Marathi Motivational Speech | चिंता, दुःख, टेन्सन विसरून जाल

1
523
Marathi Motivational Speech - चिंता, दुःख, टेन्सन विसरून जाल - vb good thoughts
Marathi Motivational Speech - चिंता, दुःख, टेन्सन विसरून जाल

नमस्कार मित्रहो,
सतत काळजी करून स्वतःला त्रास देऊ नका.
आजच्या या Marathi Motivational Speech मध्ये तुम्हाला
सांगणार आहे की नेहमी विचार केल्याने….
काळजी केल्याने तुम्हाला त्रास होतो.
तुमच्या आयुष्याला त्रास होतो. तुमचे नाते दुखावते.
सुंदर आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या पोस्ट मध्ये
हे प्रेरणादायी भाषण लक्षपूर्वक वाचा आणि या प्रेरणादायी लेखा मध्ये
जे सांगितले आहे ते प्रत्यक्षात आणा.

Motivational Suvichar |
आयुष्य बदलण्यासाठी सुंदर प्रेरणादायी
सुविचारांचा खजाना | Marathi Suvichar

नमस्कार मित्रहो,
मी विजय भगत आपल्या सर्वांचे हार्दिक
स्वागत करतो. सर्वांना शुभ दिवस.

मित्रहो, मी तुमच्यासाठी सुंदर असे विचार,
सुंदर असे सुविचार आणत असतो…
जेणेकरून आपले आयुष्य घडेल.
आपल्याला आलेले टेन्सन दूर होईल.
आपला तणाव नष्ट होईल.
असे विचार घेऊन येत असतो.

त्यातून आपले मन फ्रेश होते.
डोके फ्रेश होते. आणि सकारात्मक
उर्जा मिळत असते.

Marathi Motivational Speech

मित्रहो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो…
आयुष्य खूप सुंदर आहे… आयुष्य चांगले
आहे… फक्त आपण त्याकडे तसे बघितले
पाहिजे. आपण बघत नाही.

मित्रहो एक विनंती करतो तसे बघा तुम्ही.
बघा एक ही दिवस तुमचा दुःखात जाणार नाही.
टेन्सन कोणाला नाही. टेन्सन प्रत्येकाला आहे.
टेन्सन हे असतेच. कुणीतरी म्हटलेय बघा मिठा
शिवाय जेवणाला चव नसते. खरचं आहे ते.

म्हणून मित्रहो टेन्सन जरी असले तरी
विचार नाही करायचे. त्याला वाटा असतात.
मार्ग असतात. आणि एक ना एक दिवस मार्ग
निघत असतो. आणि तो मार्ग काढायचा असतो.
असो तुम्ही काढणार हे नक्की आहे.

मित्रहो आजही तुमच्यासाठी सुंदर असे विचार
घेवून आलो आहे. सुंदर सुविचार घेऊन आलो
आहे. करूया सुरुवात.

Marathi Motivational Speech

Marathi Motivational Speech - marathi suvichar - vb good thoughts - vijay bhagat suvichar
Marathi Motivational Speech – marathi suvichar – marathi quotes

कधी कधी आयुष्यात अशी ही वेळ ही येते की
आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस
दूर होतील…? का पुन्हा पुन्हा त्याच त्याच
अडचणी… तेच तेच संकट माझ्या आयुष्यात
येतात हे सगळे केव्हा संपेल..?

मी आता हे सहन नाही करू शकत.
प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर
येऊन उभा असतो.

Marathi Motivational Speech
दुःखाचे चार कारणे 

माहीत आहे का या चार कारणांमुळे….
या चार कारणांमुळे आपल्या आयुष्यात
दुःख हे नेहमीच येत असते.

दुःखाचे पहिले कारण 

पहिले म्हणजे नात्यांमुळे दुःख येते.
आपले ज्यांच्या सोबत एक नाते असते
त्यांच्याशी आपले भांडण होते. किंवा
अजून काहीतरी असू शकते.

बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो
त्यामुळे ते खूप दु:खी असतात. ते त्याच गोष्टीचा
इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून
बाहेर पडताच येत नाही.

ते फक्त त्यांचा विचार करतात…
ते ज्यांच्यावर प्रेम करत होते.
पण त्याला त्याची काहीच पर्वा नसते.
म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा
जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा.
तुमच्या आई वडिलांचा विचार करा.

खरेच असे काहीजण असतात जे आपल्यावर
मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
आणि असे जर काही झाले ही असेल तर त्याला
तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा.
कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा
होणार नाही.

जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल
तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी
राहायला लागाल.

दुःखाचे दुसरे कारण 

दुसरे म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात.
त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांच्या आयुष्यातला
टेन्सन हे पैसामुळे असते, तर काहींना काम मिळत
नाही किंवा काहींच काम नीट चालत नाही किंवा
काहींच्या कामात कॉम्पिटिसन्स येवून जातात.

कधी खूप खर्च येवून जातो. कधी काय होते तर
कधी काय होते. त्यामुळे खूप टेन्सन्स येतात.

Marathi Motivational Speech
दुःखाचे तिसरे कारण  

तिसरे दुःखाचे कारण आहे… काहींना त्यांच्या
शरीरात काही आजार होऊन जातो. काहीतरी
त्रास होतो. त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू
शकत.

बऱ्याचशा खण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ
नाही शकत. त्रास होतो खूप सारा. त्यामुळे
खूप टेन्सन येते.

Marathi Motivational Speech
दुःखाचे चौथे कारण  

चौथे कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरच आहे
ते म्हणजे मनाचे दुःख तुमचे मन. आपल्या आजूबाजूला
ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके
अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अटकून राहते
आणि तेच तेच विचार करत असते.

बघा ना कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याचे
पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे
आपल्याला जास्त त्रास होतो.
पुन्हा पुन्हा मागचे विचार करतो.
पुढे काय होईल याचे विचार करतो आणि
ते दुःख त्यामुळे वाढत जाते.

किती ते दुःख… नात्यांचे दुःख… पैशांचे दुःख…
हेल्थ चे दुःख…. या दुःखांचा आपल्या जीवनावर
सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण
आपल्या मनाशी हारून जातो.

जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो कि
आता मी काहीच करू शकणार नाही.
जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे
काही संपले. आता काहीच नाही उरले आहे
माझ्याकडे. इतके दुःख मिळाले आहे जीवनात
की आता काही करायची हिम्मतच नाही.

Marathi Motivational Speech

एक व्यक्ती त्याच्या मुलासोबत नदी किनारी
फिरत होता. फिरता फिरता तो विचार करत होता.
कारण त्याच्या आयुष्यातही खूप दुःख होते तो
त्यांचाच विचार करत होता.

तो देवाशी बोलत होता,
त्यांना प्रश्न विचारात होता की
का माझ्या सोबत असेच होते….
का..? तो खूप उदास होता.
की असे वाटते कि मरून जावे
पण काय करू माझा परिवार आहे.
मी ते पण नाही करू शकत.
असा विचार करत तो नदी किनारी
फिरत होता.

Marathi Motivational Speech

त्याचा मुलगा खेळत होता.
चालता चालता त्याला ठेच लागली
आणि ठेच लागल्यावर तो पडून गेला
आणि पडल्यावर त्याला एक मडका
दिसला, ज्यात काही वेगवेगळ्या रंगाचे
खडे होते.

ते बघून त्याला जास्त संताप आला कि
अरे मलाच पडायचे होते…? पहिलेच माझ्या
आयुष्यात इतके सारे दुःख आहेत अजून मी
पडून गेलो. हेच व्हायचे बाकी होते.

त्याला वाटले सगळे चे सगळे त्रास
मलाच का होतात….? जेव्हा देवाला मी
माझे दुःख सांगतोय तेव्हा तो मला
अजून त्रास देतोय आणि त्याला मनातल्या
मनात खूप संताप यायला लागला.

तो दुःखी होऊन बसून गेला आणि जेव्हा
त्याला तो मटका दिसला त्याने त्या मडक्यातले
रंगीबेरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला
सुरुवात केली.

Marathi Motivational Speech

त्याचा तो राग शांत करण्यासाठी तो ते दगड
पाण्यात फेकू लागला. त्याने सगळे दगड नदीत
फेकून दिले. आणि त्याच्या लहान मुलाने एक
खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा
त्या खड्याशी खेळत बसला होता.

त्याच्या वडिलांना वाटले की ठीक आहे हा
खेळतोय तर खेळू दे, तो म्हटला कि चाल
आपण घरी जाऊ आणि ते घरी जायला लागले.

जेव्हा ते घरी जात होते, रस्त्यात त्यांना
एक माणूस भेटला, त्या व्यक्तीचे लक्ष त्या
मुलाच्या हातातल्या त्या खड्याकडे गेले
त्या व्यक्तीने सांगितले कि तुमच्या मुलाच्या
हातात जो खडा आहे तो मला द्याल का….?
तुम्ही तो मला विकाल का….? त्या बदल्यात
मी तुम्हाला हवे ते देईन.

motivational speech in marathi

त्या व्यक्तीला थोडे विचित्र वाटले.
या खड्यासाठी हा मला काहीही
द्यायला तैयार आहे.
या व्यक्तीला या खड्याला का
विकत घ्यायचे असेल…?
त्याने सांगितले ठीक आहे मला
काय फरक पडतो.
किती पैसे द्याल याचे…?

तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले…
हा काही साधारण खडा नाही आहे,
हा खडा खूप किंमती आहे. आणि
याची किंमत करोडोंमध्ये आहे आणि
याच्या बदल्यात मी तुला हवे तितके
पैसे देऊ शकतो.

Marathi Motivational Speech

जेव्हा त्याने या व्यक्तीचे म्हणणे ऐकले
त्याला आश्चर्य वाटले. अरे मला तर या
खड्यांनी भरलेली मटकी भेटली होती
आणि मी सगळे साधारण खडे समजून
फेकून दिले. आणि तो व्यक्ती परत परत
त्या नदीकिनारी गेला ते खडे शोधण्यासाठी
पण त्याने ते पाण्यात फेकले होते आणि
तिथे ते नव्हते.

या गोष्टीतून आपल्याला खूप छान
शिकायला मिळते, जेव्हा तुम्हाला कधी
ठेच लागेल ना म्हणजे तुमच्या आयुष्यात
कुठलाही प्रॉब्लेम येईल ना तेव्हा हरवून
जाऊ नका. असे समजा की त्यातून तुम्हाला
काहीतरी शिकायला मिळणार आहे.

ते तुमच्यासाठी झाले आहे. त्यातही तुमच्यासाठी
काहीतरी खजाना लपला आहे फक्त त्यावेळी
आपल्याला ती गोष्ट समजत नाही आणि
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण
प्रत्येक वेळी…. प्रत्येक क्षणी…. विचारात
अडकलेलो असतो.

दुःखांचा विचार करत असतो
अडचणींचा विचार करत असतो
की मी हरवून गेलो माझे असे झाले,
माझे तसे झाले मला सुख नाही आहे
असे विचार करून आपण आपल्या
अनमोल जीवनाला वाया घालवतो

motivational speech in marathi

जगण्याची किँमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे
वेळच नाही आहे जगण्यासाठी. त्यांना एक एक
क्षणाची किंमत माहित असते. त्यांना वाटते कि
काश मी अजून थोडावेळ जगू शकलो असतो
आणि काही जण त्यांच्याकडे वेळच वेळ असतो
ते वेळ वाया घालवतात फक्त आणि फक्त विचार
करण्यात वाया घालवतात म्हणून तसे करू नका
तुम्ही तुमच्या मनाने हारु नका.

कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या
तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो
तुम्ही जर मनात ठेवले ना… मला कुठल्याही गोष्टीचा
काहीच फरक पडत नाही. तुमच्या मनाने असे ठरवले ना
तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही.

Marathi Motivational Speech | चिंता, दुःख, टेन्सन विसरून जाल

Marathi Motivational Speech

जीवन म्हणजे
शोधला तर अर्थ आहे
नाहीतर नुसता स्वार्थ आहे.

*******

तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा
तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी
आहात… हे जास्त महत्त्वाचे असते.

*******

प्रसंसा चारित्र्याची झाली पाहिजे…
चित्राची नव्हे. कारण चित्र बनवायला
काही दिवस लागतात पण चारित्र्य
बनवायला पूर्ण आयुष्य लागते.

*******

देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे
दिलेले आहेत. परंतु त्यातून शब्दांचे बाण असे
सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद
नाही तर स्पर्श झाला पाहिजे.

*******

केवळ कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात
एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट विचार
बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून
समोरा समोर त्या व्यक्तीशी संवाद साधून
मगच खात्री करावी.

*******

जीवनात पुढे जाण्यासाठी उशीर झाला
म्हणजे हरणारच असे नाही. अनेकदा
उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो.

*******

Marathi Motivational Speech

देवळातला देव सहज ओळखता येतो
पण माणसातला देव ओळखायला
पूर यावा लागतो. मग तो पाण्याच्या
असो अथवा भावनेचा.

*******

कमकुवत लोक सूड घेतात
मजबूत लोक क्षमा करतात.
आणि
बुद्धीमान लोक दुर्लक्ष करतात.

*******

दुसऱ्याची चूक असतांना स्वतःला
त्रास करून घेणे… हा सुद्धा क्रोधाचा
प्रकार आहे.

*******

राहते घर किंवा घराचा दरवाजा कितीही
छोटा असला तरी चालेल. पण मनाचा
दरवाजा मोठा असावा. कारण….
असते तिथेच विसावा घेतात.

*******

विचार करण्याची पद्धत सुपा प्रमाणे असावी
दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे
शिल्लक ठेवायचे.

*******

निर्मळ मन हे गणितातील शून्या सारखे
असते. ज्याच्याकडे असते त्याची किंमत
नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते.

*******

Marathi Motivational Speech

इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि
संस्काराने बना कारण माणसाचे चेहरे
कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच
असतात. मात्र माणसाचे विचार आणि
त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत
नसतात.

*******

खरे नाते एक चांगल्या पुस्तकासारखे
असते. ते कितीही जुने झाले तरीही
त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत.

*******

अभिमान आणि गर्व यातील
अंतर जी व्यक्ती समजू शकते…
तीच व्यक्ती आयुष्य आनंदात
जगू शकते.

*******

Marathi Motivational Speech

जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या
अंगात आहे, तो भूतकाळात काय घडले याचा
विचार न करता वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ
यांचा विचार करून पुढे चालतो.

*******

स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही
गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटे नाही
जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही
आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.
धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल.

*******

आपल्याला सुखी व्हावे किंवा आपले जीवन
सुंदर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते.
अर्थात नुसते वाटून उपयोग नाही. त्यासाठी
आपणही काही प्रयत्न करायची. त्यासोबत

निदान तीन गुण तरी आपल्याकडे असावेत
असे अगदी ढोबळ मनाने सांगता येईल.
हे तीन गुण म्हणजेच मनात सर्वांविषयी
प्रेम पाहिजे. आपल्याला पुरेशे ज्ञान पाहिजे.
आणि काम करण्याची इच्छा पाहिजे.

*******

Marathi Motivational Speech

ताज्या फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते
आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आणखी
आनंद होतो. फुले घेतांना ती माझी असतात
पण देवाला वाहिली की त्यांची होतात…

किती शांतपणे हे आपण स्वीकारतो अगदी
अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले फक्त
हा भाव मनात असतो.

त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात.
निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ
मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो.

त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो.
अपेक्षा नसते. हे कसे सोडू हा प्रश्न नसतो.
पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.

अगदी तसेच आपली दुःख त्याच्या चरणावर
व्हायची आणि शांत होऊन जायचे. त्यांच्याप्रती
कोणती भावना बांधून ठेवायची नाही.

आतापर्यंत जी माझी दुःख होती ती आता
त्याची झाली. त्यांच्या कसला विचार करायचा
आणि कालची दुःख तर आज निर्माल्य झाली…
त्यांच्या मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून
बसण्याच्या काहीच उपयोग नसतो.

शिड्या फुलाप्रमाणे मग ती सडायला लागतात
आणि मग मनाला पोखरायला लागतात.
म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंतच
गंगार्पण करून मोकळे व्हायचे.

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू या
धान्याची पेरणी करतांना जशी जमिनीची
मशागत करतात, तशी मनाची साफसफाई
करू. आणि तिथे आनंद पेरूया. तो शतपटीने
उगवून येतो. त्याची जोपासना करू.

त्याच्या परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच
दुःख सोडून द्यावे, निर्माल्य बनून जाते.
आनंद पेरत जावा समाधान बनून राहते.

*******

Marathi Motivational Speech

एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचा
घाव घालत होते. मी विचारले किती वर्षे
झाली हातोडी आणि ऐरणीला…..?
लोहार दादा म्हणाले हाथोड्या अनेक
तुटल्या. पण अहिरण मात्र तशीच आहे.

मी विचारले असे का….? तेव्हा त्यांनी खूप
सुंदर उत्तर दिले. घाव घालणारे तुटतात
पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाही,
तर ते कणखरपणे उभे असतात आपणही
असेच उभे राहिले पाहिजे.

*******

आणि मित्रहो आता
जाताजाता आईसाठी
चार शब्द….!

आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी
भाजता भाजता हाताला किती बसले
चटके… आईने कधी मोजलेच नाही.

नवऱ्यासह लेकरा बाळांचे करता-करता
मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा
वाकली गेली, आईने कधी मोजलेच नाही.

जरा चुकले की घरच्यांची बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली, काळजाला किती
घरे पडली, आईने कधी मोजलेच नाही.

याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही
कुणासाठी, जगता जगता स्वतःसाठी
असे किती जगली आईने कधी मोजलेच
नाही.

पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावण पूर
पैशाच्या हा नुसता धूर
निसटून गेली कोणतीच उर
आईने कधी मोजलेच नाही

*******

Motivational Suvichar |
आयुष्य बदलण्यासाठी सुंदर प्रेरणादायी
सुविचारांचा खजाना | Marathi Suvichar

50+ Motivational Quotes In Marathi

75+ Best Motivational Quotes In Marathi

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here