Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

3
1066
Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या
Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा.
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा.
नाते फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करते.
नाते ती असते जी आपलेपणाची जाणीव करून देते.

Marathi Suvichar On Relationship
नात्यांना वेळ देऊ या

एक्सपायरी डेट हि प्रत्येक गोष्टीची ठरलेलीच असते. मग ते एखादे नाते असो….
औषध असो वा कोणतीही वस्तू…. जर वेळेवर लक्ष दिले नाही…. अथवा पाहिजे
त्या वेळी वेळ दिला नाही…. तर त्या गोष्टी खराब होतात. पूर्णतः अनुपयोगी
होतात… उपयोग करण्याच्या लायक राहत नाहीत.

आपल्या आयुष्यातील नात्यांचेही काहीसे तसेच आहे. जर आपण त्यांना वेळ दिला नाही….
समजून घेतले नाही….. काहीही समझ दिला नाही तर हळू हळू आपले नाते संपत
जात असते.

ज्याप्रकारे औषधे…. अथवा खाण्याच्या वस्तू एक्सपायरी डेट निघून गेल्यावर ते खाणे
शरीरासाठी धोकादायक असते. ते खाल्यामुळे प्रकृती बिगळू शकते. अगदी तसेच
नात्यांचे आहे.

नात्यांना आपली ज्या वेळी गरज असते त्यावेळी आपण वेळ देत नाही…. ज्यावेळी
भावना व्यक्त करायचा असतात… त्यावेळी आपण भावना व्यक्त करीत नाहीत.
आणि एकदा का ती वेळ निघून गेली की त्या नात्यात आपल्याला पश्चात्ताप
करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग उरत नाही. कारण ज्यावेळी लक्ष देण्याची
आवश्यकता होती त्यावेळी आपण दुर्लक्ष करीत असतो….

Marathi Suvichar On Relationship
नात्यांना वेळ देऊ या

एका उदाहरणाद्वारे समजू या.

आपण गरम गरम जलेबी नेहमी आवडीने खातो परंतु त्याचा पीठ अंबवण्यासाठी रात्रभर
ठेवावे लागते. तेव्हा जाऊन त्या गरम जलेबीला एक विशिष्ठ अशी सुंदर चव येते.
आणि तो जलेबी खूपच चांगली बनवितो असे आपण म्हणत असतो.

आता विचार करा….. जर तो पदार्थ आपण अंबवलाच नाही किंवा गरजेपेक्षा जास्तच
वेळ तो अंबावत ठेवला तर काय होईल….?

समजा जर कमी वेळ अंबवला तर तो पदार्थ पाहिजे तसा बनणार नाही आणि त्याला
पाहिजे तशी चव येणार नाही तसेच अधिक वेळ अंबवत ठेवला तर तो पदार्थच खराब
होऊन जाईल. आणि त्याची चवही खराब लागणार.

जसे या पदार्थावर घाई केली तर काय परिणाम होणार आणि उशीर केला तर काय
परिणाम होणार… अगदी तसेच आपल्या नात्यांचे ही आहे. एकदम सेम.

जर नात्यांना अधिकच वेळ दिला तर त्या मधून त्या दोघांना पाहिजे तसा एकमेकांना
बद्दल आदर… प्रेम… ओढ… राहत नाही अथवा मग ते कमी होते. जर हीच गोष्ट उलट
केली तर…. आपण वेळच दिला नाही …. गरजेच्यावेळी उपयोगीच पडलो नाही…
पाहिजे तेव्हा प्रेम व्यक्तच केले नाही… वेळ दिला नाही… भेटी घेतल्या नाही…
कालांतराने ते नाते केवळ नावाचेच राहून जाते.

एका विशिष्ट वेळे नंतर भेटण्याची ओढ सुद्धा संपून जाते. वेळ न दिल्याने एकमेकांबद्दल
असलेली ओढ हळू हळू नाहीशी होते. प्रेम कमी होऊ लागते. आधी सारखा जिव्हाळा राहत
नाही….! म्हणून…. ज्याप्रमाणे आपण पदार्थांची चव चांगली राहावी…. ते वेळेतच खावे
या गोष्टींकडे लक्ष देतो. तो पदार्थ आणखी चांगला कसा होणार यावर लक्ष देतो…
अगदी तसेच काहीसे लक्ष आपल्या पासून लांब जाणाऱ्या नात्यांकडे दिले….
तर आपल्याला त्यातला गोडवा हा जीवनभर अनुभवता येईल.

केव्हा केव्हा नात्यांना छान सुवासिक फोडणी आणि मसालेदार तडका सुद्धा हवा….
मग बघा तुमचे नाते किती चविष्ट होते….!

Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

नात्यांची दोरी

नात्यांची दोरी फार नाजूक असते.
एकदा तुटली की परत जोडता येत नाही.
जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते.
नाते टिकविण्याची जबाबदारी दोघांची असते
एकाचे चुकले तर दुसऱ्याने ताणू नये.

हे ही वाचायला आवडेल :-

Husband Wife Relationship Quotes In Marathi | नवरा बायको प्रेम

3 COMMENTS

  1. तुमची लेखनशैली खूप चांगली आहे आणि तुम्ही सोप्या भाषेत लिहिता, तुमचा ब्लॉग पाहिल्यानंतर मी हा Patanjali Dant Kanti Dental Cream Benefits in Hindi लेख लिहिला आहे, मला वाटते तुम्ही आम्हाला काही सूचना द्याव्यात जेणेकरुन आम्ही आमचे ब्लॉगिंग करिअर सुधारू शकू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here