Poem on Wife In Marathi |
बायकोवर मनभावन कविता | bayko kavita
प्रत्येक विवाहित पुरुषाच्या जीवनात
एक बायको नावाचे व्यसन असतेच…!
ह्या व्यसनाला दर दिवशीच
नव्याने थोडे थोडे घ्यायचे असते…!
कधी हे व्यसन साखरे सारखे गोड असते…!
तर कधी कारल्या पेक्षा ही अधिक कडू असते…!
कधी ते सुता सारखे सरळ असते…!
तर कधी वाकड्या पेक्षाही वाकडे असते…!
कधी ते हसते तर कधी खूपच चिडते…!
कधी फुगते तर कधी ते रुसते…!
कधी ते खूपच गोड-गोड बोलणार…!
आणि कधी तर शाब्दिक टोचणीही देणार…!
कधी ते पैशाची खूप उधळण करते,
खूप काही अनावश्यक खरेदीही करते…!
पण… एक – एक पैसा जोडून ते
भिशीचा पहाडही उभा करते…!
ह्या व्यसनाचे आणि वेळेचे काही फारसे जमत नसते
आपणच जमेल तसे आपले निभवायचे असते…!
या व्यसनाला कधीच नाही म्हणायचे नसते
फक्त त्याच्या हो ला आपले हो च म्हणायचे असते…!
हे व्यसन कधी गोड, कडू, आंबट कसेही असले तरी…
यालाच दर दिवशी नव्याने घ्यायचे असते…!
थोड थोड करून काटकसरीने वापरून ते
जीवनभर पुरवायचे असते…!
हे एक बायको नावाचे व्यसन असते…
ह्या व्यसनातून कधी सुटायचे नसते…!
[…] Poem on Wife In Marathi | बायकोवर मनभावन कविता | bayko kavita […]