नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship |नाती

3
1308
नाते सुविचार - Marathi Suvichar Quotes On Relationship - नाती
नाते सुविचार - Marathi Suvichar Quotes On Relationship - नाती

नमस्कार मित्रहो आपल्या साठी सुंदर
असे नाते सुविचार, मी आज घेऊन आलो
आहे की, आपले नाते अधिक दृढ होतील.

नाते सुविचार |
Marathi Suvichar Quotes On Relationship |
मराठी स्टेटस नाती

आपले आयुष्य नात्यावर अवलंबून असते
माणसे जोडली जातात ती नात्यावर
जोडली जातात. त्यामुळे आपल्या आयुष्यात
नात्यांचे खूप असे महत्व आहे.

म्हणून मित्रांनो नाते जपले पाहिजे
नाते जोडले पाहिजे. तरच आपले
आयुष्य फुलते… बहरते….

मित्रांनो हे सुविचार मी आपल्यासाठी
घेऊन आलो आहे. जर आवडलेच तर
आपण शेअर करा कॉमेंट देऊन कळवा
आणि ह्या VB Good Thoughts Blog वर
नेहमी भेट देत रहा.

या ब्लॉग वर मी सुंदर सुविचार, मराठी सुविचार,
सुविचार मराठी, सुविचार संग्रह, good thoughts in marathi,
motivational quotes in marathi, marathi quotes, positive quotes,
relationship quotes in marathi, असे छान विचार मी आणत असतो.

*********

नाते सुविचार |
Marathi Suvichar Quotes On Relationship |
मराठी स्टेटस नाती

नाती बनवतांना अशी बनवा की
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत
तुमच्या सहवासात राहील. कारण
जगात प्रेमाची कमतरता नाही…
कमतरता आहे ती फक्त नाती
निभावण्यासाठी धडपडणार्‍या
खऱ्या व्यक्तींची…!

*********

स्पष्ट बोला पण असे बोला की
समोरच्याला कष्ट होणार नाही
आणि त्याचे आणि तुमचे नाते नष्ट
होणार नाही.

*********

प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसू नये जिवलगा ची
सोबत कधी सुटू नये. नाते मैत्रीचे असो
की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध
आयुष्यभर तुटू नयेत.

*********

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट
पडतात. बाकी सगळ्यांसाठी
किंमत मोजावी लागते….!

*********

यशस्वी तोच होतो जो आपल्या
शत्रू वर नाही तर आपल्या
स्वप्नांवर विजय मिळवतो.

*********

आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या
मनासारखी बसत नसते.
प्रत्येकाला तडजोड ही करावीच
लागते. ती कुणालाच चुकली नाही.

*********

बाप नावाची चादर आयुष्यातून
जेव्हा निघून जाते, तेव्हा
आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही
जबाबदारीची जाणीव करून देते.

*********

प्रयत्न तोपर्यंत सोडायचे नाही
जोपर्यंत आपण त्या गोष्टीला
टॉपला पोहोचवत नाहीत.

*********

नाते हे निर्मळ पाण्यासारखे असावे.
जिथे टाकलेले खडे तळापर्यंत गेले
तरी स्पष्ट दिसावेत.

*********

नाते सांभाळायचे असेल तर चुका
सांभाळून घेण्याची मानसिकता
हवी आणि नाते टिकवायचे असेल
तर नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी.

*********

ताकत आणि पैसा ही जीवनाची
फळे आहेत. परंतु कुटुंब आणि मित्र
प्रेम ही जीवनाची मुळे आहे.

*********

चेहऱ्यावर साधेपणाचा…. सज्जनतेचा….
रंग लावून चेहरा बदलायचा कितीही
प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस
खरा चेहरा लोकांसमोर येतोच.

*********

तीच नाती शेवटपर्यंत साथ देतात
ज्यांची सुरुवात मनापासून होते
गरजे पासून नाही….

*********

Marathi Suvichar Quotes On Relationship

चांगल्या माणसांची कधी परीक्षा
घेऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे
असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर
घाव घालता तेव्हा ते तुटले जात
नाहीत. पण निसटून शांतपणे
तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

*********

परिस्थिती दयावान नसेल ही
परंतु परिस्थितीशी लढा देणाऱ्यास
ती सामर्थ्यवान नक्कीच बनवते.

*********

कर्तुत्ववान व्यक्तीचा पराक्रम
बघितला जात नाही. त्याचे चाक
जमिनीत कधी रुतते तिकडेच
सगळ्यांचे लक्ष असते….!

*********

चुकीची माणसे दूर झाली की
आयुष्यात बरोबर गोष्टी घडू
लागतात.

*********

आयुष्य हे कबड्डीच्या खेळा सारखे
असते. तुम्ही यशाच्या रेषेला हात
लावायला जाताच लोक तुमचे पाय
खेचायला सुरुवात करतात….!

*********

मराठी स्टेटस नाती | सुविचार | सुंदर विचार

आपण कसे आहोत हे ज्याचे त्याला
पक्के माहित असले म्हणजे….
माणूस निर्भय होतो. त्यासाठी
सर्वात प्रथम स्वतःचीच ओळख
स्वतःला व्हावी लागते.

*********

फुल बनून हसत राहणे हेच जीवन
आहे. हसत – हसत दुःख विसरून जाणे
हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण
आनंदी होतात. पण न भेटता नाती
जपणे हेच खरे जीवन आहे.

*********

आवडीचे लोक सवडीने वागायला
लागले की नात्याला कवडीची
किंमत राहत नाही.

*********

नाते आणि विश्वास हे एकमेकांचे
खूप चांगले मित्र आहेत. जिथे
नाते असते तिथे विश्वास असतो.

*********

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे. कारण एकही
दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत
बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल.

*********

नाती कशी जपावी | नात्यांवर सुंदर विचार

चांगली नाती ही झाडासारखी
असतात. सुरुवातीला काळजी
घेतली की आयुष्यभर सावली
देतात.

*********

नाते मनापासून असेल तर टिकते
नाते सहज स्वीकारले असेल तर
फुलते.

*********

दोन धीराच्या शब्दांनी नाते उमलते
विश्वासाच्या आधारावर नाते बहरते
सहज संवादाने नाते सुगंधित होते
मतभेद समजून घेतले तर नाते भक्कम
होते.

*********

मायेने विणलेले प्रत्येक नाते
घट्ट होते…. ते सहज उसवले
जात नाही.

*********

चेहरा चांगला असला तर लोक
थोडा वेळ बघतील. मात्र मन
चांगले असले तर लोक जन्मभर
जपतील….!

*********

दुसऱ्याचा अपमान करताना
आपण स्वतःचा सन्मान
गमावत असतो.

*********

अपमान करणे स्वभावात असू शकते
पण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे
संस्कारात असावे लागते.

*********

दिव्याला दिवा लावत गेले की
दिव्यांची एक माळ होते.
फुलाला फूल जोडत गेले की
फुलांची एक माळ होते आणि
माणसाला माणूस जोडत गेले की
माणुसकीचे सुंदर नाते तयार होते.

*********

तुटलेल्या काचाला कितीही
चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी…
त्यात तडा राहतोच…! तसीच नाती
असतात. एकदा तुटली की पुन्हा
जोडतांना तडा तसाच राहतो…
म्हणून ती नाती, प्रेम, जिव्हाळा
नेहमीच जपावा.

*********

वाटतात तितक्या सोप्या नसतात
कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी
सुखासाठी थांबावे लागते.
मनातले दुःख मनातल्या कोपऱ्यात
लपवावे लागते.

*********

गैरसमज नको म्हणून
जगाला हसून दाखवावे लागते.
ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी
आडोश्याला जाऊन पुसावे लागते.

*********

Marathi Suvichar Quotes On Relationship

कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा
वास्तवाचे चटके बसलेले कधीही
चांगले असतात. निदान पुढे जाऊन
आयुष्याची रांगोळी तरी होत नाही.

*********

सुखे जवळ आहेत तोवरच गर्दी असते.
संकटाशी स्वतःलाच लढावे लागते.
जीवाभावाचे कितीही असू द्या….
कोणी सोबत येत नाही… शेवटी
सरणावर एकट्यालाच जळावे लागते…!

*********

चुका सुधारण्याची तयारी ठेवली
की माणसे गमवायची वेळ येत नाही
अर्थ प्रत्येक शब्दाला असतो अगदी
निरर्थक या शब्दाला सुद्धा…

*********

नाती फुलपाखरा सारखी असतात
घट्ट धरुन ठेवलीत तर ती गुदमरुन
जातात. ढिले सोडलीत तर उडून
जातात. पण हळुवार जपली तर….
आयुष्यभर साथ देतात…

*********

कुठल्या व्यक्तीला उंबरठ्याच्या
आत घ्यायचे, कुठल्या व्यक्तीला
दरवाजाच्या बाहेर उभा करायचे
हे ज्या पती-पत्नीला कळते
त्यांच्या संसार सुखाचा होतो.

*********

काही लोकांना वाटते की
आपल्या शिवाय याचे काहीच
होणार नाही. पण लक्षात ठेवा
सूर्य मावळताना दिसतो पण
कधी बुडत नाही.

*********

मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या
तुटत नाही. मनुष्यच त्याला संपवतो.
कारण ते मरते एक तर तिरस्काराने
दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे…. तिसरे
गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी
कान भरल्यामुळे म्हणून नात्यात
विश्वास ठेवा आणि नाती प्रेमाने जपा.

*********

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
कारण न सांगता जोडणाऱ्या नात्याची
परिभाषाच काही वेगळी असते.

*********

मनाला मन समजले की नाते छान
गुंफते. दूर असो वा जवळ खरे नाते
अभंग असते.

*********

नाती, प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात
पण हे तिथेच थांबतात… जेथे त्यांना
आदर मिळतो. बऱ्याच वेळा औषधे
घेऊनही बरे वाटत नाही, परंतु….
चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते
कसे आहात आपण…?

*********

गैरसमज – अपेक्षा – नाते

मित्रानो… नाते… मग ते कुठलेही असो
लहान मोठ्या असोत… कमीजास्त असोत…
पण अपेक्षा ह्या असतातच. खरे तर त्या अपेक्षांमुळेच
ते नाते जिवंत असते.

आठवून बघा तर असे नाते की….
जिथे काहीही अपेक्षा नाहीत.

जिथे नाती सगळ्यात जवळची असतात…
तिथे या अपेक्षा फक्त भावनिक पातळीवर उरतात…
आई – बाळ, नवरा – बायको, जवळचे मित्र…
ह्यांच्यात प्रेम, विश्वास ह्या अपेक्षा उरतात.

नाते सुविचार |
Marathi Suvichar Quotes On Relationship |
मराठी स्टेटस नाती

जर अपेक्षा नसतील
तर ते नाते क्षणभंगुर असेल.

आणि जिथे अपेक्षा आहेत
तिथे त्या दरवेळी पूर्ण होतीलच असे नाही.
आणि मग गैरसमज हे आपोआप येतात….!

म्हणजे…. जिथे नाते आहे… तिथे आज ना उद्या
गैरसमज हे येणारच……!
जर नाते महत्वाचे असेल…..
तर गैरसमज दूर करावेच लागतात.

जसे एखाद्या लहानश्या रोपट्या जवळ
फोफावणारे गवत… ते काढायचे असेल
तर हाताला आणि खुरप्याला माती लागणार.
हाताला माती पण लागू द्यायची नसेल तर गवत
कसे निघेल…..?

मुळे ही थोडी दुखतात…. थोडे हातही मळतात…
पण तण काढायचे प्रेमाच्या पाण्याने हात खुरपे
धुवायचे.

मनात साठलेली (मातीची) तगमग
त्याने निघून जाते.
गैरसमजाचे तण पण फेकून द्यायचे….
विश्वासाचे खत घालायचे…
झाड परत तरारून वाढते.

जर हे केले नाही तर झाडाचे
अस्तित्वच संपून जाते.

आता प्रश्न असा आहे कि….
मग महत्वाचे काय आहे……?

जर ते नाते टिकवणे महत्वाचे असेल…
जर तुमच्यासाठी ते नाते महत्वाचे असेल
तर तुमच्या वेळात वेळ काढून हे करावे लागेल.

जर ते नाते महत्वाचं नसेल….
त्या झाडाचे अस्तित्व संपल्यात
जमा आहे….!

*********

नाती टिकवण्यासाठी हे आवर्जून करा |
Marathi Quotes on Relationship |
Good Thoughts In Marathi

Relationship Quotes On Marathi | नाती सुविचार 

नवरा शेवटी नवराच असतो….!

आयुष्यात खूप येतील- जातील
पण त्याच्याएवढे प्रेम कोणालाच
करता येत नाही….!

त्याचे बायकोवरचे प्रेम कधी
दिसत नाही. कारण त्याला
वरवरचे बायकोचे कौतुक
करायला आवडत नाही….!

त्याला Romantic वागता येत नाही
पण त्याच्या एवढी काळजी करणे
कोणालाच जमत नाही….!

त्याला बायकोसाठी वेळ
काढता येत नाही….
पण त्याची कुटुंबासाठी….
घरासाठी…. मुलाबाळासाठी….
बायकोसाठी होणारी वणवण मात्र
कोणालाच दिसत नाही….!

त्याला बायकोशी Chatting करण्यात
रस नाही. पण बायकोला गमावू नये
म्हणुन त्याच्या सारखी भीती कोणालाच
बाळगता येत नाही.

वयानुसार त्याचा स्वभाव…. राहणीमान
सर्वकाही बदलून जाते. पण कुटुंबातील
जबाबदारी सांभाळता – सांभाळता त्याचा
खर्ची केलेले आयुष्य मात्र कोणालाच
दिसत नाही…..! कोणालाच दिसत नाही….!

नवरा शेवटी नवराच असतो | Good Thoughts In Marathi |
सुंदर विचार | नवरा सुविचार |नवऱ्याचे बायको प्रेम

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here