Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

3
1253
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

Marathi Quotes On Love,
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…
काही marathi quotes on love, love quotes in marathi,
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार, आणले आहेत.

हे Love Quotes In Marathi, आपल्याला भावना व्यक्त करायला
नक्कीच मदत करतील.

Marathi Quotes On Love,
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

प्रत्येकाच्या आयुष्यात
अशी एखादी तरी व्यक्ती
नक्की असावी….
जिच्याशी बोलून
सगळी टेन्शन दूर होतील.

प्रेम म्हणजे….
जर समजली तर भावना आहे.
केली तर मस्करी आहे.
मांडला तर खेळ आहे.
ठेवला तर विश्वास आहे.
घेतला तर श्वास आहे.
रचला तर संसार आहे
निभावले तर आयुष्य आहे.

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल.
खरे प्रेम ते… जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.

हे हि वाचायला आवडेल :-  प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

तुमच्या नात्याला कधीही
पावसा सारखे बनवू नका…
जसा पाऊस येतो आणि जातो.
तर तुमच्या नात्याला
हवे सारखे बनवा…
जे नेहमी तुमच्या सोबत असेल.

जे कालपर्यंत जे अनोळखी होते….
आज त्यांचा हृदयाच्या
प्रत्येक ठोक्यावर आदेश चालतो.

काच आणि नाती
दोन्ही खूप नाजूक असतात.
दोघांमध्ये इतकाच
अंतर असतो की….
काच चुकीमुळे तुटतो….
तर नाती गैरसमजाने.

एकाच व्यक्तीच्या प्रेमात
अनेकदा पडणे. ही एका
यशस्वी नात्याची व्याख्या आहे.

एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्काने रुसता
आले पाहीजे.
समोरच्याच्या डोळ्यातले पाणी
अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसते….
आपल्याला केवळ समोरच्याच्या
ह्रदयात राहता आले पाहिजे.

Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

कोणासाठी जीवनभर थांबणे
म्हणजे प्रेम…
कोणीतरी सुखात असल्याचा
आनंद म्हणजे प्रेम….
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम….
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…..

प्रेम हे
अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला
जगायचे आहे…..!
प्रेम हे
अशा व्यक्तीचा शोध आहे…
ज्याच्या विना आपण
जगूच शकत नाही.

खऱ्या नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे…
कारण जर एखादी सर्वगुण संपन्न
व्यक्ती शोधायला गेलात तर मग
एकटेच राहाल.

तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की…
एखाद नाते तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“ हे नाते एवढा काळ का जपले….?

असे असावे प्रेम…
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम….
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम….
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.

Moral Story In Marathi – मराठी बोधकथा

मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो. कारण….
ते वेड समजुन घेण्यासाठी
कधीतरी मनापासून
प्रेम करावे लागते…!

एखाद्या दिवशी तुम्हाला
एक अशी व्यक्ती मिळेल….
जिच्या मागील गोष्टींची
तुम्हाला काळजी नसेल.
कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत
भविष्यात जगायचे असेल.

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो…..
गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असते….
वाट पाहायला लावणे तेव्हा बरे नसते…
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचे बंधन नसते…
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असते…

एका चुकीमुळे संपते ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करते
ते खरे प्रेम.

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे….
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या
सुंदर गुलाबासारखे असते…
परंतु त्याचा सुगंध अनुभवायला
आधी त्याच्या काटयांशी
खेळावे लागते…..!

असे जगावे की मरणे कठीण होईल…
असे हसावे की रडणे कठीण होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे…
परंतु प्रेम टिकवावे असे की….
तोडणे कठीण होईल…..!

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा…
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट….
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो…
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि
प्रेम म्हणजे काय असते.
तुम्ही प्रेम कोणावरही करा….
परंतु, ज्याच्यावर कराल
ते अगदी शेवटपर्यंत करा.
कारण प्रेम हे मौल्यवान असते.

कोणावरही इतकेच रागवा की…
त्यांना तुमची कमी जाणवेल.
पण इतकाही राग नका करू की….
ते तुम्हाला विसरून जगणे शिकतील.

नाते हे मनापासून असले पाहिजे….
केवळ शब्दाचे नाही….
रूसवा शब्दात असायला पाहिजे…
मनात नाही.

प्रेमामध्ये वाद नसावा….
संवाद असावा.
राग नसावा…..
अनुराग असावा.
जीव देणे नसावे….
जीव लावणे असावे.
तुमच्यासाठी काय पण नसावे…
तू तिथे मी असावे.

मला फक्त
तुला हसताना बघायचे आहे
जरी मी त्यामागचे….
कारण नसलो तरी चालेल.

ज्या व्यक्तीला
आपण आपले समजून जीव लावतो
ती आपल्या भावनांची कधीच
कदर करत नाही. आणि
जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि
भांडण नाही झाले तर…
मग ते नाते प्रेमाने नाही….
तर डोक्याने निभाव आहेत…
असे समजून जा.

जीवनात
नाते असणे आवश्यक आहे.
पण त्या नात्यातही जीव असणे
गरजेचे आहे. त्याशिवाय
लग्नाचे वाढदिवस आणि
शुभेच्छा चांगल्या वाटत नाहीत.

लोक म्हणतात की
प्रेम एकच वेळा होते…
परंतु मला तर एकाशीच
अनेक वेळा झाले आहे.

प्रत्येक नव्या गोष्टी
छान असतात. परंतु
तुझ्या जुन्या आठवणी
नेहमी मनाला छान वाटतात.

माझ्यात इतके कौशल्य नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन.
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल…
इतक्या अविस्मरणीय आठवणी
देऊन जाईन.

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.

Love quotes in marathi

प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून
प्रेम करावे.

खूप कठीण नसते
कुणाला तरी समजून घेणे.
समजून न घेता…
काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते….
कुणीतरी आवडणे.
पण खूप कठीण असते
कुणाच्या तरी आवडीचे होणे.
आपला अहंकार दाखवून
नाते तोडण्यापेक्षा….
क्षमा मागून…
नाते निभावणे चांगले आहे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता…
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून..
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता…
पण ती तुम्हाला भेटत नाही.
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे..
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागत आहे.

कोणतेही नाते तोडण्याआधी
स्वतःला एकदा नक्की विचारा की….
आजपर्यंत हे नाते का निभावले होते….?

कोणतेही नाते बनवणे
अगदी मातीवर नाते लिहीता येईल
इतके सोपे आहे. परंतु निभावणे
अगदी पाण्यावर पाणी
लिहीण्याइतके कठीण आहे.

आयुष्य हे एकदाच असते….
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते.
आपण दुसऱ्याला आवडतो….
त्यालाच प्रेम समजायचे असते.

Love Quotes In Marathi

marathi quotes on love - प्रेम समजायचे
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

एक सांगू….! काही आठवणी…
काही लोक आणि त्यांच्याशी
जोडलेली नाती…. कधी विसरता
येऊ शकत नाही.

जीवनाची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
जीवनातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
नुसत्याच कविता नाही सुचणार
त्या साठी एकदा तरी प्रेम करून बघा..

फुलांतून जसे सुगंध आणि
सूर्यातून जसा प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून
तुझे नाव येते.

आयुष्यात प्रेम करा….
परंतु प्रेमाचे
प्रदर्शन करू नका.

यदा-कदाचीत असे घडावे…
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावर तरी निस्वार्थी प्रेम करावे.

Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – कहाणी संग्रह

3 COMMENTS

  1. […] मीरा, राधा, रुक्मिणी…. ते राणी झाशी पण होती त्यांच्या सोबतीची सगळे सोडा… काय सांगू किती आणि कसे सांगू पुराणातले आणि इतिहासातले लिहण्याचा या पोथीचा आताच तर भीषण चित्र आहें महिला दिन साजरा करून त्यांचे एक दिवस गोडवे गाऊन विचारा एकच क्षण …. बस काय…. आपुल्याच मनाला…. तिचे अन्याय कुणाला सांगू आई…पायी स्वर्ग असतो तिच्या ताई बाई माई कुणी कुणीच एक हात द्या प्रेमाची साथ द्या सुटले नाही…. पाहू काही उपयोग का कीं वाचून फेका कचरा नुसता उद्या चे जैसे थें…. मानसिकता बदलण्याची गरज थोडीशीच आहें तिला काही नको… दृष्टी कोण मानवीय ठेवण्याची कोवळ्या कळी ला उमलू द्या फक्त जगु द्या फुलू द्या विश्वास द्या आश्वासक एक कटाक्ष द्या बस…….! Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर … […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here