बोधकथा, खरा पुण्यवान | मराठी कहाणी – Moral Story Marathi

0
610
मराठी-बोधकथा-सुंदर-विचार-बोधकथा-इन-मराठी-vb-विजय-भगत-सुविचार
मराठी-बोधकथा-सुंदर-विचार-बोधकथा

बोधकथा, खरा पुण्यवान | मराठी कहाणी – Moral Story Marathi

एका गावाच्या बाहेर एक म्हतारी बाई आपल्या नातनी सोबत राहत असते.
एक दिवस त्या गावात पाच दरोडेखोर गावात दरोडा करण्यासाठी दाखल झाले.
पण त्याच वेळी विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली…

आता ते पाचही दरोडेखोरांनी तिथून पाळ काढला… सैरभैर पळता पळता त्यांना
गावाबाहेर असलेल्या म्हतारीची झोपडी दिसली त्यांना आश्रयासाची गरज होती,
म्हणून ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.

म्हतारीने त्यांच्यासाठी जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता
सहजच पाप पुण्याचा विषय निघाला, प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

शेवटी म्हतारीने शर्यत लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या
झाडाला हात लावून पुन्हा झोपडीमध्ये यायचे. अंगावर ज्याच्या विज पडली तो पापी
आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत परत आला तो पुण्यवान.

बोधकथा, खरा पुण्यवान

दरोडेखोरांनी शर्यत मंजूर करत एक दरोडेखोर गेला झाडाला हात लावून सुखरुप
झोपडीत आला. अश्याप्रकारे एक – एक करत पाचही दरोडेखोर गेले आणि
झाडाला हात लावूनि सुखरूप झोपडीत परत आले.

आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातनीवर…! म्हतारीच्या मनामध्ये
प्रश्न पडला की हे पाचही दरोडेखोर तर पुण्यवान निघाले. नक्कीच आपण
पापी आहोत… विज आपल्या अंगावर नक्कीच पडणार असा विचार करत…
तिने आपल्या नातीनला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल
टाकले. त्याच क्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली
आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

मराठी कहाणी – Moral Story Marathi

तात्पर्य :-
एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही पाच पापी माणसे
जगु शकतात… पण त्याने साथ सोडली तर ते पाचही
भस्मसात होऊ शकतात.

बोधकथा, खरा पुण्यवान | मराठी कहाणी – Moral Story Marathi

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here