50+ जीवनावरील प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो
सुंदर विचार | Marathi quotes With Images
नमस्कार मित्रांनो…
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये मी सुंदर मराठी प्रेरणादायी असा मराठी सुविचारांचा संग्रह
केला आहे… आणि मला विश्वास आहे की हा मराठी सुविचार संग्रह
तुम्हाला नक्कीच आवडणार.
या मध्ये जीवनावर आधारीत प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो सह आहेत…
तसेच सुंदर विचार, छान विचार, मराठी सुविचार, सकारात्मक सुविचार,
सुंदर सुविचार मराठी, लहान सुविचार मराठी
Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language, Good thought ,
Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote,
Positive Quote, Chhan Vichar Marathi , Marathi Quote ,
Marathi Thought Status , Suvichar Photos , अशा विविध प्रकारचे
मराठी सुविचार शेयर करीत आहे.
सुविचार कसे वाटले आणि तुम्हाला आणखीन कशा प्रकारचे
मराठी सुविचार पाहिजे आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद….
50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी | Sunder vichar
जीवनात लोकांकडे
जास्त लक्ष देऊ नका
कारण प्रत्येक जण हा
तुम्हाला आपापल्या
मानसिकते नुसारच
बघत असतो.
माणसाच्या जीवनातील संकटे
ही यशाचा आनंद घेण्यासाठी
आवश्यकच आहेत…!
ओळखी मधून केलेली सेवा
जास्त दिवस टिकून राहत नाही.
परंतु सेवेमधून झालेली ओळख
जीवनभर टिकून राहते.
मनातील अबोल संकेत
न बोलताच ज्यांना कळतात
त्यांच्या सोबतच मनांची
खोल नाती जुळतात.
एखाद्या स्वाभिमानाला
त्याचा अभिमान समजू नका
कारण प्रत्येकाची जगण्याची
तत्त्वे ही वेगवेगळी असतात.
समाजात जो माणसाचे
भाव ठरवतो
तो स्वभाव असतो…!
सुख आणि दुःख
हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मनस्थितीवर
जास्त अवलंबून असतात.
सुख हे ओंजळीत आलेल्या
पाण्यासारखे असते.
जर वेळेवर उपभोगले नाही…
तर ते लोप पावून जाते.
निखळ हास्याची व्याख्या
ही श्रीमंतीने नाही….
तर समाधानी मनाने तयार होते.
तोच माणूस शुन्याला किंमत
देऊ शकतो…
ज्याने कष्ट करून
शून्यातून आपले जीवन घडविले…!
शक्ती आल्यावर प्रत्येक पाखराने
आकाशात नक्कीच उडावे…
परंतु ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
त्या घरट्याला कधीही विसरू नये.
सर्वांच्या स्वभावाची
पारख केली जाते
त्यांच्यातील गुणांची नाही…
कारण… सर्व गुणांच्या पलीकडे
जाणारा स्वभावच श्रेष्ठ असतो.
अनेक लोक प्रेमात असून सुद्धा
सोबत नसतात.
तर काही सोबत असतात…
परंतु प्रेमात नसतात.
सोडून दिलेल्या भावना
ह्या विरघळलेल्या
चॉकलेट सारख्याच असतात.
फ्रिजमध्ये ठेवल्यावरही
पुन्हा पुर्वी सारखा आकार
घेत नाही.
अशा ठिकाणी आपले
ओझे आणि मन हलके करावे…
ज्या ठिकाणी ते अगदी
सुरक्षित राहतील…!
चुकीची आणि वाईट माणसे
भेटल्याशिवाय
योग्य आणि चांगल्या माणसाची
किंमत समजतच नाही…!
लोकांच्या भावनांपेक्षा
तुमचे मानसिक सुख
हे सुद्धा
फार महत्त्वाचे आहे.
जीवनातील काही स्वप्न
अगदी लाजाळुच्या
झाडासारखी असतात….
स्पर्श करताच मिटून जातात…!
पावसाला माहितच नसते की…
या मातीतून काय उगवणार आहे.
तो तर फक्त मनसोक्त
कोसळून जातो.
जीवनही असेच जगावे…
कधी होणार… काय होणार…
कसे होणार… हे न बघता
फक्त मनसोक्तपणे जगावे
जीवनात नेहमी लक्षात ठेवा…
तोंड बंद ठेवणारा मासा
कधीही गळात फसत नाही.
स्वतःची तुलना
कधीही करू नका.
कारण सगळीच फुले
एकाच वेळी फुलत नसतात.
दुसऱ्याला समजून घेण्यासाठी
आधी स्वतःलाच
समजून घ्यायचे असते.
आपले म्हणून प्रत्येकाची
काळजी घेता आली की
आयुष्यात परके म्हणणारी
कोणी उरतच नाही…!
या जगात फक्त एक
गरजच आहे….
जिने माणसांना माणसांसी
जोडुन ठेवले आहे…!
जीवन ही एक अशी ट्रेन आहे…
जी जन्मापासून मृत्यूपर्यंत
सुख-दुःखाच्या प्लॅटफॉर्मवर
थांबत असते. आणि…
आपल्या अनुभवाचे
तिकीट घ्यायला भाग पाडते.
आयुष्यात अशी झेप घ्यायची की…
आपल्याला नाव ठेवणाऱ्यांची
झोप उडाली पाहिजे…!
जीव लावणारी माणसे
सोबत असले की
आनंदाचे क्षण साजरे करायला
चांगली मज्जाच येते.
जर जगाच्या पाठीवर
ओळख बनवायची असेल…
तर अहंकाराचा काळोख
मिटवावा लागतो…!
अहंकार हा दारूप्रमाणे असते…
स्वतःला सोडुन
सगळ्यांना माहीत होते की
याने चढवलेली आहे.
स्टेटस वर
अंदाज लावायचे सोडून द्या
जीवन काही
इतके लहान नाही की…
चौकटीत मांडता येईल…!
मी आहे म्हणूनच सगळे आहेत….
यापेक्षा सगळे आहेत म्हणूनच
मी आहे. जर असा विचार ठेवला तर
जीवनात कधीच एकटे वाटणार नाही.
जीवनात पडल्याशिवाय
स्वतःला सांभाळण्याची
कला निर्माण होत नाही.
[…] प्रेरणादायक सुविचार […]
[…] 50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी […]
[…] Good Thoughts in Marathi प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार […]