Marathi Story | अर्ध्या भाकरीचे कर्ज
हृद्यस्पर्शी मराठी कथा
आपल्या रूम मध्ये नवरा – बायकोचा विवाद सुरु होता…
नवरा तिला शांत राहायला सांगीत होता… पण बायको नवऱ्याचे
काहीही न ऐकता एकसारखी आपल्या सासूवर दोषारोपण करीत होती..
आणि नवरा एकसारखा आपल्या बायकोला समजविण्याचा प्रयत्न
करीत होता… आणि तू सून आहेस आपली मर्यादा नको ओलांडू असा
बोलत जायचा…
परंतु बायको काहीही ऐकण्यास तैयार नव्हती… आणि ती अधिक
जोरात बोलत असे…
ती सतत मोठ्याने ओरडून सांगत असे कि माझी सोन्याची अंगठी या
टेबलावरच ठेवली होती… आणि आई व्यतिरिक्त या रूम मध्ये
कुणीही येत नाही…!
माझी सोन्याची अंगठी हो न हो आईनेच उचललेली आहे…
आता नवऱ्याच्या धैर्याने ही उत्तर दिले… आणि नवऱ्याने
जोरात एक झापड बायकोला मारली…!
दोघांच्या लग्नाला इकडून – तिकडून चार महिने झालेले होते…
बायकोला नवऱ्याचे हाथ उचलणे सहन झाले नाही… आणि तिने
माहेरी जायचा निर्णय घेतला आणि आपले कपडे घेऊन घर
सोडून निघाली…
बायकोने निघता निघता आपल्या नवऱ्याला विचारले कि….
तुमच्या आईवर तुमचा एवढा विश्वास का म्हणून आहे…?
तेव्हा नवऱ्याने जे उत्तर दिले…. त्या उत्तराला ऐकून
दरवाज्याच्या मागे उभी असलेल्या आई चे डोळे भरून आले…
नवरा बायकोला सांगायला लागला…
माझ्या लहानपणीच माझे वडील देवाघरी गेले…
आई दुसऱ्यांच्या घरचे भांडीकुंडी करून जे मिळत असे
त्यात एकवेळचेच भागायचे…!
माझी आई मला माझ्या ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या
डब्याला झाकुन ठेवत असे… आणि म्हणत असे की…
मुला मला सध्या भूक नाही आहे… मी माझ्यासाठी भाकरी या
डब्यात ठेवल्या आहेत… तू पोटभर जेवण कर… मी नंतर जेवतो…
परंतु मी नेहमीच अर्धी भाकर खात असे आणि म्हणत असे कि….
आई माझे पोट भरले… आता मी नाही खाऊ शकणार…
माझ्या आईने माझी उरलेली अर्धी भाकर खाऊन मला लहानाचे मोठे
केले आहे.
आता मी कसा बसा दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो आहे..
परंतु हे कसे विसरु जाऊ की आईने त्या वेळी आपल्या भुकेला मारले…
तीच आई या वेळी तुझ्या सोन्याच्या अंगठी ची भुकेली असेल…
हा विचार मी स्वप्नात हि करू शकत नाही…!
तू तर फक्त चारच महिन्यापासूनच माझ्या सोबत आहेस…
मी तर आईच्या तपश्चऱ्येला मागील २० वर्षापासून बघत आहे…!
हे सगळे ऐकून तर आईच्या डोळ्यात अश्रुची धारच लागली…
आईला समजूच येत नव्हते कि… तिचा मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे
कर्ज फेडत आहे की… ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे…!
हि कहाणी कशी वाटली…. कमेंट मध्ये नक्की कळवावे.
Marathi Story | अर्ध्या भाकरीचे कर्ज | हृद्यस्पर्शी मराठी कथा
Marathi Moral Story | मराठी बोधकथा | निर्णय क्षमता