35+ Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

1
3411
marathi-status-on-life-जीवनावर-आधारित-मराठी-प्रेरणादायक-सुंदर-विचार-quotes-on-life-जीवन-जगायला
marathi-status-on-life-जीवनावर-आधारित-मराठी-प्रेरणादायक-सुंदर-विचार-quotes-on-life-जीवन-जगायला

35+ Marathi Status On Life
मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

नमस्कार मित्रांनो……
या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी जीवनावर / आयुष्यावर आधारित
मराठी प्रेरणादायक सुविचार, सुंदर विचार, good thoughts in marathi on life,
life quotes, sunder vichar, motivational quotes on life in marathi,

जीवन जगात असतांना हे मराठी सुविचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील 
आणि जीवनात उपयोगी पडतील. हे सुविचार , छान विचार, चांगले विचार, 
जीवनातील कटू सत्य सांगणारे,,, आणि निराशेतून बाहेर काढणारे ठरतील 
आणि तुम्हाला नक्कीच आवडतील.   

 

जे लोक आपल्याला एक आनंदी व्यक्ती बनण्याची ऊर्जा देतात….
त्या लोकांचा सहवास नक्कीच वाढवावा. त्यांच्यावर प्रेम करावे…
जीवनात सकारात्मक परिणाम होणार आहे…. याचा विचार करायला तेवढा
आनंद नक्कीच पुरेसा होतो.
आनंद निर्माण करण्यासाठी जर कारणेच पाहिजे असतील तर आत्ता या क्षणी
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते….? नाही… नक्कीच नाही….
म्हणूनच मी तुझ्यावर तितकेच गाढ प्रेम करतोय.
खरे प्रेम कायम राहते… आणि त्या प्रेमाचे बंध जीवनभरासाठी कायम राहत
असतात… असे म्हणतात.
परिपक्व झालेले प्रेम खुप काही सांगत असते…. मी प्रेम करतो म्हणून मला
तुझी गरज आहे..
कपाळावरच्या नशीबाच्या रेषेचे काम तिचे ती करेल…. परंतु गोष्ट जीवनाच्या
प्रेमाची असल्यास ह्रदय नक्कीच ठरवेल…!
जे विश्वास ठेवून प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात… मग तेवढ्या
आनंदासाठी तेवढा सहवास पुरेसा आहे.
 
Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार
 
भावना ह्या अगदी
फिंगरप्रिंट स्कॅनर सारख्याच असतात.
योग्य पद्धतीने पोहोचल्या तरच
मनाला त्या अनलॉक करतात.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
 

35+ Marathi Status On Life
मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो
परंतु जीवन सुंदर करायला चार माणसे
जोडावीच लागतात.
जीवन नुसतेच जगून उपयोग नाही
तर ते सुंदर करणे गरजेचे असते…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
 

 

जेव्हा एखादी व्यक्ती मनातून उतरते… तेव्हा त्या व्यक्तीबद्दल मनात थोडी तरी
माया आणि प्रेम राहत नाही. आणि आपण ठरवून सुद्धा माफ करू शकत नाही…
इतकी ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेली असते.
परंतु एखादी व्यक्ती मनात भरली की मग ती अनोळखी असो किंवा ओळखीची….
आपल्या हृदयात त्या व्यक्तीबद्दल माया व प्रेम निर्माण होते आणि एक विशिष्ट जागा 
हृदयात निर्माण होते. मग ती व्यक्ती कशीही का असेना तरी पण…
म्हणूनच माणसाच्या मनाचा अंत कोणालाच लागत नाही… 
मग ते आपले असले तरीही किंवा दुसऱ्याचे….

मनाचे मन हेच मनाचे धन…

Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

 

जीवनात माणसाने नक्कीच वाकावे…
परंतु योग्य ठिकाणीच…!
नाही तिथे वाकले तर लोक लगेच
पायदळी तुडवून मोकळे होतात…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
 
दर दिवशी जीवन आपल्याला नवीन कोरे
चोवीस तास देते.
आता आपण भूतकाळाची झगडत बसायचे…
की भविष्याचा विचार करत बसायचे…
की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
आपल्यावर जे प्रेम करतात त्यांचे कौतुक करावे…
ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी…
ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करावी…
आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावे.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

स्वतःच्या मनाची इतकी पण
समजूत काढू नका की….
समोरचा कामात खूपच व्यस्त आहे.
काम सगळ्यांना असते….
विषय असतो तो बोलण्याची इच्छा असण्याचा…
ज्याची इच्छा असते बोलण्याची तो बोलतोच…
वेळ काढून…. बाकीचे कारण सांगत असतात….!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

जी गोष्ट तुम्हाला आव्हान देत असते….
तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवून शकते…!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

स्वतःला दाखवण्यासाठी नाही…
परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी
योग्य जागी उभे रहायचे आहे…!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

आयुष्याची लढाई
स्वतःच लढावी लागते…
लोकं साथ कमी आणि
ज्ञान जास्त देत असतात.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

जीवनात संकट आल्यावर माणसाला
वास्तु दोष… पितर दोष…. शनि दोष…
सगळे आठवतात फक्त…
आपलेच दोष दिसत नाही.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

 

तरुणपणात शरीराचे लाड करू नका…
जेवढे ध्येयासाठी धावायचे आहे  ते धावा….
परत ती शक्ती आणि वेळ तुमची साथ देत नाही.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

बरीचशी नाती या एका कारणामुळे
तुटतात की… समोरचा माझ्या
इच्छे अपेक्षे प्रमाणे वागला नाही.
समोरचा माणूस आहे मशीन नाही
तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही
तुमच्या मुडवर त्याला वापरतान…

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
माणसाची चूक असेल तर सुधारता येते
परंतु जर माणुसच चुकीचा असेल तर
मग सुधारणे कठीण असते.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

 

व्यक्ती आपल्या सैलरी च्या
हिशोबाने नाही… तर
आपल्या गरजांच्या हिशोबाने
गरीब असतो.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता
ज्यांच्याकडे असते…
त्यांची प्रगती साक्षात ईश्वर सुद्धा
थांबू शकत नाही.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 
जे काही ठरवले ते प्रत्यक्षात घडतेच असे नाही…
आणि जे काही घडते ते कधी ठरवलेलेच असते
असेही नाही. कदाचित यालाच जीवन म्हणतात.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

35+ marathi status on life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

 

देण्यासाठी दान…
घेण्यासाठी ज्ञान…
आणि त्यागासाठी
अभिमान सर्वात श्रेष्ठ आहे…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
 

जीवनात तुमच्या स्पर्धकाकडून

नेहमीच शिकत राहा…. परंतु

त्याला कॉपी करण्याची चूक

कधीही करू नका.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

जर स्वार्थ सोडला तर…
मनुष्याला आनंद
घेता ही येतो आणि
देता ही येतो.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा
सांभाळतो. परंतु लोक कौतुक खिळ्यावर
टांगलेल्या फोटोचाच करतात.
जीवनाचे देखील असेच असते….
 केलेल्या कामाचे श्रेय…
तुम्हाला मिळेलच असे नाही.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

 

प्रेम भले ही कुणाचे सौंदर्य पाहुनी होत असेल
परंतु संसार हा फक्त समजून घेणाऱ्या
व्यक्ती सोबतच होऊ शकतो.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

एका वडिलांच्या डायरीत खूप छान लिहिलेले होते….
माझ्या मुलगा तो पर्यंत माझा आहे जो पर्यंत त्याला त्याची
बायको मिळत नाही…! परंतु माझी मुलगी तो पर्यंत माझी आहे
जो पर्यंत माझे जीवन संपत नाही.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

35+ Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

एखाद्या व्यक्तीवर आपण रागावतो… चिडतो…. भांडतो… दूर जातो…..
आणि परत क्षमा मागत मागत जवळ येतो. आपण ज्या व्यक्तीवर इतके
हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला खूप प्रिय असते. पण… खरे पाहता
कधी कधी राग… मानसिक स्थिती इतकी मध्ये येते की भांडण सोडून एकत्र येणे
हा उपाय या मध्ये नसतेच…!
परंतु कधी असा विचार आला आहे का…? जर ती व्यक्तीच या जगात नसेल तर…?
ती व्यक्ती आपल्याला कायमचीच सोडून गेली असेल तर….? असे कुणाच्याही
जीवनात होऊ नये. परंतु झालेच तर….! कोणाशी भांडणार… बोलणार… चिडणार… 
कोणावर आपला हक्क गाजवणार…?  
जीवन खूप मोठे आहे आणि पाहायला गेले तर तितकेच लहान ही… 
खूप साऱ्या गोष्टी मनातल्या मनातच राहून जातात…! राग…. चिडने… बोलणे… 
सगळे काही असाववेच….! परंतु इतके ही नाही की… आपण त्या क्षणाला…. 
त्या व्यक्तीला…. गमावून बसू आणि नंतर पश्चात्ताप करण्या शिवाय दुसरे काहीच 
उरणार नाही…!  
कुणा वाचुन कुणाचे काहीच अडत नाही…. असे जरी सगळेच म्हणतात… 
तरीही कुठे ना कुठे ०.००१% ने तरी अडतेच…!

 

मग नाते कोणतेही असो… मैत्रीचे असो… प्रेमाचे असो… घरच्यां सोबत असो… 
ते सुंदरच असते. परंतु अति रागामुळे गोष्टी हातातून निसटून जाऊ नयेत… 
याची प्रत्येकाने काळजी घ्यावी…! जीवन एकदाच मिळते… ते रडत पडत जगावे… 
की जीवनाने दिलेल्या प्रत्येक धड्याला सकारात्मक घेऊन पुढे जावे. 
हे आपल्याच हातात असते…!

 

जे तुमच्यासोबत होऊ नये…
जर असे वाटते तर ते
इतरांसोबत करू नका.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

35+ Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

जीवनात अशा व्यक्तींना महत्त्व द्या
जी आपल्या पाठीमागे ही आपल्याशी
प्रामाणिक असतात.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

 

समोरच्याची बोलण्याची पद्धत
बदलली की…. आपण समजून
जायचे, आपली गरज आता संपली.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼 

 

जेव्हा चूक नसतानांही जवळचे
विरोधात जातात, तेव्हा माघार
घेण्याएवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलियुग आहे…
इथे खोट्याला स्वीकारले जाते
आणि खर्‍याला तोडले जाते.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
जेवढ्या वाईट दिवसांच्या सामना कराल
त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील…!

 

 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

कोणावर जास्त निर्भर राहू नका…
कारण गरजेच्यावेळी ओठातून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात…
परंतु एकदा का तहान भागली की…
मग पाण्याची चव आणि माणसाची
नियत दोन्ही बदलतात…!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

एखाद्या वेळेस आपण वाद होईल
म्हणून विषय टाळतो… आणि
समोरच्याला वाटते की….
हा चुकीचा आहे म्हणून
विषय बदलतोय.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

कधीकधी माणूस ना तुटतो…
ना विखरतो… बस थकून जातो…
कधी स्वतः बरोबर… कधी नशिबा बरोबर….
तर कधी आपल्यांच माणसां बरोबर…!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

हिम्मत नाही… तर प्रतिष्ठा नाही
विरोधक नाही… तर प्रगती नाही.

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

जर हातावरच्या रेषा बदलायचे असतील…
तर मेहनतीवर विश्वास ठेवा.
जर प्रयत्न भक्कम असतील…
तर नशिबाला ही वाकावे लागते
इतकेच लक्षात ठेवा…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस
यांची किंमत सारखीच असते…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

डोळे बंद केले म्हणून संकट
जात नाहीत…. आणि संकट
आल्याशिवाय डोळे उघडतही नाही…!
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
 

 

राग आल्यावर थोडे थांबले आणि
चूक झाल्यावर थोडे नमले तर…
विश्वातील सर्व समस्या दूर होतात…!

 

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

 

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायचे नाही. अन्नाचा कण आणि
आनंदाचा क्षण… नेहमी हसत राहा.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

35+ Marathi Status On Life – मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here