Suvichar Status Marathi | Sunder Vichar | दोन शब्द आयुष्यावर

0
659
good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-suvichar-sunder-vichar
good-thoughts-in-marathi-on-life-suvichar

Suvichar Status Marathi | Sunder Vichar | दोन शब्द आयुष्यावर

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये की…
त्याला आपला कंटाळा येईल.

कुणासोबत इतके चांगले वागू नये की…
त्याला आपला चांगुलपणा ओझे होईल.

कुणासोबत इतके गोड बोलू नये…
वागू नये की… त्याला तुमचे वागणे
कठीण होईल.

कुणाच्या इतके जवळ जाऊ नये की…
त्याला जवळपणाचे बंधन होईल.

कुणाला आपली गरज नसल्यास…
उगाच त्याच्या समोर रेंगाळत
राहू नये.

सहजच सगळे विसरून जावे…
मनात कसलीही सल ठेऊ नये.

Suvichar Status | Sunder Vichar  

आपण हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे…
आपले नाव दुसऱ्याच्या ओठी
राहील.. इतकेच करून जावे.
कारण….
जीवनाच्या वाटेवर सोबत राहतात…
विजय मिळवतात…
साथ देतात… दगा करतात…
ती ही माणसेच असतात…!

संधी देतात… संधी साधतात…
सन्मान करतात… भाव खातात
ती ही माणसेच असतात…!

वेड लावतात… वेडे ही करतात…
घास भरवतात… घास हिरावतात
ती ही माणसेच असतात…!

पाठीशी असतात… पाठ फिरवतात…
वाट दाखवतात… वाट लावतात…
ती ही माणसेच असतात…!

Suvichar Status Marathi | Sunder Vichar

शब्द पाळतातही… शब्द फिरवतातही…
गळ्यात पडतात… गळा कापतात….
ती ही माणसेच असतात…!

दूर राहतात… तरी जवळचीच वाटतात…
जवळ राहून देखील…
परक्या सारखी वागतात…
ती ही माणसेच असतात…!

नाना प्रकारची अशी नाना माणसे
ओळखायची कशी…!
सारी आपलीच माणसे असतात.

दोन शब्द आयुष्यावर

खांदा… | Suvichar Status Marathi | Sunder Vichar

माणूस मेल्यावर त्याला अंतिम संस्कारला नेत असतांना त्या मेलेल्या माणसाला

खांदा देण्याचे काम जरी कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला

आहे… आता त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो…!

Suvichar Status Marathi | Sunder Vichar

आजवर आपण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत

माणसांना आपला मदतीचा हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते…!

मृत्यूची बातमी कळताच सगळे काम सोडुनी धाऊन जाणारी माणसे…

जेव्हा तो जिवंत असतो… अडचणीत असतो… तेव्हा का बरे धाऊन जात नाहीत…?

Suvichar Status Marathi | Sunder Vichar

तसे पहिले तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थच असते

कारण जर का आपण नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय

राहणार नाहीत…! तरी पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत…

जिवंतपणी… जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्या…. अडचणीत सापडलेल्या

एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या..!

मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल…!

तेंव्हा विचार तर व्हायलाच हवा…!

बघा पटतंय का…!

cremation-ground-vb-good-thoughts-vijay-bhagat-दाह-संस्कार-मृत्यू-अंतीम-संस्कार-खांदा-मदत
दाह-संस्कार-मृत्यू-अंतीम-संस्कार-खांदा-मदत

 

Suvichar Status Marathi | Sunder Vichar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here