Moral Story In Marathi | Bodhkatha Marathi I तणाव | बोधकथा

0
861
Moral Story In Marathi - Bodhkatha Marathi - तणाव - बोधकथा
Moral Story In Marathi - Bodhkatha Marathi - तणाव - बोधकथा

Moral Story In Marathi | Bodhkatha Marathi
तणाव | बोधकथा

नक्की वाचा
एक खूपच चांगला मेसेज तुमच्या सोबत शेयर करीत आहे.

बारही महिने कधीही वादळवारे आणि पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात
एका श्रीमंत शेतकऱ्याला घरकामासाठी, घोड्यांची निगा राखण्यासाठी
तसेच घोड्यांचा तबेला स्वच्छ करण्यासाठी एक नोकर हवा होता.

एका सकाळी एक मुलगा आला… जो दिसायला खुपच पातळ आणि कमजोर होता.
त्या मुलाने श्रीमंत शेतकऱ्याला नोकरी मागितली. शेतकरी थोडा वेळ मुलाकडे
बघत राहिला आणि म्हणाला… “अरे बाळा तू काय काम करू शकणार….?” असे
त्या मुलाला थोडे टाळण्याच्या सुरात शेतकऱ्याने विचारले.

त्यावर मुलगा म्हणाला, ” साहेब जरी मोठा वादळ वारा असो… वादळाच्या मोठ्या
गडगडाटी असोत… खूप जोरात पाऊस पडत असला तरीही मी रात्रीला
गाढ झोपू शकतो….!

शेतकऱ्याला त्या मुलाचे बोलणे थोडे वेगळेच वाटले…. शेतकऱ्याला तालुक्याला जायची
जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून शेतकरी
घरी आला. खूप थकला होता. लगेच झोपायला गेला.

Moral Story In Marathi | Bodhkatha Marathi
तणाव | बोधकथा

मध्यरात्रीला जोराचा वारा… भयंकर अशी गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला.
त्याची झोप उघडली…. त्याला आठवले, घोड्यांसाठी तबेल्यात गवत भरलेले नव्हते.
दारासमोर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. पाणी पण ठेवलेले नव्हते.

Moral Story In Marathi – कहाणी संग्रह

शेतकऱ्याला खूप काळजी वाटायला लागली… तसेच त्याला नवीन नौकाराची आठवण झाली
आणि त्याने नोकराला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. परंतु काहीही प्रतिसाद
मिळाला नाही. घरात तो कुठेही दिसत नव्हता. शेवटी शिव्या घालीत स्वतः रेनकोट घातला…
आणि टॉर्च घेऊन तबेल्यात जायला निघाला…

तबेल्यात पोहचल्यावर शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला… तो बघतो तर काय….
सर्व गवत आवरून… त्याचे ढीग करून झाकून ठेवलेले होते. तबेल्यात आत गेला तर…
गव्हाणीत गवत आणि पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन
समाधानाने झोप घेत होते.

आता तो उत्सुकतेने मुलाला शोधायला लागला…. तर त्याला दिसले….
वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून तो नवा नोकर अगदी निवांतपणे
पाय लांब करून झोपला होता. आणि मोठ्याने घोरत होता… बाहेर निसर्गाचे एवढे तांडव
सुरु होते…. याची त्याला काहीही माहिती नव्हतीच…!

तो मुलगा निवांतपणे झोपू शकला. कारण त्याला कसलाही ताण नव्हता. का नव्हता….?
तर त्या मुलाने झोपायला जायच्या अगोदरच त्या दिवसाची आपली संपूर्ण कामे
व्यवस्थितपणे पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत येण्यासाठी एकही फट नव्हती….!

कोणतेही काम, प्रोजेक्ट, कोणतीही कंपनी, आणि कोणताही देशाचा अथवा देशाबाहेरचा
पक्षकार [ ग्राहक ] तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या जीवनासाठी कंपन्या आहेत,
नोकऱ्या आहेत, तुमचे जीवन त्यांच्यासाठी नाही. कृपा करून जितके जमेल, झेपेल इतकेच
काम हातात घ्या… त्यासाठी आग्रह धरा.

वाढत्या पगाराच्या नादाने, प्रतिष्ठा, पोस्ट, अथवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या
हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान
काहीही नाही…. याचे थोडे भान ठेवा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण
वातावरणाचा परिणाम ऑफिस मधल्या कामावर नक्कीच होतो आणि घरचे आनंदी
वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारे ठरते. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात
इत्यादी…. इत्यादी… घरी घेऊन न येता… तिथेच विसरून या.

Moral Story In Marathi – कहाणी संग्रह

स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे.
तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती
ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही,
याबद्दल खात्री बाळगा.

ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, आयुष्य भराच्या साथीची
अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावले
टाकायची आहेत. ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणे गरजेचे आहे.

तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादि चा उपयोग करा. हे सगळे सगळ्यांनाच माहिती असते.
तरीही आपण धावतो… ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.

दोन तत्त्वं :

“एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका.”
“दुसरे म्हणजे जीवनाच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात “

पुढे वाचा :-

Good Thoughts in Marathi | प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

Moral Story In Marathi – कहाणी संग्रह

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here