Marathi Story | माझ्याबद्दल तुला काय वाटते..? | नवरा – बायको

0
1001
Marathi Story - माझ्याबद्दल तुला काय वाटते..? नवरा - बायको
माझ्याबद्दल-तुला-काय-वाटते-नवरा-बायको-Marathi-Story

Marathi Story – माझ्याबद्दल तुला काय वाटते..?
नवरा – बायको

 

नवरा बायको दोघेही आपल्या पंधराव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकमेकांना देत आरामात चहा चा आनंद घेत होते. 

बोलता बोलता बायकोने नवऱ्याला विचारले…

माझ्याबद्दल तुला काय वाटते…?

 

 नवरा एकदमच बावचळून गेला… गोंधळून गेला… आता त्याला 

अशा प्रश्नांची सवय राहिलेली नव्हतीच…!

Marathi Story

माझ्याबद्दल-तुला-काय वाटते-नवरा-बायको-Marathi-Story-vb-good-thoughts-in-marathi-vijay-bhagat
माझ्याबद्दल तुला काय वाटते…? – नवरा – बायको – Marathi Story

 

जेव्हा नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा ठीक होते…

त्यावेळी बायको कडून दिवसातून एकदा तरी हा प्रश्न त्याच्या समोर यायचा

आणि त्यावेळी त्याच्याकडे खूप भारी भारी उत्तरे तैयार असायची.  

 

परंतु लग्न होऊन काही वर्षे झाल्यावर संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता

ही असली तोंडी परीक्षा पार विसरत गेला…! आणि काही वर्षे एकदमच शांत

असतांनाच अचानकच आज हा प्रश्न रुपी बॉल बायकोने टाकला….

आणि चहाचे रिकामी कप घेवून बायको स्वयंपाक करायला निघून घेली.

 

काही वेळात नवरा स्वयंपाक घरात गेला…

तेव्हा बायको पोळ्या करीत होती.

हातात लाटणे…आणि समोर तापलेला तवा

नवऱ्याने संभाव्य धोका ओळखला 

आणि सांगण्यासारखे प्रचंड आहे

संध्याकाळी सावकाशपणे सांगतो 

से म्हणून नवरा कामावर निघून गेला….

 

नवरा घरातून बाहेर पडला खरा

पण घर काही डोक्यातून बाहेर पडले नव्हते…!

पूर्ण दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला

 

खूप कठीण असते हो

नात्यांचे गणित एकदा का भावनेत अडकले की….

ते शब्दांतून सोडवने खूप कठीण असते…

 

नवरा विचार करत होता काय सांगावे…?

राजा मी तू माझी राणी वगैरे असे काही म्हणावे का?

नाही… नाही… खूप फिल्मी वाटणार….

 

तू खूप चांगली आहेस से म्हणावे…

नाही… तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे

 

समजूतदार आहेस… सहनशील आहेस… वगैरे म्हणावे…

तर ती नक्की म्हणणार…. राजकारण्यां सारखी उत्तरे देऊ नकोस

Marathi Story

 

नवऱ्याला काहीच सुचेना….

बायकोला आवडेल से वागणे आणि तिला पटेल से बोलणे…

हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे

लाईन लागेल नवऱ्यांची

त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

 

सूर्य मावळला… संध्याकाळ झाली आणि घरी जायची वेळ झाली

 

आपल्याला पाहताच तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार

याची त्याला खात्री होती

होमवर्क पूर्ण न  करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा

झालेला होता

शेवटी हिमतीने त्याने बेल वाजवली

अपेक्षेप्रमाणे बायकोने दार उघडले नाही

त्याच्या मुलीने दार उघडले… आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भज्यांचा 

सुगंध नाकात शिरला

 

 मुलगी जवळ जवळ उडी मारत म्हणाला

पप्पा मम्मी ने भजे बनविले आहे… लवकर हातपाय धुवून या

 नवरा मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला 

 बायकोने भज्यांची प्लेट समोर मांडली

 त्याने विलक्षण अपराधी चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले…

 

बायकोने जोरात हसत विचारलेकाही सुचले…?

 नवऱ्याने नकारार्थी मान हलवली 

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदाने म्हणाली… 

मलाही नाही सुचले…!

Marathi Story – माझ्याबद्दल तुला काय वाटते..?
नवरा – बायको

 

तो पुन्हा गोंधळला

इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया…?

 आणि ती सांगायला लागली…

 

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला विचारले…

तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटते?

 पाच – सहा दिवस विचार केला

पण मला काही सांगताच येईना

 मग भीती वाटायला लागली… 

माझे तुझ्यावरचे प्रेम कमी झाले की काय…?

 

 अपराधी वाटायला लागले…  काय करावे कळेना

मला स्वतः विषयी शंका होती पण पंधरा वर्षानंतर ही 

तुझे प्रेम कणभर ही आटलेले नाही याची खात्री होती.

 म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला

 

वाटले… तुला उत्तर देता ले तर आपण दोष मध्ये आहोत ..

 पण नाही तुलाही उत्तर देता ले नाही

 म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत

 जिथे फक्त वाटणे संपून वाटून घेणे सुरु झाले आहे…

 

आता शब्द सापडत नाहीत आणि त्याची गरजही वाटत नाही

 कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपली आहे…

 से म्हणून बायकोने एक कांदा भजी प्रेमाने त्याच्या तोंडात टाकली…

 शपथ सांगतो

 त्या पंधरा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता…!

 

नवरा बायको Jokes | Navara Bayko Jokes | मराठी जोक्स

Husband Wife Quotes In Marathi – नवरा बायकोचे अनोखे प्रेम

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here