Marathi Suvichar |Sunder Vichar |निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल

0
567
Marathi Suvichar - निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल - Sunder Vichar
Marathi Suvichar - निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल - Sunder Vichar

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

खुपच सुंदर संदेश आहे परंतु….
जेव्हा निवांत असाल तेव्हा एकदा मन लावुन नक्कीच वाचा….

1] गोष्ट खूप लहानशी असते….

रस्त्यावर चालत असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण पत्ता विचारला
तर तो पत्ता सहसा सापडत नाही. परंतु जर का तोच पत्ता आपण आपल्या
गाडीतून उतरून त्याच्या समोर उभे राहून… दादा हा पत्ता सांगता का…?
असे विचारले तर तो व्यक्ती चांगल्याप्रकारे पत्ता समजावितो आणि एखादी
हिंट नक्कीच देतो.
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

जेव्हा आपले मित्र, नातेवाईक आपल्याला स्टेशनवर सोडायला येतात.
आलेल्याला मित्र नातेवाईकांना घरी पोचल्यानंतर जर आपण त्यांना फोन
केला नाही… तर फारसे काहीच बिघडत नाही. परंतु जर एक फोन केला…
तर ते नाते आणखीनच जुळते….! तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु
करायची असते….!

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

कधी तुम्ही अंधारात पाय अडखळुन पडलात… अगदी तसाच मागचाही पडू शकतो.
जर तुम्ही तिथेच थोडे थांबून मागून येणाऱ्याला सावध केले… तर अंधारातही त्याचे
डोळे बोलतात…! तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

आपापले सामान घेऊन तर सगळेच रेल्वे स्टेशन जाण्यासाठी पायऱ्या चढतात.
परंतु त्या वेळी तिथे पायऱ्या चढतांना अडचण होत असलेल्या एखाद्या आजीचा
हात धरून जर तिला मदत केली. तर तिने घट्ट धरलेला हात आपल्या आईची
नक्कीच आठवन करून देतो….
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

कधी कमी जागेत मोटारसायकल पार्क करत असतांना स्टॅंडवर मोटारसायकल
तिरकी न लावता…. जर गाडी स्टॅंडवर सरळ लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली….
तर त्याचे धन्यवाद ऐकायला मस्त वाटते…!
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

किराणा दुकानाच्या गर्दीत… तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने
जर त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली…. तर सामानाला नीट ठेवणे
तिला सोप्पे जाते….!
माणसा – माणसांतील निष्कारण असलेली बंधने गळून पडतात….!
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

2] कधी कधी होत असते असे….!

आपण खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये राहतो…
खूप वर्षांनी एकाएक एका जवळच्या मित्राला
आपली आठवण येते….

आपली इच्छा असूनही आपण मित्राचा फोन उचलू शकत नाही.
मग संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला त्या मित्राची आठवण येते.
परत फोन करावा तर बोलायला आपल्याकडे विषयच नसतो.
आपण फोन करायचे टाळत असतो…

मग त्या मित्राचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…
मित्रा… तुझ्या ऑफिसच्या बाहेर होतो… भेटलो असतो आपण….
त्यातच जुन्या आठवणी काढत बसतो आणि मनाला रमवत बसतो…
स्वतःला खोटेनाटे समजावित असतो…!
कधी कधी होत असते असे….!
🍁🍁🍁

कडक उन्हात आपण सिग्नल लाल असल्याने थांबलेले असतो…
एक म्हातारा आणि म्हातारी रस्त्याच्या बाजूला भिक मागत असते…
आपले मन दाटून येते… असे कसे लोकं आपल्या म्हाताऱ्या
आई – वडिलांना असे वाऱ्यावर सोडून देत असतील…?

आपला खिशात हात जातो… शंभराची नोट हातात येते…
आता व्यवहार ममतेची जागा घेतो. हे सर्व समोरील म्हातारा ओळखतो…
आणि आपल्याला बोलतो…. बाळा दहा रुपये दिले तरी खूप आहेत…
तो आपली पेचातून सुटका करतो
आपल्याला आपल्याच नजरेत लहान करून…!
कधी कधी होत असते असे….!

🍁🍁🍁

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

घरी दिवाळीचे पाहुणे जमलेले असतात…
आज कामवाली येणार की नाही
याची मनात धाकधूक चाललेली असते….
तिच्या असण्याने आपण किती निवांत असतो…
अशा वेळेसच याची जाणीव होते.

दुपारचे जेवण उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…
कामवाली बाई येते… आणि आपले काम आटोपत असते…
आपण तिच्या मुलांना उरलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात
असतांनाच कामवाली बाई आपल्या हातात एक डब्बा देते…
त्या डब्यात चिवडा लाडू असतो…!

साहेब तुम्ही दर वेळीच देता… आज तुम्हाला माझ्याकडून……
आता कोण श्रीमंत आणि कोण गरीब हा विचार आपला पिच्छाच
सोडत नाही.
कधी कधी होत असते असे….!

🍁🍁🍁

उन्हाळ्यात आपण गच्चीवर गाढ झोपेत असतो…
त्यातच उन अंगावर येताच आई उठविते.
आपल्या लक्षात येते कि आईला ताप आहे.
सुट्टीत आपण आलो आहे म्हणून अंगात उसने बळ आणते.
मेसच्या खाण्याने कंटाळला असेल म्हणून चार दिवस होईल
तितके पदार्थ पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात.

दिवस उलटत असतात आणि एके रात्री वडिलांचा फोन येतो….
जर काम झाले असेल तर तुझ्या आईला एक फोन कर…
आज तिचा वाढदिवस आहे.
निर्लज्जपणा म्हणजे हाच तो काय…!
झटपट फेसबुक च्या आभासी मित्रांना
दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा आठवतात…..!

आपण लाजत आईला फोन करतो… त्यावर आई बोलते
” बाळा या वयात आमचा कसला रे वाढदिवस….? तू जेवलास ना…?
आपल्या तब्येतीला जप बाळा….”

कानात एकदाम गरम तेल ओतल्याचा भास होतो….
अश्रूं डोळ्यांतून मुक्त होऊन वाहायला लागतात.
आपल्या पासून काहीतरी खूप खूप दूर जात आहे…
असे आपल्याला जाणवत असते….! खरेच

कधी कधी होत असते असे….!
👍👍👍

Also Read :-

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here