Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता | नवरा

0
2810
Marathi Kavita On Navra - नवऱ्यावर सुंदर मराठी कविता - नवरा
Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता

Marathi Kavita On Navra |
नवऱ्यावर सुंदर मराठी कविता 

navra-marathi-suvichar-sunder-vichar-kalji-suvichar-nawara-bayko-good-thoughts-in-marathi-on-life-vb-vijay-bhagat
Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता
जर घरी नसेल नवरा तर…
मोठा बंगला पण ओसाड आहे
आपल्या नवऱ्याला मान ना देणे
क्षमा न करणारा गुन्हा आहे…!
तसे पाहिले तर नवऱ्या शिवाय
घरातील कोणतेही पान हालत नाही…
घरातील कुठलाही आनंद
नवऱ्या शिवाय फुलतही नाही…!
फक्त नोकरी आणि पगारा शिवाय
असते तरी काय नवर्‍याजवळ…?
असे बोलणाऱ्यांना सांगावे तरी
आता कसे आणि काय…?
साफसफाईचे पवित्र घर मुळीच
नवऱ्यानेच घेतलेले असते. पण..
फक्त विलक्षण माणूस म्हणून…
बायको त्याला हसत बसते…!

husband poem marathi

संकुचित पगार असून सुद्धा
सर्वांना त्यास पुरवायचे असते…
म्हणूनच नवऱ्याचे वय नेहमी
बायको पेक्षा जास्तच असते…!
नवऱ्याचा गुन्हा काय तर…? म्हणतात
तो खूप काटकसर करायला लावतो…!
परिवाराच्या सुखासाठी बिचारा नवरा
रात्र आणि दिवस कष्ट करतो…!
अधून मधून चिडतही असेल
त्याची सहनशीलता संपल्यावर…
आता तुम्हीच सांगा काय होणार
घरचे आणि बाहेरचे ऐकल्यावर…?
आपल्याच नवऱ्याची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका…
नेहमीच त्याला मूर्ख ठरवून
प्रेमळ पत्नीचे आपले स्थान गमवू नका…!
नवरा म्हणजे अंगणा मागचा
बायको म्हणजे यात ठेवलेला
पवित्र अमृत घडा…!
आपला नवरा म्हणजे… सप्तरंगी
इंद्रधनुष्या मागचे निळेभोर आकाश…!
आपली सुंदरता खुलवणाऱ्या कुंकवा मागचे
भव्य आणि दिव्य निस्वार्थी कपाळ
बायको… कधी नवऱ्याकडे
 तो माणूस आहे म्हणूनही पाहा…
त्याचे मन जाणण्यासाठी
थोडे समजून – उमजून रहा…!
कधीतरी चार चौघात
त्याचे ही थोडे कौतुक करावे…
त्याच्या अबोल दुःखाचे
एक तरी गीत नक्की लिहावे…!
घरासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व नवऱ्यांना  मनापासून समर्पित….

नवरा बायको प्रेम | सुंदर विचार | Husband Wife Relationship

Poem on Wife In Marathi | बायकोवर मनभावन कविता | bayko kavita

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here