आई
नमस्कार मित्रांनो,
ही पोस्ट तुमच्या आणि
माझ्या आईला समर्पित.
प्रेम आंधळे असते हे खरे आहे.
कारण माझ्या आईने मला
न बघता प्रेम करणे सुरू केले होते.
जी व्यक्ति आपल्याला संगळ्यांपेक्षा जास्त ओळखते…
ती म्हणजे आपली आई.
आईचे महत्व त्याला विचारा ज्याला आई नाही. आईचे प्रेम
या जगातील कोणत्याही प्रेमाला हरवण्याची ताकत ठेवते.
कारण आपल्या लेकराला आपल्या जीवापेक्षा जास्त फक्त
आईच प्रेम करू शकते.
आई स्वतः उपाशी राहून शुद्धा लेकरू उपाशी राहू नये
याची काळजी घेते.
आपल्या जीवनातील पहिला गुरु आपली आई असते. जन्माला
आल्यापासून प्रत्येक गोष्ट आई आपल्याला शिकवते. अनेक
व्यक्ति आपल्या आयुष्यात येतात पण आपल्या आई ची जागा
कुणीच घेऊ शकत नाही.
Quotes On Mother In Marathi |
आई चे महत्व सांगणारे सुविचार
जर देवाकडे काही मागायचे असेल तर
आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा.
तुम्हाला कधीही स्वतः साठी काहीही
मागण्याची गरज पडणार नाही.
आजची हि पोस्ट त्या सर्व लोकांसाठी जे आपल्या
आईवर प्रेम करतात.
माझ्यासाठी कष्ट करणारी माझी आई
त्या आईवर प्रेम करणारे मी तिचे लेकरू
या विडिओ मध्ये आपण आईचे महत्व सांगणारे
साठ विचार बघणार आहोत. चला तर मग आईचे
प्रेम बघूया.
जगात तुमच्यावर प्रेम करणारी
व्यक्ति शोधत असाल.. तर
तुमच्यावर निस्वार्थपाने प्रेम
करणाऱ्या आईला जवळ करा.
तुम्हाला कधीच कोणाची
गरज पडणार नाही.
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.
आई सुशिक्षित असो किंवा
अशिक्षित असो. जेव्हा तुम्ही
अपयशी होता… तेव्हा तुमचा
खरा मार्ग दर्शक आईच असते.
Mother Suvichar In Marathi

मायेने जवळ घेऊन डोक्यावर
हात फिरवणारी आई ज्याच्या
जवळ नाही, असा श्रीमंतही
असतो भिकारी.
Quotes On Mother In Marathi
आईचे प्रेम जन्मापासून
मरणापर्यंत कधीच बदलत
नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम
वेळेनुसार बदलते.
घर सुटते पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात आई नावाचे पान कधीच मिटत नाही
जन्मभर चालून – चालून जेव्हा पाय थकून जातात
शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात.
आई माझा विचार करणे
कधीच सोडत नाही.
कितीही कामात असली
तरी मला फोन करायला
विसरत नाही.
कितीही चिडलो तिच्यावर
तरी ती माझ्यावर चिडत नाही.
म्हणून तर आई… तुला सोडून
मला कुठेच जावेसे वाटत नाही.
आई मराठी सुविचार
जरी आकाशाचा कागद केला
आणि समुद्राची शाई केली
तरीही आईचे प्रेम शब्दात
लिहता येणार नाही.
एक प्रेयसी सोडून गेली
तर दुसरी मिळेल. पण
एकदा आई सोडून गेली
तर पुन्हा मिळणार नाही
त्यामुळे प्रेयसी ला नाही..
तर आईला गमवायाची
भीती असायल पाहिजे.
ना कोणासाठी झुरायचे
ना कोणासाठी मरायचे
देवाने आई दिली आहे
तिच्यासाठी कायम जगायचे.
तुझ्याजवळ असेल चंद्र… तारे…
सर्व आकाश….. पण मला माझ्या
आईचा मळालेला पदरच आवडतो.
ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो
पण मातीआड गेलेली आई पुन्हा
दिसत नाही.
Aai Marathi Quotes | Aai Quotes Marathi
मृत्यू साठी अनेक पर्याय आहेत
पण जन्म घेण्यासाठी एकच
पर्याय आहे. आणि तो म्हणजे आई…..!
आपल्या नशिबात एकही दुःख नसते
जर आपले नशीब आपल्या आईने
लिहिले असते.
Quotes On Mother In Marathi
आई म्हणजे मंदिराचा कळश
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनातील संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे
असे थंडगार पानी.
जगात प्रत्येकाला सुख पाहिजे
पण मला माझ्या सुखात माझी
आई पाहिजे. कारण ती असेल
तरच आयुष्याला अर्थ आहे.
Aai status in marathi – quotes on mother in marathi
डोक्यावरून एकदा हाथ फिरवला
तर हिंमत मिळते. आई एकदा हसली
तर धरतीवरच स्वर्ग सुख मिळते.
आपले संपूर्ण आयुष्य आईला अर्पण करा
कारण जगात असे एकच प्रेम आहे….
ज्यामध्ये कधीच धोका मिळत नाही.
माझ्या आयुष्यात एकही
वाईट क्षण नसता…. जर
नसीब लिहिण्याचा हक्क
माझ्या आईला असता.
अजूनही माझ्या आईला
मोजता येत नाही.
मी एक पोळी मागतो आणि
ती नेहमी दोन घेऊन येते.
शहरात येवून शिकणारे मुले
आईने तुमच्यासाठी किती
दागिने विकले हे विसरतात.
*******
माझ्या पिल्याने जेवण केले का..?
हे विचारायचे आठवण राहते
पण आई तू जेवली का……?
हे विचारण्यासाठी एक फोन
लावायला विसरतात.
आई वर सुविचार – aai shayari marathi
आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासून दूर जावेसे वाटते.
कुणी ना येथे कुणाचा, सारिच नाती खोटी..
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते.
Quotes On Mother In Marathi
जपून मला तुझ्या पोटाशी
या जगात आणलेस आई…
तूच माझा ईश्वर आणि परमात्मा
कुणीच तुझ्याहूण मोठे नाही.
*******
स्वर्गातही जे सुख मिळणार नाही
ते आईच्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असू दे
आई या शब्दातच समाधान आहे.
जेव्हा मला काही शोधायचे असते
तेव्हा – गूगल
जेव्हा मला कोणाला तरी शोधायचे असते
तेव्हा – फेसबूक आणि
जेव्हा मला घरात काही सापडत नाही
तेव्हा फक्त – आई
प्रेमाच्या गोष्टी लोकांना
कितीही करू द्या… पण
प्रेमाची सुरुवात आजही
आई पासूनच होते.
आई विषयी सुविचार – आई शायरी मराठी
मागच्या जन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पहिले नव्हते तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला
आईचे महत्व सांगणारे सुविचार
ठेच लागता माझ्या पायी
वेदना होती तीच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये
श्रेष्ठ मला माझी आई
जगाच्या बाजारात सर्व काही मिळते
पण आईचे प्रेम कोणत्याच बाजारात
विकत मिळत नाही.
Quotes On Mother In Marathi
घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिल्लापाशी
तुम्ही घराबाहेर गेल्यानंतर
तुमच्या येण्याची प्रत्येक आई
वाट बघत असते.
आई स्टेटस मराठी
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.
देव कोणी पाहिला माहीत नाही
पण आईमध्ये सर्वांनाच देव दिसत
असतो.
पहिला शब्द जो मी उच्चारला तो आई
पहिले घास जीने भरवीला ती म्हणजे आई
बोट पकडून चालायला शिकवले ती माझी आई
मी आजारी असतांना जिने रात्र जागून काढली
ती माझी आई.
आयुष्यात काही नसेल
तरीही चालेल…. पण
आईचा हात मात्र नेहमी
पाठीशी असावा.
आईचे महत्व सांगणारे सुविचार
कोणालाच आता समस्यांचे
उत्तर मिळत नाही…. कदाचित
लोक घरातून आईचा आशीर्वाद
घेऊन निघत नाही.
पहाडा एवढे दुःख
सहन करते जन्मभर
पण लेकरच्या एका दुःखाला
आई सहन करू शकत नाही
Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes
प्रेमाची सावली म्हणजे आई
कष्ट करून लाड पुरवणारी आई
सावलीत मर असे म्हणत
जीव लावणारी आई.
आई स्टेटस मराठी
आईच्या गळ्याभोवती तीच्या
लेकरांनी मारलेली मिठी ही
तिच्यासाठी सर्वात मोठा
दागिना असतो.
आईच्या डोळ्यातील रागाच्या
पाठीमागे वातसल्याचे सागर
उचंबळत असतात.
Quotes On Mother In Marathi
जगात असे
एकच न्यायालय आहे की
जेथे सर्व गुन्हे माफ होतात….
ते म्हणजे आई
आईचे महत्व सांगणारे सुविचार
ज्याला स्त्री आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला.
*******
आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे ईश्वर
माझा आत्मा आणि
ईश्वर माझी आई आहे.
आई स्टेटस मराठी
जेव्हा घरात भाकरीचे
चार तुकडे असतात आणि
खाणारे जेव्हा पांच आसतात
तेव्हा एक जण म्हणते…..
मला भूक नाही ती म्हणजे आई.
मायेचा सागर असते आई
जीवनाला आकार देते आई
******
आई तुझ्या चरणी वैकुंठ
तूच माझा पाडुरंग
आई उच्चारानेच होईल
सगळ्या वेदनांचा अंत
हजार व्यक्ति येतील आयुष्यात
पण…. आपल्या चुकांना क्षमा
करणारे आई वडील पुन्हा
मिळणार नाहीत.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयशी
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्री
आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई
आई स्टेटस मराठी
आई शिवाय जीवनातील
सर्व सुख व्यर्थ आहेत.
******
देवाकडे काही मागतांना
प्रथम आईसाठी आयुष्य मागा
तुमचे आयुष्य आपोआपच वाढेल.
आईचे महत्व सांगणारे सुविचार
संध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती आई आणि
आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते वडील
या जगात एकच सुंदर आणि
गोंडस मूल आहे. आणि ते
प्रत्येक आईजवळ असते.
आई स्टेटस मराठी
खिशातल्या हजार रुपयांची
किंमत सुद्धा लहानपणी
आईने गोळ्या घेण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा
कमीच असते.
मित्रांनो आई विषयी हे विचार तुम्हाला नक्कीच
आवडले असतील. आपल्या आई साठी कॉमेंट मध्ये
एक चांगला शब्द नक्की लिहा.
विडिओ ला लाइक शेयर करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नवीन विडिओ सोबत
आईचे महत्व सांगणारे अप्रतिम मराठी सुविचार | Best Quotes on Mother In Marathi
अशिक्षित आई… नक्की वाचा…! | Sunder Vichar Marathi
[…] […]
[…] […]