जर तू डोळे फिरविले तर मी मरून जाईन…!
फक्त आज एक ओंजळी पाणी दे मला
जीवनभर तुझ्या कामातच येईन…!
आज जर का तु मला जीवदान दिले…
तर मी तुला जगायला प्राण वायू देईन…!
जर तु मला जागविलास…
तर तुझ्या देवांसाठी खूप फुले देईन…!
जर तु मला फुलविले…
तर मी तुझ्या मुलाबाळांना फळे देईन…!
मी मोठा झाल्यावर लखलखत्या उन्हामध्ये
तुझ्या परिवाराला सावली देईन…!
तुझ्या लहान बाळांना खेळण्यासाठी
मी माझ्या फांद्यांवर त्यांना झोका देईन…!
तुझ्या आवडत्या फुल पाखरांना
आपल्या मायेचा मी घर देईन…!
जर का कधी तु आजारी पडला तर…
तुझ्या औषधाला कामी येईन…!
जर का मी आपले वचन नाही पूर्ण करू शकलो…
किंवा झालो जरी मी अप्रामाणिक तरी….
मी तुझ्या शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन…!