Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes

8
4749
Marathi Suvichar - सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार - Quotes
Marathi Suvichar - सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार - Quotes

Marathi Suvichar |
१०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार,
सुंदर विचार, good thoughts in marathi, motivational quotes in marathi,
तसेच quotes marathi, असे लहान मराठी पण प्रेरणादायक मराठी सुविचार
आणले आहेत. विश्वास आहे कि हे सुविचार तुम्हाला नक्कीच आवडतील
आणि उपयोगी ठरतील.

या marathi suvichaar, marathi quotes सोबत suvichar image हि दिली आहे.

शांत मनाने हे मराठी सुविचार वाचा आणि आपल्या मित्र मंडळी, नातेवाइकांना
शेयर करायला विसरू नका.

सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

नाती मोठी नसतात तर..
ती सांभाळणारी माणसे
मोठी असतात.
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes - नाती

जीवनातील काही गोष्टी
कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच
लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात
करतात.
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes - जीवन-कबड्डी

चांगले मन आणि चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक असतात.
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
जीवनात टिकतात.
*****

Marathi Suvichar

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes -चांगले मन

आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते
त्याला म्हणतात नशीब
सर्व काही असूनही रडवते
त्याला म्हणतात दुर्दैव आणि
थोडे कमी सापडूनही आनंद देते
त्याला म्हणतात जीवन…!
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes -नशीब

चांगल्या कामासाठी शत्रुचेही कौतुक करावे…
पण जर ते समजण्याची त्याची लायकी असेल
तरच….! नाहीतर त्या कौतुकाला ही तो शिवीच
समजणार…!
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes - शत्रु

प्रामाणिक माणसाने समाधानाने
दान पेटीत टाकलेला एक रुपया
हा गैरमार्गाने कमावलेल्या
करोडो रुपयांच्या दाना पेक्षा
जास्त मोलाचा असतो.
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - Quotes -प्रामाणिक

ज्ञान असेल तर शब्द समजतात
आणि
अनुभव असेल तर अर्थ समजतात.
*****

सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

Suvichar marathi shorts video | #shorts, marathi quotes 

Marathi Suvichar - मराठी सुविचार -marathi Quotes

अपमान हे जगातील
सर्वात मोठी प्रेरणा असते
केवळ अपमान पचवता
आला पाहिजे.
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - marathi Quotes

कॅमेरा सोबत लेन्स आणि
माणसाकडे सेन्स असणे
गरजेचे असते. जवळचे आणि
लांबचे नीट समजण्यासाठी…!
*****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - marathi Quotes

ओळखी ही नावात नाही
स्वभावात असावी लागते..!
****

Marathi Suvichar - मराठी सुविचार - marathi Quotes

Good thoughts in marathi | Quotes in Marathi | Suvichar

होकार नाकारायला आणि
नकार स्वीकारायला….
सिंहाचे काळीज लागते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल
तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या
उपस्थितीने त्रास होत असेल…..
त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच
सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

वचन देण्यापेक्षा जास्त अवघड असते
दिलेला वचन जीवनभर टिकवणे….
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात
पेनावर मात्र जबाबदारीचे ओझे असते.
*****

Marathi Suvichar

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो
अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर
अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले
छोटे-मोठे त्याग नात्यातील रेशीम बंधने
अधिक घट्ट करत असतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

आठवण अशी काढा की त्याला सीमा नको,
विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको,
वाट अशी पहा कि त्याला वेळेची मर्यादा नको,
मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

काय करायचे हे ठरले की
कसे करायचे याचा मार्ग सापडतोच.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

समाधानाच्या उजेडात पाहिल्यावर दिसते
आनंद आणि सुख मनातच लपलेले असतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

जग सर्वांसाठी सारखेच असले तरी,
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचीचे
नकाशे वेगवेगळे असतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

Self respect | Best Motivational quotes in marathi |
Good Thoughts In Marathi | मराठी सुविचार

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच
जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच
ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे
दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे
दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचे
आतुन रुडतांनाही दुसऱ्याला हसवायचे
यालाच जगणे म्हणायचे…
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes
marathi suvichar – सुंदर मराठी सुविचार – marathi quotes

काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात
तर काही दुसऱ्यांच्या मनाच्या विचार करून
जगत असतात…. दुःख मात्र त्यांनाच मिळते
जे दुसऱ्याच्या मनाच्या विचार करून जगत असतात….
*****

Marathi Suvichar

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्या जवळ असतात… तेव्हा
दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाही…
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

वाढत्या वया पेक्षा वाढत्या अपेक्षा
माणसाला जास्त थकवतात
सुख आपल्या हातात नाही पण
सुखाने जगणे हे नक्की आपल्या
हातात आहे.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

जी लोक नशीबावर विश्वास ठेवतात
ती लोक भित्री असतात. जे स्वतःचे
भविष्य स्वतः घडवतात तेच खरे
दणकट असतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

वर्तमान काळ आखीव असल्यास
भविष्य काळ रेखीव बनतो.
*****

सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

रस्ता चुकणे चुकीचे नसते
मात्र रस्ता चुकत आहे
हे समजुन पण त्याच रस्त्याने
चालत राहणे चुकीचे आहे.
विश्वास ठेवा कि श्रम संयम आणि
नियम कधीच धोका देत नसतात….!
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

कधीकधी छोट्या गोष्टीत
इतके सारे सुख भेटते की
मोठ्या अपेक्षाही कवडीमोल ठरतात….
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

तुम्ही जसा विचार करता
तशा भावना निर्माण होतात
जशा भावना असतात तशी
तुम्ही कृती करता आणि
तुमच्या आजच्या कृतीवर
तुमचे भविष्य निर्धारित असते….!
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो
त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला
यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

नशिबा पेक्षा कर्तुत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही
तर कर्तृत्वामुळे येते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

Good thoughts in marathi मराठी प्रेरणादायक विचार | सुंदर विचार | रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र….

समजूतदारपणा आणि शांतता हे
वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या
अनुभवांवर अवलंबून असतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

चहाची गोडी
त्याच्या चवीत नसते
जो करतो आणि देतो
त्याच्या भावनेत असते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

मनामध्ये एकदा समाधानाचे
स्टेबलाइजर बसवून घेतले की
मोठ्या सुखामुळे मन हुरळून
जात नाही आणि मोठ्या दुःखामुळे
मन खचून जात नाही.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो
त्या प्रत्येका मागे काही ना काही हेतू असतो
काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा
बघण्यासाठी येतात. काहीजण बऱ्याच गोष्टी
शिकवून जातात. काहीजण आपला नुसता वापर
करून घेतात. तर काही स्पेशल लोक आपल्यातले
सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कारणीभूत ठरतात.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

फार कमावून गमावण्यापेक्षा
मोजके कमावून जतन करणे
महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो
की माणसे
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे
कधी खचत नाही…. माणूस तेव्हाच खचून
जातो, जेव्हा काही लोक आपले असूनही
क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात…!
*****

Marathi Suvichar

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला
प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो
पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात
टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

म्हण आणि मन कुणासमोर मांडत बसू नका
कारण अर्थ ना कळालेली म्हण आणि
अर्थात बुडालेले मन प्रत्येकाला झेपेलच
असे नसते.
*****

marathi suvichar - सुंदर मराठी सुविचार - marathi quotes

मनाला भावतील असे 8 सुंदर सुविचार | Good Thoughts In Marathi

सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

जे बदलता येईल ते बदला
जे बदलता येत नाही ते स्वीकारा
आणि जे स्वीकारता येत नाही
त्यापासून दूर जा परंतु स्वतःला
आनंदी ठेवा.
*****

जो सर्वात आधी क्षमा मागतो
तो धाडसी आहे.
जो सर्वात आधी माफ करतो
तो पराक्रमी आहे. आणि
जो सर्वात आधी विसरून जातो
तो सुखी आहे.
*****

ओवता आले पाहिजे
विणता आपोआप येते
मग तो धागा असो वा नाते.
*****

रानात खत बाजारात पत आणि
घरात एकमत असणाऱ्यांचा
संसार नेहमी सुखाचा होतो…!
*****

गुंठा गुंठा करून काही होत नाही
जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही.

कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही.

मेल्यावर ही माणसाची संपत्ती
कधी कामी येत नाही.

काळी आई इथेच राहणार आहे
तुम्ही इथे राहणार नाही.

मेल्यावर सातबाऱ्यावर
नाव सुद्धा राहणार नाही.

नशिबात आहे त्यापेक्षा जास्त
कधीच मिळत नाही.

ज्याच्याकडे खुप आहे त्याला
सुखाने अन्न गिळत नाही.

जपून राहा माणसा कारण
आयुष्य पुन्हा मिळत नाही.
*****

कष्ट कराल तर पैसा वाढेल
गोड बोलाल तर ओळख वाढेल
आणि आदर कराल तर नाव वाढेल.
*****

ज्याला सोडून जायचे आहे
तो कोणत्याही परिस्थितीत
सोडून जातो पण ज्याला खरंच
साथ द्यायची असते ती व्यक्ती
कोणत्याही परिस्थितीत साथ देते…
*****

जीवन इतक्या इमानदारीने जगा कि
तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी
कोण्या दुसऱ्याचे उदाहरण देण्याची
गरज पडू नये.
*****

वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत…
वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात
सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो.
*****

विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही
परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात….!
*****

आयुष्यात प्रत्येक कामात
आनंद शोधता आला की…
दुःखाचे डोंगर विरळ होत जातात….!
*****

दुसऱ्याचे दोष सहज दाखविता येतात
पण दाखविणारे… आपण कसे आहोत
आणि काय करतो आहे हे मात्र विसरतात…!
*****

देव बनून राहणे सोपे नाही
अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की
लोक त्याला सुद्धा वाळीत टाकतात.

सुंदर विचार | Good Thoughts In Marathi | #suvichar

आयुष्याची पिशवी कायम
थोडी रिकामी असायला हवी
कारण भरलेल्या गाठोड्यांना
अहंकार लवकर येतो.
*****

मिळालेल्या पेक्षा ना मिळालेल्या
गोष्टीची ओढ कधीच आनंदी
राहू देत नाही.
*****

आयुष्यात सुख दुख किती आहे
हे पाहणाऱ्याची नजर नाही तर
जगणाऱ्याचे मन सांगते…..
सुख हा निव्वळ आभास आहे तर
तेच शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे….!
*****

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो
लग्न झाले की आई-वडिलांना विसरतो
मुलं झाले की भावंडांना विसरतो
श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि
म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो.
*****

चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा असेल….!
*****

आयुष्य खूप सुंदर आहे
देवाने सर्व काही दिले आहे
फक्त ते सापडले पाहिजे…
मग आयुष्य आणखीन सुंदर होईल.
*****

देण्याची सवय लावून घेतली की
येणे आपोआप सुरू होते. मग तो
मान असो प्रेम असो वा वेळ असो…!
*****

आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच
रिकाम्या राहत नाही. कारण त्यांना
पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून
लाभलेले असते.
*****

प्राप्तीच्या आनंदापेक्षा
प्रयत्नांचा आनंद
अधिक असतो.
म्हणूनच म्हणतात की….
” प्रयत्नांती परमेश्वर ”
*****

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत
नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुद्धा कधीच करीत नाही.
*****

माणूस कितीही गरीब असला तरी
त्याच्याबद्दल भेदभाव करू नका.
कारण त्याच्या काळ आणि वेळ कधी
बदलेल हे कुणीही सांगू शकत नाही.
*****

पैसे तर सगळेच कमावतात
पण खरा नशीबवान तोच
जो कुटुंब कमावतो.
*****

ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या
प्रेमात पडतात. पण ज्यांची जीभ
गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते.
*****

जीवनात खूप लोक भेटतात
पण एक आपुलकीचे नाते क्वचितच
लोकांबरोबर जुळते. त्या नात्याला
नाव नसते… परंतु काळजी जिव्हाळा
खूप असतो….!
*****

लहानपण किती सुंदर होते
जेव्हा खेळणी हेच जीवन होते.
आणि आता जीवन जगणे हेच
खेळणं आहे….
*****

पुठल्या पानावर काहीतरी
भारी लिहिले असेल या आशेवर
मागची पाने झाकत जाणे म्हणजे
आयुष्य….
*****

आयुष्य खुप कमी आहे
ते आनंदाने जगा.

प्रेम् मधुर आहे
त्याची चव चाखा.

क्रोध घातक आहे
त्याला काढून टाका.

संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांच्या सामना करा.

आठवणी या चिरंतन आहेत
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.
*****

हातात हात घेतला तर मैत्री होते
दोन्ही हात जोडले तर भक्ती होते
कुणाला हात दिला तर मदत होते
आणि हात पुढे केला तर अशक्य ते
शक्य होते….
*****

जय श्री कृष्ण 🙏

सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

Also Read – Suvichar With Images in Marathi | Status Suvichar Marathi

Sunder Vichar Status | Hindi Quotes | Suvichar | सुविचार

Good Thoughts In Marathi | Suvichar | Quotes in Marathi

टीकाकारांचा नेहमी आदरच करा
कारण तुमच्या गैरहजेरीत
ते तुमचे नाव चर्चेत ठेवतात.
*****

आयुष्य आपले असले तरी
ते इतरांसाठी जगावेच लागते.
*****

व्यक्तीचे मोल समजण्यासाठी
एक तर ती व्यक्ती गमवावी लागते
किंवा कमवावी लागते….
*****

खांद्यावर असलेल्या काही जबाबदाऱ्या
ओझे म्हणून नाही तर अभिमान म्हणून
मिरवायच्या असतात….
*****

कोणतेही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी
स्पर्धा करत नाही. कारण त्यांना पण
माहित असते की निसर्गाने प्रत्येकालाच
वेगळे बनवले आहे. प्रत्येकाला काहीतरी
सुंदर दिले आहे.
*****

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता
हा यशस्वी जीवनाचा मार्ग आहे.
*****

माणूस सर्वात जास्त
एकाच ठिकाणी हरतो…
तो म्हणजे केलेला प्रेम
आणि ठेवलेला विश्वास आहे.
*****

नुसतेच आपले म्हणून नाही चालत
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपले समजावे लागते.
*****

परिस्थिती कशीही असो
आयुष्यात संतुलन महत्त्वाचे असते.
*****

प्रत्येकाच्या मनाने एक रेषा आखलेली असते
रेषेच्या पलीकडे परके आणि रेषेच्या अलीकडे
आपले. परक्याने रेष ओलांडली तरी माणूस
अस्वस्थ होतो आणि आपला माणूस जरी
परक्यासारखे वागायला लागला तरीही त्याला
रेषेच्या पलीकडे घालवतांना माणूस अस्वस्थ होतो.
*****

समजुतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो…
खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील
मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.
*****

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी
संयम असणे हीच खरी जीवनातील
सर्वात अवघड परीक्षा आहे.
*****

आयुष्य किती उरले आहे
याची काळजी करण्यापेक्षा
जगायला मिळाले याचा आनंद
काळीज भरून टाकते.
*****

घराच्या चार भिंतींना
प्लास्टर नसले तरी चालेल
पण घरात चार शब्द प्रेमाने
बोलणारी माणसे हवीत.
*****

यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो
अपयशाच्या कथा वाच त्याने यशस्वी होण्यासाठी
कल्पना मिळतात.

अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो
नेहमी इतरांना चुकवण्यात आनंद मानतो……
त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून
इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो
त्याचे नाव संस्कार

एकदाचे आपण स्वतःसाठी वेळ काढणे विसरतो
पण आपल्यासाठी जे खास आहेत त्यांच्यासाठी
नक्कीच वेळात वेळ काढतो

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो
तसे शब्दातील गोडवा माणसातील नाते जपून ठेवतो

थंडी क्षणांची… पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची… पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची…. पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा… पण ओढ कायमची
हीच खरी नाती मनांची…

परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात
खरा माणूस गमावू नका. कारण
परिपूर्णता ही काल्पनिक गोष्ट आहे
पण सत्य हे नेहमीच वास्तव असते…!

आनंद शोधू नका आनंद निर्माण करा
कारण निर्मितीवर जीएसटी शून्य प्रतिशत आहे.
स्वतःच्या शोध स्वतःमध्ये घ्या बाकी सगळे
गुगलवर आहे.

परिवर्तनावर लक्ष ठेवले आणि
ते पुरेशा काळ टिकवले तर
संस्कृती निर्माण होते…!

निस्वार्थ भावनेने केलेले कोणतेही कर्म
परमेश्वराचे कार्य बनते…!

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात
पण कधीकधी सर्व काही सुरळीत
होण्यासाठी सुद्धा काही वेळ
जाऊ द्यावा लागतो.

जर माणसाची नीती चांगली असेल
तर मनात कुठलीच भीती राहत नाही….!

फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो
पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तुत्व
दरवळते त्याला कोणी विझवू शकत नाही…!

आरसा जरी दिसायला नाजूक असतो
तरी त्याच्यासारखे खरे दाखवण्याचे
धाडस दुसऱ्या कोणातही नाही…

आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही
ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच
होत नाही.

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो….
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा.
नाते तोडणे सोपे आहे ते पुन्हा जोडणे
खूपच अवघड आहे…

जरी कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला
तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे
आपल्याच हातात असते.

आयुष्याच्या पूर्वार्धात कुठल्याही
संकटाची झगडणारा व्यक्ती
वयाच्या उत्तरार्धात निराश
व हतबल असतो. कारण
त्याला संकटा पेक्षा आपल्याच
माणसांनी हरवलेले असते.

कारणे देण्यापेक्षा नकार द्या…
निदान मन तरी दुखावले जाणार नाहीत…!

ज्यांना आपली चूक समजत नाही
अशा लोकांना कधीच त्यांची
चूक दाखवण्याच्या प्रयत्न करू नये.
कारण ते इतके मूर्ख असतात की
ते स्वतःची चूक तर मानतच नाही
उलट आपल्यालाच चुकीचे ठरवतात.

डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाही
भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.

जीवन सुरळीत चालू असते
मनापासून जपलेल्या नात्यांवर
पण शब्दही सांभाळून वापरायला हवेत
नाही तर कधी उध्वस्त होऊ शकते
दोनशे ग्रॅम च्या मोबाईलवर
******
प्रत्येक गोष्टीचे आदर करायला शिका
कारण ना जीवन परत येते….
ना जीवनातून गेलेली माणसे….
ना गेलेली वेळ….
******
कुणाचे कौतुक कितीही करा
पण अपमान खूप विचारपूर्वक करा.
कारण अपमान हे असे कर्ज आहे….
जे प्रत्येक जण व्याजासह परत
करण्याची संधी शोधत असतो.
******
यशस्वी व्हायचे असेल तर
कुटुंब आणि मित्रांची गरज असते
पण यशाचे शिखर गाठायचे असेल
तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते…!
******
जगणे आणि जगून दाखवणे
यातला फरक तेव्हाच कळतो
जेव्हा जगतांना आपण स्वतः
कुठेतरी जळतो….!
******
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो
तेव्हा त्यांना असे वाटते की
आपण नेहमी रिकामे असतो
पण त्यांना हे कळत नाही की
आपण फक्त त्यांच्यासाठीच
वेळ काढतो…
******
मैत्री आणि नाती ही एक
कांद्या सारखी आहे….
ज्याला भरपूर थर आहेत
जे तुमच्या जीवनात स्वादिष्ट
चव आणतील पण जर तुम्ही त्यांना
मध्येच कापण्याच्या प्रयत्न केलात
तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील….!
******
आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट
सुंदर फुलांकडून शिकावी.
फुलांसाठी कोणीही नसते पण फुलेही
सर्वांसाठी असतात. आणि सर्वांना
सारखाच सुगंध देतात.
******
जीवनात अशा व्यक्तीशी
नाते जोडण्याचा प्रयत्न करा
ज्यांना खरोखर तुमच्या भावनांचा
आदर आहे…
******
भावना कळायला मन लागते….
वेदना कळायला जाणीव लागते….
देव कळायला श्रद्धा लागते….
माणूस कळायला माणुसकी लागते….
चांगले जगायला सुंदर विचार लागतात….
आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही
तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागते…..!
******

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here