45+Best Motivational Quotes In Marathi –
सुंदर सुविचार मराठी
या गोष्टी तुम्हाला आतून
मजबूत करतील….!
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपल्यासाठी
Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार मराठी –
आयुष्यावर सुविचार आणले आहेत. जर आपण चांगले विचार,
marathi motivation, suvichar marathi, best suvichar,
motivational speech in marathi,
best lines, सुविचार दाखवा, heart touching status, status in marathi,
सुंदर विचार, हृदयस्पर्शी विचार, inspirational quotes, motivational speech,
inspiring, quotes about Life, positive thoughts, चांगल्या गोष्टी,
happy thoughts, inspired quotes, आणि good thoughts in marathi
असे विचार शोधत आहात तर हे विचार वाचून नक्कीच आपल्या आयुष्यात
बदल घडेल. तसेच तुमचे मन फ्रेश होईल.
1. आयुष्यामध्ये नेहमी
एक गोष्ट लक्षात ठेवा….
की जी गोष्ट तुम्ही कमवू
शकता… ती गोष्ट
दुसऱ्यांकडून मागणे
बंद करा.
2. ताकत आणि पैसा आयुष्याचे
फळ आहे. परंतु परिवार आणि
मित्र आयुष्याचे मूळ आहे.
झाड फळा विना जगू शकते
परंतु मूळ नसेल तर झाड
उभे सुद्धा राहू शकत नाही.
3. आयुष्यामध्ये मागे पाहिले तर
अनुभव मिळेल. पुढे पाहिले…
तर उमेद मिळेल. आणि
आजूबाजूला पाहिले…. तर
सत्य दिसेल. परंतु आपल्या
स्वतःमध्ये पाहिले…. तर
परमात्मा दिसेल…..
आत्मविश्वास दिसेल….!
४. विश्व गरजेच्या नियमावर चालते
लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट
पाहत असतात… त्याच सूर्याचा
उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात.
तुमची किंमत तेव्हाच होते….
जेव्हा तुमची गरज असते….!
५. कधी कधी आपण चुकीचे
नसतो. परंतु आपल्याजवळ
ते शब्द नसतात… जे आपण
बरोबर असल्याचा पुरावा
देतात…..!
६. चांगले जीवन मिळवण्यासाठी
जीवन जगणेच विसरून गेलो
आहोत आपण.
७. कधीतरी एकट्याने बसून विचार
करा. आणि चिंता करा की….
आपण नसल्यावर कोणाला
सगळ्यात जास्त फरक पडेल.
आणि ज्याला फरक पडत असेल
त्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना
त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास
ठेवा…. असे केल्याने तुमचे जीवन
सुखकर होईल.
Motivational Quotes Marathi | 100+ प्रेरणादायी सुविचार मराठी
ही पोस्ट नक्की वाचा. या पोस्ट मध्ये जबरदस्त प्रेरणादायी मराठी सुविचार आहेत. जे तुम्हाला आयुष्यात motivate करतील. या पोस्ट मधील motivational quotes in marathi एकदा जरूर वाचा.
८. भलेही तुमच्याजवळ सर्व
प्रकारच्या डिग्री असतील…
परंतु जर तुम्ही आपल्या
माणसांचे डोळे वाचू
शकले नाही…. तर तुम्ही
अशिक्षित आहात.
९. कडुलिंबाच्या पानांना तुम्ही
कितीही दह्यात किंवा साखरेत
मिसळवा… परंतु ते कडूच
राहते. तसेच दुष्ट व्यक्तीला
तुम्ही कितीही ज्ञान द्या….
तरीही ते त्यांची दृष्टता सोडत
नाहीत….!
१०. कोणी आपला अपमान
केला. किंवा आपल्याला
नाकारले तर त्यापासून
लांब जाण्यापेक्षा त्यांच्या
समोर राहून काहीतरी
असे करायचे की आपला
अपमान करून तो माणूस
कायमचा पस्तावा करेल.
११. आपल्याला पावरफुल बनायचे
आहे…. यासाठी नाही की
आपण कोणावर दबाव टाकू
शकू. पण यासाठी… की कोणी
आपल्यावर दबाव टाकू
शकणार नाही.
Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार मराठी
१२. ज्या दिवशी तुमची
सही ऑटोग्राफ बनेल….
त्या दिवशी समजून घ्या
तुम्ही एक यशस्वी व्यक्ती
झाले आहात.
१३. चांगलेपणा आपल्यात नाही…
तर आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये
असतो. कारण असे कसे शक्य
आहे… की एकच व्यक्ती काही
लोकांना खूप चुकीचा वाटतो….
परंतु तोच व्यक्ती काही लोकांना
खूप समजदार वाटतो….!
१४. मजबूत व्यक्तीकडे पाहून
लोकांना वाटते की हा तुटत
कसा नाही. परंतु लोकांना हे
माहीत नसते की तुटल्यामुळेच
हा व्यक्ती इतका मजबूत झालेला
आहे.
१५. लोकांच्या बोलण्यात असलेला
गोडवा यावरून आपण कधी
लोकांचे मन ओळखू शकत नाही.
मोराला पाहून कोणाला वाटेल
की… मोर साप पण खातो….!
१६. आयुष्यात दुःख जरी असले
तरीही कोणाच्या समोर
ते व्यक्त करू नका.
तमाशा होऊ देऊ नका.
१७. कलियुग चालू आहे…
म्हणून हा विचार
मनातून काढून टाका
की… विना मतलब कोणी
आपल्याबरोबर नाते ठेवेल.
life changing motivational quotes in Marathi
१८. आपल्याजवळ काहीतरी
काही अशी गोष्ट नक्की सांभाळून
ठेवा की… ती मिळवण्यासाठी
लोक तुमच्या बरोबर जोडलेले
राहतील. स्वतःला रिकामे होऊ
देऊ नका. कारण लोक रिकाम्या
वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात
फेकून देतात.
१९. जर तुम्ही कोणासोबत चांगले
करत असाल… तर त्याचा
कायम उल्लेख करू नका.
असे केल्याने तुमच्या
चांगुलपणाला अर्थ राहत नाही.
२०. संघर्ष आपल्याला जरुर
थकवतो. परंतु आपल्याला
सुंदर आणि मनातून मजबूत
ही संघर्षच बनवतो…!
२१. सूर्य हळूहळू उगवतो
आणि जगाला प्रकाशित
करतो. तसेच जो व्यक्ती
संयमाने… व धीराने…
पुढे जातो… तो एक
दिवस नक्कीच आपले
नशीब बदलतो.
२२. दुसऱ्यांच्या चुकांमधून
शिका. कारण प्रत्येक
गोष्ट स्वतःच्या चुकांमधून
शिकण्याचा वेळ
आपल्याकडे नसतो.
२३. खोटारडा व्यक्ती
मोठा आवाज करून
खऱ्या व्यक्तीला शांत
करतो. परंतु खऱ्या
व्यक्तीचे मन खोट्या
व्यक्तीच्या आवाजापेक्षा
जास्त प्रभावी असते.
२४. वेळे पेक्षा जास्त आपला
आणि परका कोणीच नसतो.
कारण जेव्हा वेळ आपला
असतो तेव्हा सर्वच आपले
असतात. आणि जेव्हा आपला
वेळ परका असतो…. तेव्हा
सगळेच परके असतात.
२५. आपल्या आयुष्यात अडचणी
उगाचच येत नाही. त्यांचे येणे
आपल्या आयुष्यात एक इशारा
असतो की… आपल्या जीवनात
आपल्याला काहीतरी बदल
करणे गरजेचे आहे.
२६. एक क्षण एक दिवस
बदलू शकतो. एक दिवस
एक जीवन बदलू शकतो
आणि एक जीवन या पूर्ण
जगाला बदलवू शकतो.
२७. राज महालामध्ये तर
कौरव राहत होते…
वनवास तर पांडवांनी
भोगला होता…!
२८. राजपाट तर
कंसाजवळ होता….
श्रीकृष्णांनी जन्म तर
तुरुंगात घेतला होता.
२९. सोन्याची लंका….
पुष्पक विमान…. हे
तर रावणा जवळ होते….
श्रीराम यांनी तर वनवासच
बघितला होता ना….!
३०. सत्या बरोबर प्रत्येक
वेळी संघर्ष असतोच.
देवाला सुद्धा संघर्ष
करावा लागला आहे…
आपण तर एक मनुष्य
आहोत.
३१. यश मिळवायचे असेल
तर नाशिबापेक्षा मेहनतीवर
विश्वास ठेवा.
३२. सत्य कायम पाण्यात
पडलेल्या एक थेंब तेला
सारखे असते. कितीही
असत्याचे पानी त्यावर
टाकले तरीही ते पाण्याच्या
वरच तरंगत राहते.
३३. जेव्हा लोक अशिक्षित
होते… तेव्हा परिवार एकत्र
होते. परंतु आज तुटलेल्या
परिवारांमध्ये जास्त करून
शिकले सवरलेले…. लोकच
जास्त दिसतात.
३४. शब्दांनाही चव असते.
दुसऱ्यांना त्याची चव
चाखवण्याआधी स्वतः
त्याची चव घेऊन पाहिली
पाहिजे.
३५. जसे सुख कायम
नसते…. तसेच दुःखही
कायम नसते. त्यामुळे
वाईट वेळात कायम
संयम ठेवा.
३६. जेव्हा लोक तुम्हाला एखादा
निर्णय घेण्यापासून मागे
खेचत असतील…. तेव्हा
स्वतःच्या मनाला सांगा की
मी गर्दी पेक्षा वेगळा विचार
करत आहे…..!
३७. कधीही कोणा गरिबाला
कमी लेखू नका. कारण
कोणाची वेळ बदलायला
वेळ लागत नाही….!
३८. जीवनात शांती पाहिजे…..
असेल… तर दुसऱ्यांच्या
तक्रारी करण्यापेक्षा सोपे
आहे की… स्वतःला बदला
कारण काटे टोचू नये म्हणून
संपूर्ण जगभर चटई
अंथरण्यापेक्षा चप्पल घालून
चालणे सोपे आहे.
३९. काही गोष्टी करण्याचे खोटे
नाटक करून आपण
दुसऱ्यांना नाही… तर
स्वतःला फसवत असतो.
कारण आपल्या अंतर्मनाला
खरी गोष्ट माहिती असते.
त्यामुळे स्वतःच्या मनाशी
इमानदार रहा. आणि योग्य
दिशेने काम करा.
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
४०. एका स्त्रीला कधी कमी समजू
नका. कारण स्त्री एक अशी
व्यक्ती आहे… की तिने जर साथ
दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा
बनवते. आणि जर बदला घ्यायचा
म्हटले तर राजमहालाला सुद्धा
एक झोपडी बनवेल.
४१. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता
एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते.
एका प्रमाणाबाहेर जर ती खेचले…
तर धागा तुटणे निश्चित आहे
४२. डोळे तुम्हालाच उघडावे
लागतात प्रकाश
पाहण्यासाठी….! फक्त
सूर्य चमकल्याने उजेड
होत नाही.
४३. सफल होण्यासाठी चांगल्या
मित्रांची गरज असते. परंतु…
खूप जास्त सफल होण्यासाठी
चांगल्या शत्रूंची गरज असते
४४. माणसाची एक चूक :-
दुसऱ्याचे 50% ऐकतो….
25% समजतो……
०% टक्के विचार करतो…..
200% प्रतिक्रिया देतो.
४५. तुमच्या दुःखांचे समाधान
तुम्हालाच शोधावे लागेल.
कारण आजच्या जगात
कोणाच्या दुसऱ्याच्या
दुःखांना ऐकणारे आणि
समजणारे व्यक्ती खूप
दुर्लभ आहेत.
४६. पैसा कमावणे
का जरुरी आहे….?
१) विना खाता झोपले तर
कळेल की पैसा कमावणे
का जरुरी आहे…..?२) बहिणीच्या लग्नात वडिलांना
रडतांना पाहिले… तर कळेल
पैसा कमावणे का जरुरी आहे…!३) वडिलांना सुट्टीच्या दिवशी
काम करतांना पाहिले… तर
कडेल पैसा का जरुरी आहे…!
जर ही पोस्ट वाचून
तुमच्या आयुष्यात….
१% जरी मदत झाली
तर व्हिडिओला अवश्य
लाइक करा.
या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत करतील |
मनाला फ्रेश करणारे सुंदर सुविचार |
Good Thoughts In Marathi
आयुष्य कसे जगायचे
आयुष्य कसे जगायचे….
टेन्शन घ्यायचेच नाही
कोणासाठी काहीही करा
काहीही उपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे.
कोणाचे वाईट करायचे नाही
कोणाचे वाईट चिंतायचे नाही
कुणाच्या मागे वाईट बोलायचे
नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक
जगायचे.
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
काही कमी पडत नाही. आणि
फरक तर अजिबात पडत नाही.
कुणासाठी वाईट वाटून घ्यायचे
नाही.
लोकांची विविध रूपे असतात
सकाळी गोड बोलतात आणि
रात्री कुणी काही डोक्यात भरवले
की तोंड पाडून बसतात. किंवा
कुठल्या तरी लहान कारणासाठी
नाराज होऊन बसतात. ज्याच्याशी
तुमचा काहीही संबंध पण नसतो.
आजकाल लोक देवावर पण
नाराज होतात. तर तुम्ही कोण.
कुणी कितीही वाईट बोलो
किंवा वाईट करण्याचा प्रयत्न
करो….. कुणाच्या आयुष्यात
डोकवायचे नाही आणि
कुणाविषयी मागे वाईट चर्चा
करायची नाही. स्वतः बरोबर
दुसऱ्याचा पण चांगलाच विचार
करायचा. कुणाच्या पुढेपुढे
करायचे नाही.
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत
जगायची. थंड पाणी आणि
गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या
सुरकुत्या घालवतात तसेच शांत
डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
नेहमी हसत रहा
हा सुंदर जन्म पुन्हा नाही
आयुष्य कसे जगायचे | सुंदर सुविचार | Good Thoughts In Marathi |
Motivational speech in marathi by vb
हे विचार तुमच्या अस्थिर मनाला
शांतता आणि आनंद देतील
प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू
नका. आणि मनातील प्रत्येक गोष्ट
लोकांना सांगू नका. कारण लोक
हातामध्ये मलम नाही… तर मीठ
घेऊन फिरतात. म्हणून प्रत्येक
जखम लोकांना दाखवू नका.
लोकांना हे तर समजते की हा कसा
आहे… तो कसा आहे… पण लोक हे
विसरून जातात ते स्वतः कसे आहेत.
जो माणूस रडता रडता रागामध्ये
सगळे बोलून टाकतो… तो खरा
असतो. आणि त्याचे बोलणे ही
खरे असते. कारण राग आणि
रडणे माणसाला खरे बोलायला
भाग पाडतात.
तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त
कदर कराल. तो माणूस तुम्हाला
सगळ्यात जास्त रडवेल. म्हणून
कोणाच्याही जास्त जवळ जाऊ
नका.
नाते नवे असतांना लोक मस्करीत
सुद्धा मन तोडत नाहीत. आणि
जेव्हा मन भरते तेव्हा माणसाच्या
रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला
कोणीही येत नाही…!
तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला
तरीही नंतर लक्षात येईल की….
एकटे राहिलेले चांगले असते.
माणूस मेला की सगळ्यांना
चांगला वाटतो. उगाच नाही
त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी
जमते.
ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही
गोष्टीचा फरक पडणे बंद होईल
त्या दिवशी तुमच्या वागण्याचा
सगळ्यांनाच फरक पडेल….!
इतके समजदार बना की कोणाच्याही
चुकीला लगेच माफ करा. पण इतके
मूर्ख बनू नका… की एकदा धोका
देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल.
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू
नका .कारण नाती तर खूप मिळतील
पण चांगले लोक आयुष्यात परत
कधीही येत नाहीत.
ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता
त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून
पहा. बोलणे तर सोडाच ते तुमची
साधी आठवण सुद्धा काढणार नाहीत.
आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत
पण गप्प यासाठी बसायचे आहे… की
आयुष्याने जे आपल्याला दिलेले आहे
ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते…
आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश
तेच लोक राहतात ज्यांनी एकटे
राहण्याची कला शिकली आहे.
ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या
भावनांचा आदरच केला जात नाही
अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत
नेण्याची काहीच गरज नसते.
काही लोक तुमच्याबरोबर असतांना
तुमचेच असल्यासारखे दाखवतात….
आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध
असतात. तुमच्या विरुद्ध कारवाया
करत असतात.
माणूस सर्व काही विसरू शकतो
फक्त ती वेळ नाही जेंव्हा….
त्याला आपल्यांच्या साथीची गरज
होती. पण त्यांनी साथ दिली नाही…
अर्जुनाने कर्णाचे काहीही
नुकसान केले नव्हते.
तरीही तो शत्रू बनला.
कधी कधी तुमचा दोष
नसला तरी तुमच्या
प्रतिष्ठेमुळे… प्रतिभेमुळे….
आणि सत्य बोलण्याने
लोक तुमचे शत्रू
बनतात.
गरज पडली की त्यांना
तुमची आठवण येणार..
आणि गरज संपली की
त्यांना तुमची अडचण
होणार…. अश्या फालतू
लोकांना आपल्या पासून
लांबच ठेवलेले बरे….
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
वयाचे दाखले द्यायला
आपण पावसाळे मोजतो.
पण खरे सांगा…. आपण
त्या पावसाळ्यात कितीसे
भिजतो…..?
जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे
कोणीतरी आला असेल… तर तुम्ही
दोन पावले मागे सरकणे कधीही
चांगले असते. कोणाच्याही जवळ
जबरदस्तीने जावू नका. आणि
कोणाला जबरदस्तीने
आपल्याजवळ ठेवून घेऊ नका.
ज्या माणसावर आपण सर्वात जास्त
प्रेम करतो… तोच माणूस आपल्याला
धोका देतो. कारण त्याला माहिती
असते की आपली कमजोरी काय
आहे.
लोक त्यांच्या जागी बरोबर असतात
फक्त आपणच त्यांना खूप जास्त
चांगले आणि आपले मानत असतो.
आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे
जगा. लोकांच्य. सांगण्यानुसार
वागाल तर तुम्ही न लोकांचे
राहाल…. न स्वतःचे राहाल.
अशा माणसांच्या आजारावर
काहीही औषध नाही…. जो
दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो.
प्रत्येकाला वेळ देणे ही
वेळेची बेइज्जती आहे.
ज्यांचे मन मोठे आणि खरे असते
त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा
तेवढ्याच मोठ्या मिळतात.
घमेंड आणि गरवा मध्ये राहू नका
हवेतून जमिनीवर यायला वेळ
लागत नाही.
हक्क फक्त तिथेच दाखवा
जिथे तुम्हाला कोणी हक्क
दिलेला आहे.
कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा
पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही
कोणाचा वापर करून घेऊ नका.
आजच्या जगामध्ये खरी गोष्ट हीच
आहे की तुम्ही पैसे कमवा. लोक
स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाते
बनवतील. आणि जर तुमच्याजवळ
पैसे नसतील तर सगळे तुम्हाला
सोडून जातील….!
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
एकटे जगण्याची सवय
होऊन जाते… जेव्हा
आपल्याला साथ देणारी
माणसे बदलतात…..!
खूप मजबूत असतात अशी
माणसे… ज्यांच्याजवळ
गमावण्यासारखे काहीही
नसते.
तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा
आणि म्हणा मी ठीक आहे. कारण इथे
कोणालाही तुमची कदर नाही. आणि
कोणाच्याही दुःखाविषयी कोणालाच
सहानुभूती सुद्धा नाही.
आयुष्यात बदलायला कोणालाही
आवडत नाही. परंतु माणसे
वागतातच असे की आपल्याला
बदलायला भाग पाडतात.
नाते जर मनापासून जोडलेले
असेल… तर कोणीही तोडले
तरी ते तुटत नाही. पण नाते
जर फक्त स्वार्थासाठी डोक्याने
जोडलेले असेल तर कोणी कितीही
प्रयत्न केले तरी ते टिकत नाही.
काही लोक मेणबत्ती सारखे पघळून
नाते निभावतात आणि काही लोक
त्याच नात्यांना आग लावतात.
जग स्वार्थावर चालते आणि
म्हणूनच थंडीमध्ये ज्या
सूर्याची वाट पाहिली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा
तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत आणि महत्त्व
तेव्हाच असते जेव्हा तुमची
गरज असते….!
जे नेहमी तुमच्या पासून दूर
जाण्याची कारणे शोधतात
त्यांना थांबवू नका त्यांना
दरवाज्यापर्यंत सोडून या.
बोलण्याच्या पद्धतीवरून
समजते नात्यांमध्ये किती
विश्वास आणि आपलेपणा
आहे ते…!
मैत्री पण गरजेची आहे.
नाते पण गरजेचे आहे
पण आयुष्यातील अडचणी
आणि वाईट वेळ आपल्याला
हे शिकवते की एकटे राहण्याची
कला येणे पण गरजेचे आहे.
जर समोरचा माणूस समजून
घेतच नसेल… तर त्याल
समजावण्याची गरजच काय…?
आणि कोणी मान्य करतच
नसेल तर त्याला एखादी गोष्ट
सांगायची गरजच काय….?
Best Motivational Quotes In Marathi – सुंदर सुविचार
जेव्हा खूप काही असते
सांगण्यासाठी तेव्हा माणूस
शांत होऊन जातो.
धर्म कोणताही असो तुम्ही
फक्त चांगला माणूस बना.
हिशोब तुमच्या कर्माचा होतो
धर्माचा होत नाही.
आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट
हीच आहे की तुम्ही पैसे कमवा
लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर
नाती बनवतील.
हे विचार तुमच्या अस्थिर मनाला शांतता
आणि आनंद देतील | Good Thoughts In
Marathi | Sunder Vichar Marathi
Your Quaries :-
Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job
thank you very much