि जे पाण्यात दिसत आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे.

खरा हार हा झाडावर आहे, आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजुन पाण्यात शोधत आहात.
लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक लज्जित झाले.

Marathi Bodhkatha | marathi kahani | Story
Good Thoughts In Marathi | बोधकथा | कहाणी

लक्षात ठेवा…..

मानवी जिवनाची पण आज त्या लोकां प्रमाणेच अवस्था झाली आहै.
जे आपल्या पाहिजे आहे… त्याच्या प्रतिरूपाकडे…
प्रतिबिंबाकडे पाहुन आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

खरे सुख, समाधान, शांती, मन स्वास्थ है शोधण्यापेक्षा
आपण त्यांची प्रतीरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत.
यातुन काही मिळविण्यापेक्षा…
आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत.
खरे आहे ना…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here