Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता [1]

2
1326
Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता

Marathi Moral Story | मराठी बोधकथा |
निर्णय क्षमता [1]

मराठी-बोधकथा-निर्णय-क्षमता-Marathi-Moral-Story-vb-good-thoughts-मराठी-कहाणी-good-thoughts-in-marathi-on-life-marathi-story
मराठी बोधकथा – निर्णय क्षमता – Marathi Moral Story 

मराठी बोधकथा – निर्णय क्षमता – Marathi Moral Story 

ही लहानशी कथा माझ्या वाचनात आणि ऐकण्यात ही आली आहे. 
कथा जरी लहान असली तरी त्यातला बोध खूपच मोठा आहे…! 
 
एकबुर्बेन्स नावाचेगृहस्थ होते आणि त्यांनी एक गाढव पाळले होते. 
त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. 

वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला
हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे…!
दोघेही अगदी आनंदाने जगत होते.

एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी
दुसऱ्या गावी जायचे होते… गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी
विचार केला की गाढवासाठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे…
कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील
दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो. 

Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता 

 
गृहस्थ गावी गेले… आणि आपले काम पूर्ण करून एक महिन्यानंतर परत आले… 
बघतात तर… गाढव मृत्यू होऊन पडलेला आहे….!   हे असे कसे घडले…? 
गृहस्थ विचार करायला लागले… रस्त्याकडेला दोन्ही बाजूला भरपूर हिरवागार
गवत आहे… आयुष्यभर ही खाल्ले असते तरीही ते संपले नसते… एवढे असूनही
गाढव उपासी राहून का मेला असावा…? गृहस्थांना काही कळत नव्हते…!

मित्रांनो…. 
नेमके झाले असे होते की… त्या गाढवाचा निश्चय होत नव्हता की….
पहिल्यांदा रस्त्याच्या कोणत्या बाजूचे गवत खायला पाहिजे…?
या बाजूचेखायचे…? की त्या बाजूचे खायचे….? 
पूर्ण महिनाभर असे करता करता गाढवाने कोणत्याही बाजूचेगवत 
खाल्ले नाही आणि त्याचा भुकेने मृत्यूझाला…!

कथेचा तात्पर्य : 

निर्णयकरण्याची क्षमता नसली तर मोठे नुकसान ठरलेले असते.

Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता 

 

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi | Bodh Katha

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here