51 marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

0
267
marathi suvichar - मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी
marathi suvichar - मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला 51 marathi suvichar, मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी,
सुंदर विचार, #motivationalquotes, असे मराठी सुविचार की जर आपण आपल्या आयुष्यात वापरलात
तर लोक थक्क होतील तुम्ही इतके कसे बदललात #marathi #मराठी #motivationalvideo
#life हे सोपे सुविचार मराठी नक्की उपयोगी पडतील. तुम्हाला प्रेरणादायी ठरतील. शांत मनाने नक्की वाचा.
आणि आपल्या मित्र मंडळी ला शेयर करायला विसरू नका. सुरुवात करूया सुंदर सुविचारांना, सुंदर विचारांना

51 marathi suvichar –
मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

केवळ आपण चांगले दिसत नाही म्हणून लोकांमध्ये मिसळायचे नाही
ही भावना मनामधून काढून टाका. स्वतःमध्ये आत्मविश्वास असू द्या..
संधी शोधा…. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा…. लोकांमध्ये मिसळायला शिका…

लोकांकडून कमी अपेक्षा ठेवा किंवा नाही ठेवल्या अपेक्षा तरीही चालेल.
त्यामुळे कसलेही दुःख होणार नाही. तुम्ही टेन्शन फ्री राहाल.

प्रार्थना कधीही वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही.
त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार असतात त्याही गोष्टी ते गमावून बसतात.

एखाद्या व्यक्तीपासून दूर राहिलात तर तुम्हाला याची जाणीव होईल की
तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे किंवा मग त्याच्याशिवाय तुमच्या
आयुष्यात खूप जास्त शांतता आहे हे तरी जाणवेल.

तुमच्या मूड प्रमाणे नाही तर समोरच्याच्या परिस्थितीप्रमाणे बोला.
तो कोणत्या परिस्थितीत आहे ते बघून बोला. बोलण्यापूर्वी
आपल्या मनामध्ये काय बोलायचे आहे. याची योजना करा…

हे ही वाचायला आवडेल 

life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार

तुम्ही जे आहात ते स्वतः जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
कोणताही ढोंगीपणा करून दिखावा करून आपल्या अडचणींमध्ये
वाढ करू नका.

इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हाव भाव आपल्या चेहऱ्यावर असू द्या.
आणि आपली देहबोली योग्य असेल यावरही लक्ष द्या..

मोठ्या व्यक्ती तर त्या असतात ज्यांना भेटल्यानंतर आपण छोटे आहोत
याची जाणीव आपल्याला होत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला
ते जाणवू देत नाही.

जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खातात.
कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात.

माणसांना समजणे खूप अवघड आहे.
कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो.
एक वेळेस एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणाऱ्या
व्यक्ती वेळ आणि परिस्थिती बदलली की एकमेकांचा
जीव घ्यायला तयार होतात.

तुमचा खरा पगार कधीच कोणाला सांगू नका.
तुमच्या पगारावरून लोक तुमची लायकी ठरवतात
आणि तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा तेही तुमच्या
पगारावरून ठरवतात.

स्वतःबद्दलच्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या आणि तुम्हाला
असे वाटत असेल आपल्यामध्ये सकारात्मक नाही…
नकारात्मक गोष्टी जास्त आहेत…. तर त्या अगोदर दूर
करण्याचा प्रयत्न करा.

नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्याचा प्रयत्न करा.
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा.

कधीही अपयशाची भीती बाळगू नका. अपयश येईल या भीतीने
रिस्क घेण्याचे टाळू नका. आयुष्यात आव्हान स्वीकारल्याशिवाय
तुम्ही मोठे होणार नाही.

हार न मानण्याची वृत्ती आत्मसात करा. त्यातच तुम्ही
अर्धी लढाई जिंकलेली असेल.

हा व्हिडीओ नक्की बघा 

Life lessons in marathi | आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर तो तोडून टाकतात | Good Thoughts marathi

कोणालाही कंटाळवाने… गंभीर…. आणि रडणारे लोक आवडत नाही
प्रत्येक जण नेहमी सकारात्मक असणारे आणि आनंदी असणाऱ्या
लोकांच्या संगतीत राहणे पसंत करतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा प्रसन्न राहा.

ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी
नको त्या गोष्टी खरेदी करून पैसा आणि वेळ वाया घालवणे थांबवा.

नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही
तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. मंदिरात जाऊन
तुम्ही देवाला कितीही फुले नारळ वाहिले तरीही जर तुमचा
स्वतःवर विश्वास नसेल तर देवही तुम्हाला साथ देणार नाही.

अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील
तुमचे व्यक्तिमत्व जबरदस्ती बदलण्याचा प्रयत्न करतील..
आपण जसे आहोत तसे समोरचा आपल्याला स्वीकारत असेल
अशाच लोकांच्या संगतीत राहा.

या पोस्ट ला भेट द्या. आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार

जगात अशी एकच व्यक्ती आहे जी कायम मरेपर्यंत तुमच्या सोबत असते
तुमच्या सुखदुःखात सोबत असते…. ती म्हणजे तुम्ही स्वतः म्हणून स्वतःची
काळजी घ्या. नेहमी आनंदी राहा… स्वतःसाठी वेळ द्या.

पैशाने पैसा वाढतो म्हणून पैशाचा वापर एक साधन म्हणून करा.

जेवढे जास्त तुम्ही खोटे वागत असाल तेवढे जास्त लोक तुमच्या
आजूबाजूला असतील. आणि जर तुम्ही खरे वागत असाल तर
मोजकेच लोक तुमच्या आजूबाजूला असतील.

तुमच्या कामाची लाज बाळगू नका लोक तुमच्या टेबलावर फुकट जेवण
आणून देणार नाहीत. आणि त्याचे बिलही भरणार नाहीत. तुम्ही जे करत
आहात त्या कामाचा अभिमान बाळगा.

पाच वर्षानंतर तुम्ही त्या गोष्टीवर हसाल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज रडत आहात
वेळ आणि काळ हे सगळ्या गोष्टींवर औषध आहे. त्यामुळे नेहमी आनंदी राहा….
प्रसन्न राहा…..!

तुमचा मार्ग तुमच्या मित्रांपेक्षा वेगळा असेल तरी हरकत नाही.
मित्रांनी जे केले किंवा मग इतरांनी जे केले तेच आपण
करायला हवे असे काहीही नाही.

लोकांना तुमची Emotions सांगणे…. तुमची गुपित उघडे करणे म्हणजे….
एखाद्या शार्क माशाला तुम्ही स्वतःचे रक्त दाखवून त्याला तुमची शिकार
करण्यासाठी बोलवण्यासारखा आहे…!

marathi suvichar – लोकं थक्क होतील….
तुम्ही इतके कसे बदललात

तुमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगत आहात याची काळजी घ्या.
कारण तुमच्यासमोर प्रत्येक जण हसून खेळून राहणारा
हा तुमचा मित्र किंवा जवळचा असेलच….असे नाही…!

काही लोक तुम्ही बदललात म्हणून तुम्हाला नाव ठेवतील
आणि काही लोक तुम्ही प्रगती केली म्हणून आनंदी होतील.
म्हणून आपले मित्र हे काळजीपूर्वक निवडा.

जर तुम्हाला वाटत असेल आयुष्यात तुम्ही नेहमी बरोबर आहात…
तर तुम्ही कधीही काहीही शिकू शकत नाही.

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा नाहीतर जेव्हा तुम्ही ते गमवाल
त्यानंतर केलेले प्रेम तुम्हाला फक्त त्रास देऊन जाईल.

जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर राज्य करणे कठीण आहे.

मूर्ख माणसाला कधीही त्याची चूकसांगू नका. कारण तो नेहमी तुमचा
द्वेषच करेल. शहाण्या माणसाला त्याची चूक सांगितली तर तो तुमचे
कौतुक करेल.

समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नका तो जसा आहे
तसा त्याला स्वीकारा. तुम्ही त्याला बदलायला जाल तर तुम्ही नाते
गमावून बसाल.

समोरच्याने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरे द्या.
अनावश्यक बोलू नका. कमीत कमी बोला.

जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जाऊ नका.
विना आमंत्रण कुठेही जाऊ नका. आणि ऐन वेळेस
शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणी बोलवत असेल तरीही
जाणे टाळा. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटच्या क्षणी
बोलावले जाते…. त्या ठिकाणी कोणालाच तुम्हाला
बोलवण्याची इच्छा नसते. म्हणून अशा ठिकाणी जाऊन
तुमची स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका.

जोपर्यंत समोरचा स्वतःहून आपल्याला काही गोष्टी सांगत नाही
तोपर्यंत आपण त्याला त्याच्या खाजगी गोष्टी विचारू नयेत.

त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही
ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी कधीच काहीही प्रयत्न केले नाहीत.

आयुष्यात नशिबाला दोष देत बसू नका. उलट असे काहीतरी
करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना
त्यांच्या जाण्याचा पश्चाताप व्हायला हवा.

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत
नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते.

जीवनात कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला इतकेच म्हणा की…
माझी मदत करशील का…? त्याच्या प्रतिक्रियेवर आणि त्याच्या उत्तरावरून
तुम्हाला त्याचा स्वभाव नक्कीच कळून येईल.

उंच उडण्यासाठी पक्षांना पंखाची गरज असते. पण माणूस जेवढा
जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती जास्त होत असते.

संघर्ष करताना माणूस एकटाच असतो पण यश मिळवले की संपूर्ण जग
त्याच्या बाजूने होते. म्हणून संघर्षाच्या काळात तुम्ही एकटे असाल तर
अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत
पण खूप त्रासदायक असतात.

marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमचे जवळचे लोक तुमच्या पासून
दूर जायला लागतील तेव्हा तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा
पूर्ण झाल्या आहेत. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिले असेल की लोक
तुमच्या जवळ येतात… तुमचे हालचाल विचारतात आणि त्यांची
गरज संपली की दूर निघून जातात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा.
कारण… लोक मतलबी आणि स्वार्थी असतात.

ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जात नाही. त्या ठिकाणी जाऊ नका
आणि जी व्यक्ती तुमचा सतत अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या
आयुष्यात पुन्हा स्थान देऊ नका. पण काही लोक अगदी याच्या उलट
वागतात जिथे नेहमी अपमान होतो. किंवा जी व्यक्ती तुम्हाला घालून
पाडून बोलते अपमान करते तुम्ही सतत तिच्याकडे जाता.

आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा
आणि त्यानुसार लोकांसोबत वागा.

जीवनातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो.
तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा
फुगा खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगा विकून खुश होतो.
परिस्थिती तीच आहे फक्त दृष्टीकोन वेगळा आहे.

विचार आवडले असतील तर ब्लॉग ला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि कोणता विचार तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते कॉमेंट
करून नक्की कळवा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

धन्यवाद

51 marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

हे सुविचार वाचायला आवडतील 

सुंदर विचार मराठी | सुविचार | suvichar marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here