Marathi Suvichar | Sunder Vichar Marathi | दृष्टीकोन

0
935
Marathi Suvichar | Sunder Vichar Marathi | दृष्टीकोन
marathi-suvichar-sunder-vichar-दुष्टीकोन

Marathi Suvichar | Sunder Vichar Marathi | दृष्टीकोन

marathi-suvichar-sunder-vichar-दुष्टीकोन-मराठी-सुविचार-नाते-विजय-भगत-good-thoughts

एक नवीन लग्न झालेले जोडपे भाड्याने घर घेऊन राहायला येतात.

एक दिवस दोघेही सोबत चहा घेत असतांना अचानक बायकोचे लक्ष

समोरच्या घरी दोरीवर वाळत असलेल्या कपड्यांवर जाते आणि ते बघून

आपल्या नवऱ्याला म्हणते…

समोरच्या घरच्या लोकांना स्वच्छ कपडे धुता येत नाहीत…

नवरा म्हणतो… त्यांच्या घरचा साबण संपला असेल.

 

परंतु काही दिवसांनी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको पुन्हा नवऱ्याला तीच

तक्रार करते कि.. समोरील घरचे लोकं तर खूप चांगले आहेत… पण त्यांना

स्वच्छ कपडे धुता येत नाही…!

नवरा फक्त ऐकून घेतो… आणि आता हे नेहमीचे असते…

चार – आठ दिवसात कपडे वाळत दिसले कि बायको आपल्या नवऱ्याला

सांगत असते…

 

असाच एक दिवस पाहते तर, काय चमत्कार…! कपडे एकदम स्वच्छ धुतलेले…!

हे बघून बायको नवर्‍याला म्हणते… अहो ऐकताय का…? समोरच्या वहिनी सुधारल्या.

त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले आहे असे वाटते…

आज बघा कपडे अगदी चकाचक स्वच्छ धुवून वाळत घातले आहेत…

तेवढयातच नवरा बोलतो…. माझ्या राणी… आज मी सकाळी लवकर उठलो

आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. आणि खिडकीचे काच ओल्या फडक्याने

आतून आणि बाहेरून स्वच्छ पुसले. त्यामुळे तुला ते बाहेर वाळत असलेले कपडे

स्वच्छ दिसत आहेत.

 

समोरचे तर नेहमी कपडे स्वच्छच धुवत होते. परंतु आपल्या खिडकीचे काच आतून

बाहेरून खराब असल्यामुळे त्यांची स्वच्छ धुतलेली कपडे तुला खराब दिसत होती.

समोरचे नाही तर आपणच सुधारलोय राणी…!

 

नेहमी आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवूनच

आपण दुसर्‍याकडे पाहिले पाहिजे.

 

नेहमी आपली नजर चांगली ठेवा…

जग खुप सुंदर आहे.

Marathi Suvichar | Sunder Vichar Marathi | दृष्टीकोन

 

मातीने केली एकी तर विट बनते…

विटेनी केली एकी तर भिंत बनते…

आणि जर का.. भिंतीनी केली एकी तर घर बनते.

या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात…

मग आपण तर माणसं आहोत…

नाही का…?

 

विचार असे मांडा की…

कुणीतरी तुमच्या विचारांवर…

विचार केलाच पाहिजे.

 

आपली माणसे – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here