नक्की वाचा – अशिक्षित आई | Mother Suvichar in Marathi – Aai

0
681
नक्की वाचा - अशिक्षित आई | Mother Suvichar in Marathi - Aai
नक्की वाचा - अशिक्षित आई | Mother Suvichar in Marathi - Aai

नक्की वाचा – अशिक्षित आई |
Mother Suvichar in Marathi – Aai

10 वी बोर्डाच्या परिक्षेत एका मध्यमवर्गीय घरातील मुलाला 90 टक्के
गुण मिळाले. वडील खूप आनंदाने गुणपत्रिका पाहत आपल्या बायकोला…
अग… ऐकत आहे का…? छान गोड शिरा बनवं…
तुझ्या लाडक्याला 90 टक्के गुण मिळालेत… बोर्डाच्या परिक्षेत…!

एकदा वाचाच… डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही…!

मुलाची आई स्वयंपाक घरातून धावत – धावत येत म्हणाली…
मला बघायचे आहे… गुणपत्रिका दाखवा…. इतक्यात मुलगा पटकन बोलला…
बाबा आईला निकाल कशाला दाखवता…! तिला काही वाचता लिहता येते का…!
ती तर अशिक्षित आहे ना बाबा…?
हे ऐकताच आईचे डोळे भरून आले… भरल्या डोळ्यांना पदराने पुसत आई
स्वयंपाकघरात शिरा बनवायला निघुन गेली. पण ही गोष्ट लगेच वडिलांच्या
लक्षात आली…! त्यावर ते मुलाच्या शब्दांना आपले शब्द मिळवत म्हणाले…
हो रे आईच्या लाडक्या तुझेही बरोबर आहे…!
आमचे लग्न झाले तेव्हा चार महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली…
मी थोडा विचारात पडलो… लग्नानंतर कुठेही फिरायला गेलो नाही…
चांगल्याप्रकारे एकमेकांना समजले पण नाही… मला वेळच देता आला नाही…!
म्हणुन ह्यावेळी गर्भपात करुन पुढे नंतर बघू… पण बाळा तुझी आई ठामपणे
माझ्या निर्णयाला “नाही” म्हणाली… नको ते नंतर वगैरे… फिरणे…
समजणे पण नको… आणि बाळा तुझा जन्म झाला… अशिक्षित होती ना रे…!
तु पोटात असताना तिला दुध मुळीच आवडत नसतांनाही तु स्वस्थ व्हावास
म्हणून नऊ महीने ती दररोज दुध पित होती… अशिक्षित होती ना रे…!
तुझी शाळा सकाळी सात वाजता लागायची म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता
उठुन तुझ्या आवडीचा नाश्ता आणि डबा बनवायची…. अशिक्षित होती ना रे…
तु रात्रीला अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा तुझी आई तुझ्या वह्या
पुस्तका बाजूला करून… त्यांना बरोबर ठेऊन तुझ्या अंगावर पांघरुन
नंतरच झोपायची… अशिक्षित होती ना रे ती…!

नक्की वाचा – अशिक्षित आई |
Mother Suvichar in Marathi – Aai

बेटा तू लहानपणी खुपदा आजारी असायचास… तेव्हा रात्र-रात्र भर जागुनही
सकाळी परत आपली पूर्ण कामे करायची… अशिक्षित होती ना रे ती…!
तुझ्यासाठी महागडे कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि
स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची. अशिक्षित होती ना रे ती…!
माझ्या लाडक्या… या जगात चांगली शिकलेली लोकं प्रथम स्वतःचा स्वार्थ
साधतात पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
अशिक्षित आहे ना रे ती…!
तुझी आई स्वयंपाक करून जेवण आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः
जेवायचे विसरुन जायची… म्हणूनमी अभिमानाने सांगतो बाळा की…
तुझी आई अशिक्षित आहे रे…!
हे सगळ ऐकुन मुलगा रडत रडत आईला बिलगुन बोलायला लागला…
आई मी तर फक्त पेपरवर 90 टक्के गुण मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला
100 टक्के बनवणारी तु माझी पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची 
मुलं 90 टक्के गुण मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा 
मी कधीच विचार केला नाही.
आई मला आज 90 टक्के गुण मिळवुनही मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे
पीएचडी च्या पण वरची डिग्री आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात
डॉक्टर… शिक्षक… वकिल… माझे कपडे शिवणारी… चांगला स्वयंपाक
करणारी… ह्या सगळ्यांचे दर्शन घेतले…!
बोध… प्रत्येक मुला- मुलीनी जे आईवडिलांचा अपमान करतात…
पाणउतारा करतात… शुल्लक कारणावरुन रागवतात…
त्यांनी विचार करावा…. त्यांच्यासाठी काय काय सोसलय…आईवडिलांनी…
aai-good-thoights-in-marathi-on-life-vb-vijay-bhagat-suvichar-sunder-vichar-chhan-vichar-marathi-आई
अशिक्षित आई | Mother Suvichar in Marathi – Aai
आई…
शिक्षित असो… किंवा अशिक्षित…
जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता
तेव्हा तिच्या सारखा मार्गदर्शक
या पृथ्वीवर दुसरा शोधूनही
सापडणार नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here