टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे सुंदर
अनमोल सुविचार | suvichar |
most motivational suvichar
नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ दिवस
टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे – motivational suvichar
मित्रांनो सुविचार म्हणजे संस्काराची शिदोरी असते.
आणि ती शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरत पुरणारी असते.
सुविचार म्हणजे आयुष्याला
दिशा देणारे संस्कार असतात.
मित्रांनो आजही तुमच्यासाठी
असेच सुंदर…. मार्गदर्शक….
दिशादर्शक…. सुविचार घेऊन
आलो आहे.
मित्रांनो ते आपल्याला
निश्चितच आवडतील
एक विनंती हा यूट्यूब चैनल
आपण सबस्क्राईब करा.
टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे
– motivational suvichar
माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती
म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण…. धन
आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट
मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार
माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित
करीत असतात.
माणसाने कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे
आपल्या पाठीचे कातडे घट्ट करून
दणकेही खावेत परंतु योग्य वेळ येताच
सापाप्रमाणे फणा काढावा.
कोणाच्याही मागे जास्त धावू नका
तुमची किंमत कमी होईल. कारण
आपण ज्याला जास्त महत्त्व देतो
त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य
असते.
आपण सारेच जण एखाद्या व्यक्तीविषयी
सांगितलेल्या सांगी वांगी गोष्टीवर विश्वास
ठेवून त्या व्यक्ती विषयी आपले मन घट्ट
करीत असतो. त्या व्यक्तीविषयी चुकीची
इमेज मनामध्ये रुजवल्यामुळे त्या व्यक्तीचा
तिरस्कार… घृणा… आपण सतत करीत राहतो.
यापेक्षा त्या व्यक्तीला आपण स्वतः पारखले…
निरखले… त्या व्यक्तीशी सलोख्याचे संबंध ठेवून
पाहिले आणि आपले स्वतःचेच असे स्वातंत्र्य मत
तयार केले तर…
जगात दोन अशी रोप आहेत जी कधी
कोमेजत नाही. आणि कोमेजली तर
त्याचा काही इलाज नाही…..!
पहिले निस्वार्थ प्रेम आणि दुसरे अतूट विश्वास.
समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे
लागतात. कारण जंगलात लहान – मोठी
वाकडी – तिकडी अशी अनेक प्रकारची
झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे
कोणीच तोडत नाही पण जी सरळ
वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे
घाव सोसावे लागतात.
motivational quotes in marathi
आयुष्यात दोन व्यक्ती पासून लांब राहावे
एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ कारण….
व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार
आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलबानुसार
आठवण काढणार
ताकात लोणी असेल तर चालेल
पण लोण्यात ताक नसावे.
कोळशात हिरा असेल तर चालेल
पण हिऱ्यात कोळसा नसावा.
पाण्यात बोट असेल तर चालेल
पण बोटीत पाणी नसावे. त्याचप्रमाणे
राजकारणात मैत्री असेल तर चालेल
पण मैत्रीत राजकारण नसावे.
टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे
– motivational suvichar
मैत्री करायची तर अशी करायची
की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो
या ना बोलो पण त्या व्यक्तीने कधी
मैत्री हा शब्द जरी ऐकला….
की आपली आठवण आली पाहिजे.
मला वेळच मिळाला नाही हो नाहीतर
मी तुम्हाला नक्कीच भेटलो असतो.
मला वेळच मिळाला नाही नाहीतर तुमचे
नक्की काम केले असते. या सगळ्या
लंगड्या सवयी असतात. समोरील माणूस
आपला असेल तर त्याच्यासाठी वेळ हा असतोच.
जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत जीवन चांगले
जोवर शरीर साथ देत आहे तोपर्यंत जगून घ्या
भरभरून जगा जीवनाचा भरभरून आनंद घ्या
का माहित शरीर केव्हा साथ सोडेल मग लक्षात
येऊन काय उपयोग जगायचे तर राहूनच गेले…
म्हणून जगा…..
खोटी व्यक्ती कितीही गोड बोलली
तरीही एक दिवस ती तुमच्यासाठी
बिमारी बनणार हे मात्र नक्की. परंतु
खरी व्यक्ती कितीही कडू वाटली….
तरी एक दिवस ती तुमच्यासाठी
औषधी बनून तुमच्या कामाला येणार
ही गोष्ट मात्र नक्की.
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी
विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी
आनंदाने आणि उत्साहाने भरलेले असते आणि
अशा उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती
होत असते म्हणून सकारात्मक आशावादी आनंदी
विचार हेच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.
motivational quotes in marathi
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीही
स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नका. आणि
कोणापेक्षा श्रेष्ठही समजू नका. कारण स्वतःला
कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि
श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
सर्वकाही जिंकता येतो संस्काराने
आणि जिंकलेली सर्व हारू शकतो
अहंकाराने……!
स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला
जीवनात कधीच खाली बघावे लागत नाही
आपली माणसे तुटतील म्हणून मुद्दाम
भांडण टाळणारी माणसे घाबरट नसतात
तर समजूतदार असतात.
जोडलेल्या दोन हातामध्ये
सोडलेल्या हातांपेक्षा जास्त
सामर्थ्य असते.
डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात
परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि
तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून
वेगळे करतो. या छोट्याशा आयुष्यातून
एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा
अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले
कधीही चांगले.
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा
देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते
ते दिशाहीन करण्यासाठी…. किती कष्ट घ्यावे
लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी…. क्षणभर
गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी….!
motivational quotes in marathi
जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील
भावना समजतो तो मन जिंकून कायम
हृदयात राहतो.
टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे
– motivational suvichar
कुठला पण माणूस असेच नाही बदलत
काही घटना अशा घडतात की त्याला
संपूर्ण बदलून टाकतात.
गुंठा गुंठा करून काहीच होत नाही
जाताना सोबत कोणी काहीच नेत नाही
कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही
मेल्यावर तरी माणसाची संपत्ती कधी कामी
येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे
तुम्ही तर राहणार नाही. मेल्यावर सातबारावर
नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा
जास्त काहीच मिळत नाही. ज्यांच्याकडे खूप आहे
त्यांना अन्न सुद्धा गिळत नाही. तरी सांगतो माणसा
जपुन रहा कारण जन्म पुन्हा मिळत नाही.
माणसे कमावण्याची जबरदस्त नशा असते
वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्यापैकी
अनेकांना ती असते. माणसे जोडणे ही छान
गोष्ट आहे. अनेकांसाठी ती अभिमानाची बाब
असते जरूर असावी.
चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या
जोरावर अनेक माणसे जोडावीत… जपावीत….
पण हे करताना ही जपलेली माणसे आपल्यालाही
जपत आहेत ना हे बघणे फार महत्त्वाचे असते.
motivational quotes in marathi
अनेकदा आपल्याला वाटून जाते बापरे की अमुक
इतकी भारी व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून
आहे. म्हणजे किती छान. त्या संपर्का मागे विशुद्ध
भाव आहे ना… का पुढे जाऊन आपला स्टेफनी
म्हणून उपयोग केला जाणार आहे हे पाहायला हवे.
अशा अनेक अनुभवातून आपण जात असतो
त्यामुळे हुरहुडून जाणे टाळायला हवे. तुम्हाला
माणसे जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा
असतो. पण त्याला तुमचा भावनिक कमकुवतपणा
समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या
चांगुलपणाचे इतकेही प्रदर्शन करू नये…..
की तो संस्यास्पद वाटू लागेल.
अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत
जवळची… जिवलग… वाटत असते. आपली
सुख दुःख आपण तिला सांगत असतो. पण
आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपले मन…
स्वास्थ्य…. उध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून
देखील करू शकते.
motivational suvichar
माणसाने इतकेही पोटाशी धरू नये
की ते पुढे आपल्यावर लाळाने आपला
उपयोग करून घेतील. माणसे जोडताना
कुणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ
द्यावे हे ठरवून घ्यायला हवा.
लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला
फार जवळ केल्याचा आतोनात त्रास
आयुष्यभर भोगावा लागू शकतो.
लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले
अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांच्या खांदा
जवळ करता हे त्यांना इंटरटेनिंग वाटू शकते.
दुःखावर बांधावीत अशी माणसे फार विरळ
असतात. मन मोठे करून समोरच्याला मदत
करणे… त्याचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न
करणारी भली माणसे जगात आहेत….
नक्कीच आहेत…..
पण भसाभस माणसे जमवण्याच्या नादात
दाड्या पेक्षा बनग्याच जास्त गोळा होतात.
त्यातली आयुष्यभर एखादी कोसळासारखी
टोचत राहते… असह्य वेदना देते…
भारावून जाणे ही एक फारच भाबडी गोष्ट आहे
कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टींना भारावून
जाणारी माणसे आपल्यात असतात. फार जवळ
जाऊन बघितले की समोरच्या माणसाचे पाय ही
मातीत हवे हे लक्षात येते आणि आतोनात निराशा
वाट्याला येते.
माणसातले चांगले विचार त्याचे जरूर
कौतुक करावे जमल्यास आचरणातही
आणावेत.
टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंदित करणारे
– motivational suvichar
काही माणसे समोरून फार छान वाटतात
आदर्श वाटतात. आपण त्यांना आपले मानत
राहतो…. फॉलो करत राहतो…. आणि एका
विवक्षित क्षणी कळते की काही घेणे देने
नसताना ही माणसे आपल्या सोबत किती
खोटे कृतज्ञ वागत होती. मागे डावपेच करत
होती. मग जीव दुखी होतो. त्या नात्याची विषारी
येऊ लागते…..!
त्यावर पर्याय काय….?
माणसांच्या फार जवळ न जाणे
लांबून जे दिसते त्यात आनंद मानावा
माणूस आपल्यासमोर जी वागतात….
बोलतात….. त्यांना तेवढेच खरे म्हणून
पुढे निघावे….
फार खोलात जाऊन गोष्टी
जाणून घेण्याच्या हट्ट करू नये.
अपेक्षाभंग वाट्याला येतो.
माणसे कमावणे म्हणजे त्यांना
आपल्या आयुष्यात हस्तक्षेप
करण्याच्या अधिकार नव्हे.
काही व्यक्ती आपलेपणाच्या हक्काने
काही गोष्टी सांगत असतात, त्या नम्रपणे
ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. चार कटू
गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे
आपले भलेच होणार आहे हे आपण
जाणून असावे.
अर्थात आपले खरोखरच भले व्हावे म्हणून
स्वतःच वेळ देऊन आपण आपले कान
पकडणार कोण आणि आपले भले पाहून
पोटदुखी होणार कोण यातला फरक
आपल्याला ओळखता यायला हवा.
मित्रांनो माणसे जरूर जोडावी… जपावी….
एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल
इतके अधिकार कोणाला देऊ नये.
जगायला माणसे लागतातच पण आतल्या
वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि
बाहेरच्या वर्तुळात कोणती माणसे ठेवायची
याचे गणित एकदा जमायला लागले की
सोपे असते जगणे…..!
मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार |
मराठी सुविचार | lattest Marathi suvichar |
happy thoughts
नेहमी छोट्या छोट्या चुका
सुधारण्याचा प्रयत्न करा.
कारण मनुष्याला ठेच डोंगराने
नाही तर छोट्या दगडाने लागते.
मनापासून जीव लावला की रानातले
पाखरू सुद्धा आवडीने जवळ येते
आपण तर माणसे आहोत. त्यामुळे
आयुष्य हे एकदाच आहे. मी पणा
सोडा आणि सर्वांशी प्रेमाने राहा.
आयुष्यात ताकदीची गरज त्यांनाच
लागते ज्यांना काही वाईट करायचे
असते. नाहीतर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेम पुरेसे असते
कारण प्रेमाने जग जिंकता येते.
पद…. प्रतिष्ठा…. आणि धनासी जोडलेली
माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात राहतील
पण जी माणसे तुमची वाणी… विचार…
आणि आचरणाशी जोडलेली असतील
ती सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील.
चूक झाली की साथ सोडणारे बरेच
असतात. पण चूक का झाली आणि
ती कशी सुधारायची हे सांगणारे
फार कमी असतात.
मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार |
मराठी सुविचार | lattest Marathi suvichar |
happy thoughts
अडचणीच्या काळात सल्ला मागितला
तर नुसता सल्ला देऊ नका, साथ द्या
कारण सल्ला चुकीचा असू शकतो…
साथ नाही.
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी
ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ
आपला विषय जरी निघाला तर त्याच्या
ओठावर थोडेसे हसू आणि डोळ्यात
थोडे पाणी नक्की आले पाहिजे.
आयुष्यात अपमान…. अपयश…. आणि
पराभव हेही गरजेचे आहे. कारण
यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान.
त्यातून जागी होते जिद्द…. आणि मग उभा
राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस.
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला
दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न
पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा
पाठलाग करा. पर्याय आपणच
निवडायचा असतो.
स्वार्थ…. मोह…. हा वाईट असतो
ज्या क्षणी मोहाने मन ग्रासते…
त्या क्षणीच मानव प्रगती कडून
अधोगतीकडे प्रवास करू लागतो.
त्यामुळे प्रामाणिक राहा.
माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो
तितक्याच सहजतेने प्रेमही व्यक्त करू
शकला असता तर जगायला खरंच किती मज्जा
आली असती. कारण माणसाच्या निम्म्या समस्या
ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त
न केलेल्या प्रेमामुळेच वाढतात.
पक्षी जिवंत आहे तोपर्यंत मुंग्या खातो.
जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा मुंग्या
पक्षांना खातात. वेळ आणि परिस्थिती
कोणत्याही वेळी बदलू शकते. जीवनात
कोणाचीही किंमत कमी करू नका.
दुखवू नका.
मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार |
मराठी सुविचार | lattest Marathi suvichar |
happy thoughts
पारिजातकाचे आयुष्य लाभले तर
लय लूट करावी ती सुगंधाची.
आनंद नेहमी चंदनासारखा असतो
दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी
आपली बोटे सुगंधित करून जातो.
साप घरावर दिसला की लोक त्याला
दांडक्याने मारतात. पण तो साप
शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध
पाजतात. नमस्कार करतात. लोक
सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या
स्थानावर आहात त्याचा करतात.
माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर
असणे महत्त्वाचे नसते. तर महत्त्वाचे
असते ते सुंदर आणि तितकेच निरागस
मन आणि त्यावर निर्मळ हास्य असेल
तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी
दिसूच शकत नाही.
धनवान होण्यासाठी एक एक चांगल्या
कणांचा संग्रह करावा लागतो. आणि
गुणवान होण्यासाठी एक एक क्षणांचा
सदुपयोग करावा लागतो. ह्या जीवनाचा
पैसा भविष्यात असेल असे नाही.
या जन्माचे पुण्य जन्मोजन्मी कामी येते.
गेलेल्या क्षणासाठी झुरत
बसण्यापेक्षा समोर असलेले
आयुष्य भरभरून आनंदाने जगा.
माणूस गर्दीत हरवत नसतो
तर तो एकटा असला की
हरवतो….!
मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार |
मराठी सुविचार | lattest Marathi suvichar |
happy thoughts
मला शून्य व्हायला आवडेल
जरी माझी किंमत नसेल
तरी ज्याच्या सोबत जोडलो
जाईन त्याची किंमत नक्कीच
वाढवेल.
चंदनापेक्षा वंदन जास्त शितल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे
अधिक चांगले आहे. प्रभाव चांगला
असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे
महत्त्वाचे आहे.
जीवन हे हार्मोनियम सारखे असते
सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या दुःखाच्या
पट्ट्या काळ्या पण गंमत म्हणजे
दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय
सुरेल जीवन संगीत निर्माणच
होत नाही.
या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी
सर्वात चांगले हत्यार धैर्य
सर्वात चांगली सुरक्षा विश्वास
सर्वात चांगले औषध हसू…
आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व
विनामूल्य आहे.
माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात… एक वाचलेली
पुस्तके दोन भेटलेली माणसे
आई वडील वयाने नव्हे…
तर काळजीने म्हातारी होतात
हे कटू सत्य आहे. जेव्हा बाळ
रडते तेव्हा संपूर्ण बिल्डिंगला
समजते… पण आई-वडील रडतात….
तेव्हा शेजाऱ्यालाही पत्ता लागत नाही
ही जीवनातील सत्यता आहे.
motivational suvichar
पैशाच्या कमतरतेमुळे
स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत
स्वप्न अपुरी राहतात….
अपुऱ्या इच्छा शक्तीमुळे.
Also Read :-
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार
Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes