Marathi Story | सकारात्मक दुष्टिकोन | Good Thoughts marathi

0
1159
marathi suvichar-good thought-sunder vichar-chhan vichar
marathi suvichar-good thought-sunder vichar

Marathi Story – सकारात्मक दुष्टिकोन – Good Thoughts
 मराठी सुविचार

Marathi Story - सकारात्मक दुष्टिकोन - Good Thoughts - मराठी सुविचार - vb thoughts in marathi
Marathi Story – सकारात्मक दुष्टिकोन – Good Thoughts मराठी सुविचार

 

 
एका समुद्र किनाऱ्या पासून काही अंतरावर असलेल्या वस्तीत बहिण भाऊ राहत असतात. 
आज बाजाराचा दिवस म्हणुन बाबांना सुट्टी आहे, बहिण भाऊ समुद्र किनाऱ्यावर 
खेळुन झाल्यावर घराकडे जायला निघतात.

भावाचे वय १० वर्ष आणि बहिण ४ वर्षांची. काही अंतर गाठल्यावर भावाच्या लक्षात आले की 
आपली बहीण मागे राहिलेली आहे, मागे जावुन बघितले तर त्याला त्याची बहीण 
एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी आहे, असे दिसते, जवळ आल्यावर त्याच्या लक्षात येते की.. 
आपली बहीण खेळण्याच्या दुकानासमोर लटकत असलेल्या बाहुलीला खुप कौतुकाने पाहत आहे. 
 
भाऊ आपल्या लहान बहिणीचा हात हातात धरून अगदी प्रेमाने विचारतो, तुला काही हवे आहे का…? 
लहान बहिन आपल्या भावाला एका बाहुलीकडे बोट दाखविते. 
 
भाऊ तिचा हात धरत एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. 
ती बहीण खुप आनंदित होते… हे सर्व तो दुकानदार पाहत असतो व त्या भावाचे असे 
जवाबदारी पूर्वक वागणे पाहून आश्चर्यचकित होतो…
 
आता तो भाऊ दुकानदाराच्या जवळ येतो व त्या दुकानदाराला विचारतो, 
साहेब  किती किंमत आहे तुमच्या या बाहुलीची…?

Marathi Story – सकारात्मक दुष्टिकोन – Good Thoughts – मराठी सुविचार

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या 
भावाला शांतपणे, प्रेमाने आणि आपुलकीने विचारतो, बोल बाळा तू काय देशील…? 
त्यावर तो आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर 
खेळत असतांना गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. 
दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो,.
शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो… साहेब कमी आहेत का…?

दुकानदार म्हणतो, नाही नाही बाळा… हे तर बाहुलीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहेत.
जास्तीचे मी तुला परत  करतो. असे म्हणून तो केवळ ४ शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत 
करतो. तो भाऊ एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.
हा सर्व प्रकार त्या दुकानात काम करणारा कामगार पहात असतो, त्याला खूप आश्चर्य होतो व अगदी 
आश्चर्याने आपल्या मालकाला  विचारतो, मालक…! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ ४ शिंपल्यांच्या मोबदल्यात त्या मुलाला कशी काय दिलीत…? आपली तबीयत तर बरी आहे ना…?

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला… आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण…! 
त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार 
पैसे काय असतात.

 पण… जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला हि दुनियादारी समजायला 
येईल तेव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली 
होती, आणि त्याला माझी नक्की आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी 

भरलेले आहे. हि गोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा 
चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here