Best 5 Motivational Thoughts | आपला “Attitude” असा ठेवा…

0
262
Best Motivational Thought - आपला Attitude असा ठेवा
Best Motivational Thought - आपला Attitude असा ठेवा

Best 5 Motivational Thought |
आपला “Attitude” असा ठेवा…

आपला Attitude असा ठेवा
लोक तुमच्या मागे धावतील…

जर तुम्हाला कधी काही
बनायचे असेल… तर
एका गरुडा प्रमाणे बना.
पण पोपट कधीच बनू नका.
कारण पोपट नुसता बोलतो
पण तो उंच उडू शकत नाही.
आणि गरुड फार कमी बोलतो.
पण खूप उंच उडतो आणि
गरूड हा इतर पक्षांचा “राजा”
सुद्धा आहे.

Best 5 Motivational Thoughts |
आपला “Attitude” असा ठेवा…

तर आज मी तुम्हाला अशा पाच
गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक
व्यक्तीने ह्या गरुडाकडून
शिकल्या पाहिजेत.

१. गरुड एकटाच उडतो…
गरुड एकटाच उडेल…
परंतु चिमणी किंवा इतर
लहान पक्षानं बरोबर
कधीच उडणार नाही.
गरुड एकतर नेहमी
गरुडांसोबतच उडतो
किंवा एकटाच उडतो.
आणि हेच आपल्याला
आपल्या आजूबाजूच्या
निगेटिव्ह लोकां पासून
दूर राहायला शिकवते.
आणि अशा लोकांपासून
दूररहा. एकटेच राहा.
काही फरक पडत नाही.
कारण हीच ती वेळ असते…
हीच संधी असते स्वतःला
जाणून घेण्याची.

200+ Marathi Quotes Attitude | Attitude Status in Marathi

२. गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट
आणि खूप मजबूत असते.
गरुड आपली शिकार पाच
किलोमीटर अंतरावरून सुद्धा
पाहू शकतो. आणि एकदा का
त्याने आपले ध्येय पाहिल्यावर
ते कितीही कठीण असू देत.
तो आपले ध्येय साध्य करूनच
विश्रांती घेतो यातूनही खूप मोठा
धडा शिकण्यासारखा आहे.
म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचे ध्येय
स्पष्ट ठेवा. आणि ते मिळवणे
कितीही कठीण असले तरी
तुम्ही ते मिळे पर्यंत गरुडाप्रमाणेच
मागे हटू नका.

३. गरुड कधीही मेलेला प्राणी
खात नाही. तो नेहमी जिवंत
प्राण्यांची शिकार करतो आणि
हेच आपल्याला शिकवते की
आपला भूतकाळ मृत झाला
आहे. त्यामुळे त्या कुजलेल्या
विचारांकडे लक्ष देऊ नका.
आपल्या नवीन जीवनावर लक्ष
केंद्रित करा. तुमच्या भूतकाळातील
जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात.
त्यांना जिथे आहे तिथेच त्यांना राहू द्या.
आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची
जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानात
स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा
भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात
आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला
कधीही वर्तमानात राहू देणार नाही.
तुमच्या भूतकाळात तुमच्या सोबत
कितीही वाईट घडले असेल. पण
ते घडून गेलेला आहे त्यामूळे ते
जास्त महत्वाचे नाही. ते सर्व विचार
आठवणी मृत झालेल्या आहेत.

Best 5 Motivational Thoughts | आपला “Attitude” असा ठेवा…

४. जेव्हा वादळ येते तेव्हा गरुड खूप
उत्तेजित होतो. पाऊस पडला की
सगळे पक्षी लपून बसतात. पण गरुड
खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा
वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने
अधिक उंचीवर झेप घेतो. आणि उंच
उडतांना तो इतका उंच उडतो की तो
ढगाच्या वरही पोहोचतो आणि यातून
शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे.
संकटातही मजा शोधायची असते.
नाहीतर छोटी छोटी संकटे मोठी
वाटायला लागतात.

Best 5 Motivational Thoughts |
आपला “Attitude” असा ठेवा…

कारण कोणीतरी म्हटलेच आहे…
की प्रत्येक मोठे आव्हान आपल्या
समोर एक उत्तम संधी आणत असते.
तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची
संधी ओळखली पाहिजे. आणि ज्या
दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल
त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या
हाताखाली असतील आणि तुम्ही त्या
अडचणींवर मात कराल.

५. गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून
मऊ गवत काढून टाकतो.
जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात
आरामात राहू नये. कारण एकदा
जर पिलाला तशीच सवय लागली
तर ते तिथेच राहायला लागेल. आणि
ते आळशी होईल. तर गरुड हा पक्षी
असून देखील त्यालाही हे माहित आहे.
की कम्फर्ट झोन मध्ये कधीच growth
होत नाही… वाढ होत नाही…. पण
आपण माणूस आहोत आणि माणूस
असूनही अनेक लोकांना हे समजत नाही
की तुम्ही जितके कम्फर्ट झोन मध्ये
राहाल… तितकेच तुमचे आयुष्य
भविष्यात अधिक अवघड होईल.

Attitude असा ठेवा… | The Key to Success |
Best  Motivational Lines | Good Thoughts
In Marathi by vb

Motivational Quotes Marathi | 100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

सुंदर विचार मराठी | सुविचार | suvichar marathi

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |
Some marriage customs in Hinduism

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |Some marriage customs in Hinduism
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा

१) लग्नात मांडव कशासाठी…?
माझ्या मुलीचे मनही
मांडवासारखे मोठे आहे.
हे सांगण्यासाठी….!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |Some marriage customs in Hinduism
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती

२) विहिणबाईला आणि नवरदेवाला
स्वागतास पायघड्या कशासाठी….?
माझ्या मुलीला तुम्ही असेच अलगद
सांभाळा. हे सांगण्यासाठी….!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |Some marriage customs in Hinduism
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती

३) नवरदेवाची कानपिळी
वधुच्या भावानेच पिळायची
हे कशासाठी…..?
माझ्या बहिणीला तुमच्या
जीवनात नीट आणि चांगले
वागवा. हे सांगण्यासाठी….!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |Some marriage customs in Hinduism
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती

४) मुलीच्या मागे मामाचं
उभा राहतो. हे कशासाठी…?
मुलीला सांगण्यासाठी की…
मी तुझ्या आईच्या पाठीशी
भक्कम उभा आहे.
हे सांगण्यासाठी…..!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |
Some marriage customs in Hinduism

५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास
घास द्यायचा. हे कशासाठी….?
प्रेमाचे हे प्रतिक आहे.
तुझ्या माझ्यात काही अंतर
राहिलेले नाही… राहणार नाही
व राहू नाही हे सांगण्यासाठी !!!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा - सुंदर माहिती -Some marriage customs in Hinduism
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा – सुंदर माहिती -Some marriage customs in Hinduism

६) लग्नात सप्तपदी कशासाठी….?
तुमच्या सुख-दुःखात
मी आता सोबत आहे.
सात पावलं ही केवळ मर्यादा
आहे. हे सांगण्यासाठी…..!

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा - सुंदर माहिती - तांदळाची अक्षता
हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा – सुंदर माहिती – तांदळाची अक्षता

७) लग्नात तांदळाची अक्षता
उधळण कशासाठी….?
तांदूळाची अक्षता याच्यासाठी
की तांदूळ चे बीज लावतांना
आपण एक जागी लावतो ते
थोडे मोठे झाले की मग त्याची
लावणी वेगळ्या जागी करतो.
तसेच मुलींचे बालपण माहेरी
असते त्या जिथे मोठ्या होतात.
तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे
लागते. तिथेच त्यांचा वंश वाढतो.
याची आठवण रहावी म्हणून
लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात.

हिंदू धर्मात लग्नातील काही प्रथा | सुंदर माहिती |
Some marriage customs in Hinduism

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here