मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi | Bodh Katha

3
2391
मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi Bodh Katha
मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi Bodh Katha

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi
Bodh Katha

नानकजीचा आशीर्वाद

गुरुनानक जी एकदा चालता – चालता एका गावात गेले…
त्या गावातील गावकऱ्यांनी गुरुनानकजी यांना गावातून हाकलून दिले आणि
त्यांचा अपमानही केला…
एवढे वाईट करूनही नानकजींनी त्या गावकऱ्यांना आशीर्वाद दिला की…
आपल्या गावातील ही एकता सदैव अशीच कायम राहो…!

तिथून निघाल्यावर गुरुनानक जी पुढे रस्त्यात आलेल्या दुसऱ्या गावात गेले…
त्या गावातील गावकऱ्यांनी गुरुनानकजी यांचा खूप आदर सत्कार केला….
प्रत्येक गावकरीने आपुलकीने विचारपूस केली… तसेच गावात मुक्काम करण्याचा
आग्रही धरला…

नानक जी गावात थांबले आणि रात्रीला प्रवचन ही केला… जो पर्यंत नानक जी थांबले…
तो पर्यंत त्यांची गावकऱ्यांनी खूप सेवा केली… शेवटी गावातून निरोप घेतांना नानक जी
आशीर्वाद रूपाने म्हणाले…

तुमच्या गावाचा पूर्णपणे नाश होवो… तुमचं वाटोळे होवोत… तुमच्यात भांडणे होवोत….
आणि तुमची फुटाफूट होवो….

हे ऐकून नानाकजी चे सोबत असलेले शिष्य आश्चर्यचकित झाले आणि विचारायला लागले….
आपण हा कसा आशीर्वाद या इतक्या चांगल्या गावकऱ्यांना दिलात….?
नानक हसत म्हणाले…

तुम्ही प्रथम पहिले गावकरी आणि दुसरे गावकरी यांतला अंतर लक्षात आणा…
या दुसऱ्या गावातील प्रत्येक गावकरी हा एक सज्जन माणूस आहे.
या सगळ्यांचे एकाच गावात काय काम आहे….?

जर भांडण झाले… तुटातुट झाली… तर हे गावकरी दुसऱ्या गावात जातील.
असे झाल्याने… ते सगळेच गांव सुधरतील…! तसेच पहिल्या गावातील गावकरी हे
त्याच गावात जितका वेळ सोबत राहतील… ते चांगलेच आहे…!
गटाराचे पाणी एकाच ठिकाणी साठले तर चांगले… परंतु गंगे चे सगळीकडे
पसरायला पाहिजे….!

तात्पर्य :-
चांगल्याचा विस्तार होणे… हेच जगाला सुखी करण्याचे रहस्य आहे….!

मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi - Bodh Katha
मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi – Bodh Katha

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi
Bodh Katha

जीवनात खूप त्रास असुनही अगदी
प्रामाणिक राहणे…
भरपूर संपत्ती असुनही अगदी साधे राहणे…
मोठे अधिकार असुनही अगदी नम्र राहणे…
खूप रागात असुनही अगदी शांत राहणे…
यालाच आयुष्याचे व्यवस्थापन म्हणतात.

विचार – मराठी बोधकथा

मित्रांनो…
माणसाच्या अंगी नम्रता ही असावीच.
त्याचप्रमाणें शब्दांना जपून
वापर करण्याची समज ही असावी…!
ज्याच्या अंगी या सगळ्यांचा मिलाप असतो,
त्याच्याच हातून मोठे कार्य घडतात.

थॉमस अल्वा एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला…
या महान शास्त्रज्ञाच्या आयुष्यातील ही घटना….

जेव्हा ग्रामोफोन या यंत्राचा शोध लावला.
यंत्राच्या तोंडातून पहिले शब्द बाहेर पडले.
त्या काळात तर तो एक मोठा चमत्कारच होता.

एका कार्यक्रमात कुणीतरी त्यांची ओळख करून देतांना म्हणाले…
हे थॉमस अल्वा एडिसन आहेत… या साहेबांनी बोलणारे यंत्र शोधून
काढले आहे.

यावर एडिसनने अगदी नम्रपणे सांगितले की… शब्द बोलणारे यंत्र तर
भगवंताने शोधून काढले आहे. मी जे यंत्र शोधून काढले आहे…
ते बोललेले शब्द थांबविण्याचे यंत्र आहे.

खूप सारे शोध लावलेल्या या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने वरील वाक्य काढले.
कारण… त्यांना शब्दांचे सामर्थ्य माहिती होते. ते जपून वापरले पाहिजेत.
हे त्यांना कळत होते आणि नम्रता तर त्याच्या नसानसांत होतीच.

तात्पर्य : बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून नम्रपणे बोलावे.

अतिथी धर्म – मराठी बोधकथा – Moral Story In Marathi

अतिथी धर्म – मराठी बोधकथा - Moral Story In Marathi
अतिथी धर्म – मराठी बोधकथा – Moral Story In Marathi

कमलाकर एका चोराचा पाठलाग करीत होता. तो चोर गावातील
लहान लहान गल्लीतून पळत होता आणि शेवटी पळता – पळता
कमलाकर ची नजर चुकवून तो त्या गावातील एका घरात घुसला…!

त्या गावात अतिथी धर्म पाळण्याची सुंदर प्रथा होती…! तो चोर
ज्या घरात घुसला त्या घरातील व्यक्ती ने त्या गावाच्या प्रथेप्रमाणे
आपला अतिथी धर्म पाळला.

त्याच्या घरात घुसलेल्या चोराला आतील खोलीत लपविले…!
इतक्यातच कमलाकर ही पाठलाग करता करता त्याच घरी आला…

कमलाकरने त्या व्यक्तीला चोराबद्दल सांगितले आणि विचारले की…
असा कुणी व्यक्ती इकडे आला होता का….? तुम्ही त्याला इकडे पहिले का…?
असे विचारले…

त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो व्यक्ती खोटे बोलला
आणि अश्या व्यक्तीला मी पाहिला नसल्याचे कमलाकर ला सांगितले.

परंतु… त्या व्यक्तीच्या मुलाने मात्र कमलाकरकडे बघून आतल्या खोलीकडे बोट
दाखविले… कमलाकर काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत जाऊन
त्या चोराला पकडले आणि तो त्या चोराला घेऊन गेला.

त्या कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलाचा खूप राग आला. कारण….
त्याच्या मुलाने त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळला
नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे अगदी बरोबर होते.

तात्पर्य :-
परिस्थितीनुसार सत्याचा अर्थ आणि महत्व बदलत राहते…!

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here