Moral Story Marathi | बोध कथा | देव सोबतच आहे.

0
476
Moral Story Marathi - बोध कथा - देव सोबतच आहे - vb good thoughts
Moral Story Marathi - बोध कथा - देव सोबतच आहे - vb good thoughts

Moral Story Marathi | बोध कथा | देव सोबतच आहे

आठ दहा वर्षाचा एक मुलगा दरवर्षी शाळेला सुट्या लागल्यावर
आपल्या आजी आजोबांच्या जवळ जात असे.

उन्हाळी सुट्टीत तो एक महिना आजी – आजोबा कडे राहत होता.
हा त्याचा दरवर्षी चा नियम होता.

एकदा तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला….
मी आता मोठा झालो आहे बाबा… मला आता सगळे काही समजायला येते.
बाबा या वर्षी मी एकटाच प्रवास करून आजी – आजोबाकडे जाणार आहे.

वडिलांनी त्याला सर्वप्रकारे समजविण्याचा प्रयत्न केला… पण तो लहान मुलगा
काहीही ऐकायला तयारच नव्हता…. शेवटी वडील त्याला एकटा प्रवास करीत
आजी आजोबा कडे पाठवायला तयार झाले.

वडील स्टेशन पर्यंत आले त्याला गाडी बसवून दिली आणि काही सूचना दिल्या.
वडील म्हणाले… बाळा नीट जा…. तू प्रथमच एकटा प्रवास करीत आहेस….

सर्व सूचना देवून नीटपणे समजावून दिले आणि गाडी सुटण्याची वेळ होताच
वडिलाने मुलाच्या खिशात एक चिठ्ठी टाकली आणि सांगितले की….
हे बघ बाळा… जर तुला खूप भिती वाटली….. खूप एकटे वाटले….
तरच ही चिठ्ठी वाच. अगदी शेवटचा पर्याय म्हणून….! समजले…..?
मुलगा हो म्हणाला आणि तसीच गाडी ने सुटण्यासाठी शिटी वाजविली.

काही क्षणातच गाडी सुरू झाली आणि मुलाचा एकट्याने करायचा हा पहिलाच
प्रवास सुरु झाला.

Moral Story Marathi | बोध कथा | देव सोबतच आहे

गाडी हळूहळू वेग घ्यायला लागली आणि तो मुलगा खिडकीतून गंमत बघायला लागला..
पळती झाडे…. नदी…. डोंगर…. पाहून मुलगा खूप आनंदी होत होता…

हळूहळू गर्दी वाढू लागली… अनोळखी लोकांच्या गर्दीत त्याला भीती वाटायला लागली.
कुणीतरी आपल्याकडे एकटक बघत आहे…. असे उगाचच त्याला वाटायला लागले.
त्याला रडू यायला लागले…. आता त्याला आई वडिलांची गरज भासू लागली…
त्याला वाटायला लागले कि माझे आई बाबा माझ्याकडे पाहिजे…

तसेच त्याला आठवले की…. वडिलांनी सांगितले आहे…. जर का तुला असे काही
वाटायला लागले तर… ही खिशातली चिठ्ठी काढून वाचशील….. तसाच मुलाने
भीत भीत आपल्या खिशातील चिठ्ठी काढली… त्या चिठ्ठीत एकच ओळ लिहिली होती….
भिऊ नको बाळा… मी पुढ्च्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करीत आहे.

त्या लहान मुलाचे डोळे डबडबले… त्याला आता धीर आला…. चांगले वाटायला लागले…
त्याची भिती लांब पळाली होती…

देवानेही… आपल्या सर्वाच्या खिशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात
प्रवासाला पाठवले आहे. या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे…
मग कसली भीती.
हा प्रवास छान हसत हसत करूया….!

जय श्री कृष्णा

🙏🙏🙏🙏🙏

Moral Story Marathi | बोध कथा | देव सोबतच आहे

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi | Bodh Katha

Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – व्यंग – कहाणी संग्रह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here