मराठी गमतीदार कविता | लापसी | Marathi Kavita Laapsi | Funny
ऊसाला झाली दोन मुले…. मोठा मुलगा गुळ आणि धाकटी मुलगी साखर
दिसायला साखर गोरीगोमटी खूपच सुंदर…! गुळ मात्र बिचारा काळा कलुंदर
आणि ओबडधोबड.
पण साखर तशी स्वभावाला गोड…! तिच्यात उणेपणा शोधणे फारच अवघड.
गुळ मात्र स्वभावाला लई चिकट… दिसला समोर की ईतरांना वाटे संकट.
साखर तशी खूपच मनमिळाऊ… जाई जेथे तेथे मिसळुन जाई.
मराठी गमतीदार कविता | लापसी | Marathi Kavita Laapsi | Funny
गुळही गेला ईतरात मिसळायला… पण त्याला ते काही जमलेच नाही.
साखरेला गर्दीत शोधणे असे… फार कठीण…!
गुळ मात्र गर्दीत ताबडतोब दिसे, कारण… तो होता ओबडधोबड.
साखरेचे रव्यावर प्रेम जडले…! लगेच बापाने दोघांचे लग्नच् उरकून टाकले.
त्यांना झाला एक गोडस मुलगा, दिसायला होता तो गोरागोरा
यथावकाश बारसे झाले…. नांव ठेवले शिरा.
आता ऊसाला खूप काळजी वाटु लागली गुळाची…!
आपल्या लाडक्या गुळासाठी मुलगी कुठे आणि कशी शोधायची…?
होते ऊसाला चांगले माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग…
सतत काळजी वाटायची… कसा जाईल काशीला हा संग…!
मराठी गमतीदार कविता | लापसी | Marathi Kavita Laapsi | Funny
पुष्कळ मुली बघितल्या… कुणीही मुलगी त्याला पसंत करीना…!
खूप काळजी वाटे ऊसाला… रात्रभर उसाला झोप येईना.
ऊसाला होता एक जवळचा मित्र… नांव होते त्याचे तूप.
त्यानेही खुप प्रयत्न केले… आणि ऊसाला आला हुरुप.
त्याने सुचविली मुलगी गव्हाची… जी दिसायला होती बेत्ताची.
धान्यकुळीत उच्च घराणे गव्हाचे… होते ऊसाच्या तोलामोलाचे…
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला… ठरणार नाही फोलाचे.
अंगाने ती होती चांगलीच जाडजुड आणि लठ्ठ… रुपाला साजेसे…
नांंव होते तीचे भरड.
मराठी गमतीदार कविता | लापसी | Marathi Kavita Laapsi | Funny
मुलीच्या रुपाची गव्हाला होती कल्पना, मग करतो कशाला नुसत्या वल्गना…?
शेवटी दिला होकार…! गुण जुळले दोघांचे… शेवटी लग्न जमले
आणि तयारीला सगळे लागले.
किचन ओटा झाला लग्नासाठी बुक… स्वयंपाकघरही पण सजविले खुप.
भरड ला तूप कढईत घेउन गेले… तिथेच तीचे खरपुस मेक – अप पण केले.
भरपुर लाजली भरड आणि गुलाबी झाली…
गरम पाणी कढईत शिरले, आणि भरड झाली शराबी
लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले…
आणि हळुच त्याने गुळाला कढईत पाचारीले.
मराठी गमतीदार कविता | लापसी | Marathi Kavita Laapsi | Funny
गुळाने केला कढईत प्रवेश… आणि उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश.
मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला… भरडीचे रुप पाहुन,
वेळ नाही लागला पाघळायला.
काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता… कढईचे झाकण लावण्याची
भटजीने घेतली दक्षता.
काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी…!
थाटामाटात बारसे झाले… नांव ठेवले लापशी
आवडली ना…!