Relationship Thoughts In Marathi | नाती टिकवण्यासाठी हे करा

1
767
Relationship Thoughts In Marathi | नाती टिकवण्यासाठी हे करा
Relationship Thoughts In Marathi | नाती टिकवण्यासाठी हे करा

जेव्हा जवळची व्यक्ती
तुम्हाला त्रास देते…
तुमचे मन दुखावते…
तेव्हा फक्त हि एक गोष्ट करा.
परत कधीच त्रास होणार नाही

Relationship Thoughts In Marathi |
नाती टिकवण्यासाठी हे करा | नाती जपा   

नमस्कार मित्रांनो, मी गेले काही दिवस नात्यांवर
Relationship वर काही पोस्ट लिहल्या आहेत.आणि
त्याला तुमच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

कारण की माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी
एक महत्वाचा घटक असेल तर तो आहे आपली नाती. रिलेशनशिप.

मित्रांनो जर तुम्ही ते पोस्ट वाचले नसतील तर मी खाली त्या पोस्ट
ची लिंक देत आहे. या लिंकवर जावून तुम्ही ते वाचू शकता.

मला बरेच प्रश्न या पोस्टच्या माध्यमातून विचारत असता
त्यामधून एक सामान्य असा विचारला जाणारा प्रश्न मी या
आजच्या पोस्ट मध्ये घेत आहे.

म्हणजे ज्या वेळेस आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र
आपले मन दुखावते, आपल्याला त्रास देते तेव्हा काय करायचे…..?

तुम्हाला एकच विनंती आहे, हा लेख शेवटपर्यंत वाचा
नाहीतर तुम्हाला या लेखाचा पूर्ण फायदा घेता येणार नाही.

मित्रांनो ज्यावेळेस आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखावते
त्यावेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात…. एक तर सहन करणे
किंवा बोलून टाकणे. पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याच वेळा गोष्टी
सहन करत असतो…..

Relationship Thoughts In Marathi |
नाती टिकवण्यासाठी हे करा | नाती जपा   

कारण आपल्याला भीती असते, की जर मी समोरच्याला काही बोललो
किंवा बोलले तर आमचे नाते तर तुटणार नाही ना. आमचे संबंध तर
बिघडणार नाही ना, समोरचा माझ्यावर रागावणार तर नाही ना,
त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करीत राहतो. आपल्याला वाटते
समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल आणि तो बदलेल.

एक दिवस तो मला समजून घेईल. चांगले दिवस येतील पण चांगले
दिवस काही येत नाही आणि सारखे सहन करून करून आपण
आपला त्रास वाढवत जातो. आणि परिस्थिती चिरगडत जाते.

मित्रांनो असे का होते याचे कारण म्हणजे ज्या वेळेस आपण गोष्टी
सहन करत जातो, त्यावेळेस समोरच्याला एक संदेश देत असतो
की तुम्ही असेच वागत जा आम्ही सहन करत जाऊ……!

तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा. आम्ही सहन करणे
चालू ठेवतो. पण प्रत्येकाची सहन करायची एक क्षमता असते.

कोणाची थोडी असते कोणाची जास्त असते. पण एक दिवस ही
सहन शक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात.
आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो

समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक
स्थिती बिघडते. आरोग्यावर परिणाम होतो.

म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही
पण मित्रांनो जेव्हा आपण सहन करण्याच्या ऐवजी
समोरच्याला बोलून दाखवतो तेव्हा तुम्हाला
स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते.

समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात आणि
तुमचा एक कामगार रोज उशिरा कामाला येतो.

तेव्हा तुम्ही बोलत नाही सहन करत राहतात
तेव्हा तुम्ही कामगाराला संदेश देत असता की
तुमच्या कंपनीत उशिरा आले की चालते.

आणि मग सहन केल्यामुळे समोरचा कामगार जास्त
उशीर करायला लागतो. आणि वैतागून शेवटी तुम्हाला
त्याला कामावरून काढावे लागते.

पण ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलता कि आपल्या कंपनीमध्ये
सगळे वेळेवर येतात. तू सुद्धा आले पाहिजे तेव्हा कामगाराला
समजते आणि तो वेळेवर यायला सुरुवात करतो आणि तुमचे
नुकसान होत नाही

समजा तुमच्या घरासमोर कुणी कचरा टाकला आणि तुम्ही
सहन करत राहिला तर लोकांना तुम्ही संदेश पाठवता की…..

तुमच्या घरासमोर कचरा टाकलेला चालतो आणि मग लोक
तुमच्या घरासमोर कचरा टाकत जातात आणि तुम्ही सहन
करत असल्यामुळे तुमच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग होतो.

त्यामुळे वेळीच जर तुम्ही बोलून टाकाल तर ही वेळ येणार नाही
म्हणून तुम्हाला तुमचे मन दुखवण्यापूर्वी वाचवायचे असेल
तर गोष्टी सहन करण्यात नसून त्या गोष्टी बोलून टाकण्यात आहे.

पण मी सांगितल्याप्रमाणे आपण गोष्टी सहन करत राहतो. कारण
आपल्याला भीती असते की आपले संबंध बिघडणार तर नाही ना….

सहन करणे हा पर्याय नसून बोलणे हा उपाय आहे. ज्यावेळेस
आपल्याला एखाद्या डॉक्टरचा गुण येत नाही. तेव्हा आपण
डॉक्टरला बोलून दाखवतो की गुण आला नाही आणि डॉक्टर
सुद्धा लगेच त्याची ट्रीटमेंट बदलतो.

पण जर आपण बोललो नाही तर डॉक्टर तीच ट्रीटमेंट चालू
ठेवेल. आपला आजार अजून वाढेल आणि आपला जीव
सुद्धा जाऊ शकतो.

त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात शहाणपणा आहे.
म्हणून मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणाच्या
वागणुकीमुळे… शब्दांमुळे… किंवा अन्य कोणत्याही
गोष्टीमुळे त्रास होत असेल तर…..

आपल्याला सहन नाही करायचे बोलून दाखवायचे आहे.
पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवता त्यासाठी
एक मोठी अट लागू होते.

आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्याच्या आत दडलेल्या
माणसाला सांगायचे असते. ज्याला भावना माहित आहेत.

एखाद्याच्या आतमधला माणूस आपल्याला जागा करायचा
असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रेम आणि
आदर.

तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहे की…
तुमची वागणूक, तुमचे शब्द मला टोचतात त्रास देतात
मला सहन होत नाही…

पण हे सांगताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की हा संदेश
तुम्ही समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगत आहात.
कारण माणूस फक्त प्रेम आणि आदराची भाषा समजतो

Relationship Thoughts In Marathi |
नाती टिकवण्यासाठी हे करा | नाती जपा   

काही अपवाद सोडला तर ज्यावेळेस तुम्ही हा संदेश
प्रेमाने आणि सन्मानाने दुसऱ्याला सांगता तेव्हा
तुम्ही समोरच्या बरोबर जोडल्या जाता.

तुमचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि तो तुमची ऐकेल.
जर तुमच्या सांगण्यात प्रेम आणि सन्मान नसेल
तर परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो

समोरच्याला तुमची किंमत असेल तुमच्याबद्दल प्रेम असेल
आणि जसे तुम्ही नात्यांना महत्त्व देता… तसे समोरचा देत
असेल तर निश्चितच तो तुमची ऐकेल आणि तुम्हाला
त्याचे चांगले परिणाम मिळतील

म्हणजे जे काही सांगायचे ते प्रेमाने आणि आदराने सांगा
आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सांगा
तुम्हाला मी खात्री देतो तुम्हाला होणारा त्रास दुःख निश्चितच
कमी होईल

मित्रांनो हा लेख कसा वाटला
मला कमेंट करून सांगा.

असे आयुष्य बदलणारे लेख पाहिजे असतील तर कृपया
या पोस्ट ला शेअर करा आणि VB Good Thoughts या ब्लॉग
ला नेहमी भेट देत राहा.

धन्यवाद

जवळची व्यक्ती जेव्हा तुम्हाला त्रास देत तेव्हा असे करा |
Relationship Thoughts in marathi | नाती जपा

Motivational Quotes In Marathi

आपल्या मागे कोण काय बोलते
याकडे दुर्लक्ष करायचे असते…
नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे
आहात… आणि ते मागे…..
म्हणूनच ते मागे बोलतात पुढे नाही.

*****************

हिम्मत करा आणि पुढे जात रहा….
कारण टोमणे तर देवाला सुद्धा
सहन करावे लागले होते.
आपण तर साधी माणसे आहोत.

*****************

दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते
तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त रहा.
चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी
माणसाच्याच नशिबी असतात….!

*****************

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात… त्यांचे निकाल
लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

*****************

प्रयत्न करून चुकलात तरी चालेल
पण प्रयत्न सोडू नका. कारण…
हिम्मत…. नाही तर किंमत….. नाही
आणि विरोधक असल्याशिवाय
प्रगती नाही.

*****************

कोणी तुमचा सन्मान करो
अथवा ना करो…. तुम्ही तुमचे
कर्तव्य करत रहा. कारण जग
झोपेत असले तरी सूर्य उगवायचा
थांबत नाही…..!

*****************

क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात
कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट
प्रामाणिक असले की यशालाही
पर्याय नाही.

*****************

कोणत्याही परिस्थितीत माघार
न घेणे…. हाच आपल्या
यशाचा पासवर्ड आहे.

*****************

पैसा नसलेल्या माणसापेक्षाही
ध्येय नसलेला माणूस
हा जास्त गरीब असतो.

Relationship Thoughts In Marathi

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे
हे आपल्या हातात नाही. पण तीच
गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे
प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात.

*****************

दुनिया कशी का वागेना आपल्याशी
आपण छानच वागायचे सगळ्यांशी
इतके छान की विश्वासघात करणारा ही
तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी.

*****************

आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी
कधीही निराश होऊ नका. कारण
सूर्यकिरणे कितीही चटके देत असली
तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.

*****************

Marathi Suvichar |
मन शांत करणारे प्रेरणादायी मराठी सुविचार |
सुंदर सुविचार | Good Thoughts marathi

नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship

Good Thoughts In Marathi | Suvichar | नाती | सुंदर विचार

तुम्ही जिंकल्यानंतर सगळे जग
तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते.
पण तुम्ही हरल्यानंतर जे तुम्हाला
जवळ घेतात तीच तुमची आपली
माणसे असतात.

——–******——–

एकदा वेळ निघून गेली की
सर्व काही बिघडून जाते असे
म्हणतात. पण कधी कधी सर्व
काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा
काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

——–******——–

मनातल्या भावना….
शंका – कुशंका मनातच
गोठून राहिल्या की
नात्यांमध्ये दरी निर्माण होते.

——–******——–

वर्तमानातूनच सुख वेचण्याच्या
प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त
आहे. ते फक्त आश्वासन देते
खात्री नाही.

——–******——–

जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून
इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता
तेव्हा ते जळवणे राहते बाजूला….
खरेतर तुम्ही त्यांच्या मनातून
उतरण्याचा प्रयत्न करत असता

——–******——–

तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर
जगायला सुरुवात करा. तुम्हाला
तुमच्या स्वतःशिवाय कोणीही
चांगला सोबती….. आधार…. आणि
समजून घेणारे….. मिळणार नाही.

——–******——–

तुम्ही वर्ष बदलतांना पाहत
आहात. मी वर्षभरात माणसांना
बदलतांना पाहिले आहे…..

——–******——–

आवश्यकतेपेक्षा जास्त मिळते
त्याला म्हणतात नशीब.सर्व काही
असूनही रडवते त्याला म्हणतात
दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही
आनंद देते. त्याला म्हणतात आयुष्य.

——–******——–

शत्रु बनविण्यासाठी भांडण
करण्याची गरज नाही. फक्त
एकदा स्वतःच्या हक्कांबद्दल
बोलून बघा. स्वतःची चांगली
प्रगती करा. बरेच शत्रू आपल्या
आसपासच सापडतील.

——–******——–

तुमच्या जीवनात जर कधी तुमच्या
नावाच्या अफवा उठल्या तर त्या
अफवामुळे दुःखी होऊ नका. कारण
अफवांचा धूर तिथूनच उठतो जिथे
तुमच्या नावाची आग लागलेली असते.

——–******——–

वाघ जखमी झाला तरी तो
जीवनाला कंटाळत नाही.
तो थांबतो… वेळ जाऊ देतो…
आणि पुन्हा बाहेर पडतो…..
घेऊन पुन्हा तोच दरारा…..
तीच दहशत…..

——–******——–

पराभवाने माणूस संपत नाही
तो संपतो प्रयत्न करण्याचे
सोडण्याने म्हणून प्रयत्न करत
रहा…. यश तुमचेच असेल.

——–******——–

आपण किती जणांना ओळखतो
यापेक्षा ज्यांना ओळखतो त्यांना
का ओळखतो याचा विचार केला
तर आयुष्य आणखी सुखकर
होईल एवढे मात्र नक्की.

——–******——–

कमी वयात स्वतःचे वेगळे अस्तित्व
स्वतःच्याच मनगटावर स्थापन
करायचे म्हटल्यावर समर्थन….
विरोध….. चर्चा…. आणि विशेष म्हणजे
बदनामी…. या सगळ्यातून जावेच लागते.

——–******——–

दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा
आहे जिथे तुमची क्षमता आणि
आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते.

——–******——–

यशाच्या मुख्य आधार
सकारात्मक विचार आणि
सतत प्रयत्न करा.

——–******——–

जगात आठ अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत. त्यातील मूठभर
माणसांची तुमच्या विषयाची
मते वाईट असल्याने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का….?

——–******——–

स्वतः घेतलेले अनुभव उगीच
इतरांना सांगू नये इतरांना
एकतर ते खोटे वाटतात किंवा
आपण खोटे आहोत असे वाटायला
लागते ज्याने त्याने स्वतःच्या
मालकीचे अनुभव घ्यावे.

——–******——–

स्वतःचा बचाव करण्याचे
सर्वात प्रभावी साधन म्हणजे
समोरच्यावर टीका करणे.

——–******——–

होकार नाकारायला आणि
नकार स्वीकारायला सिंहाचे
काळीज लागते

——–******——–

अगदी सरळ मार्गी असणे हेही
एक प्रकारचे पापच आहे
हे पाप कालांतराने मनुष्याच्या
दुर्बलतेचे कारण बनते

——–******——–

तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची
वाटत असेल तर चारित्र्यवान
माणसांच्या सहवासात राहा वाईट
माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा
एकटे राहणे कधीच चांगले

——–******——–

जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही
विविध रंगांनी नटलेली ही दुनिया
बघत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला
खूप छोटे वाटते आणि आपले विचार
पण तितकेच छोटे राहतात यामुळे
छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्यात
तणाव निर्माण करतात.

——–******——–

प्रयत्न करत रहा यशस्वी झालात
तर घरचे खुश होतील आणि नाही
झालात तर गावचे खुश होतील.

——–******——–

ऐपत नाही पत असली
तरच जग कौतुक करते.

——–******——–

ज्या व्यक्तीजवळ ताकद नसतानाही
तो मनातून हार मानत नसेल तर
त्याला जगातील कोणतीच ताकद
हरवू शकत नाही.

——–******——–

दिलेले वचन जर पूर्ण करता येत नसेल
तर वचन कुणाला देतही जाऊ नका
तुमचे तर फक्त वचन तुटते समोरच्याचे
मन आणि विश्वास दोन्ही तुटून जातो.

——–******——–

मनुष्य कितीही गोरा असला
तरी त्याची सावली मात्र
काळीच असते. मी श्रेष्ठ आहे
हा आत्मविश्वास आहे पण फक्त
मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे.

——–******——–

एकांतात बसून रडणे हे मृत्यूपेक्षा
काही कमी नाही कारण तिथे प्रश्न
आपलेच असतात आणि उत्तरेही
आपलीच असतात.

——–******——–

दुःखाची एक खासियत आहे
ते सहन करणाऱ्यावरच जास्त
मेहरबान असते.

——–******——–

गर्दीमध्ये कितीही हसा कितीही
गप्पा मारा तरीही जी व्यक्ती
आपल्या मनामध्ये असते तीच
आपल्याला एकांतात आठवते.

——–******——–

कधीतरी स्वतःशी थोडे
प्रामाणिक राहा जे तुम्हाला
दुःख देतात त्यांना
कायमचे विसरून टाका.

——–******——–

तुमच्या सुखासाठी कोणाकडे
हात जोडू नका तुमचा वेळ
फुकट वाया जाईल.

——–******——–

छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन
तेच लोक घेतात जे प्रामाणिक
असतात. बेईमान लोकांना तर
काहीच फरक पडत नाही….
कारण ते बेशरम असतात.

——–******——–

माणसाला खाली आणणारा
गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही
अनेक विषयांची कारणीभूत
बाब म्हणजे माणसाचा स्वभाव
माणूस जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा
तो यशाच्या किती जवळ होता याची
त्याला अजिबात कल्पना नसते.

——–******——–

जे खरे आहे ते खरे आणि
जे खोटे आहे ते खोटे मी
नेहमी बोलतो त्यामुळेच
मित्र कमी आणि शत्रू
जास्त आहेत मला….

——–******——–

माणूस बोलत नाही तर त्याची
वेळ बोलत असते. जेव्हा माणसाची
वेळ नसते तेव्हा तो लाख बोलू देत
पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत
नाही. त्याचे कोणी ऐकतही नाही.

——–******——–

कोणताही विचार न करता
घाईघाईने ठेवलेला विश्वास
आणि कोणतीही मेहनत न
करता ठेवलेल्या अपेक्षा…
आशा…. माणसाला नेहमीच
धोका देतात.

——–******——–

खिशाचे वजन वाढवता वाढवता
जर नात्यांचे वजन कमी झाले
तर समजून घ्या की व्यवहार
तोट्याच्या आहे. कुटुंबाचे प्रेम आणि
मित्रांची सोबत ही “संपत्ती” प्रतिष्ठेपेक्षा
पण खूप मोठी असते.

——–******——–

#सुविचार | मराठी प्रेरणादायक विचार |
जीवनात जर कधी तुमच्या नावाच्या
अफवा उठल्या | marathi suvichar

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here