आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…? |
सुंदर विचार | छान विचार मराठी
आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?
एकदा एकाभौतिकशात्राच्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थीयांना
प्रश्न विचारला….
तुम्ही जे पण वाहन चालविता… सायकल, मोटारसायकल किंवा
कारयामध्ये ब्रेक्स का लावलेले असतात…?
प्रश्न विचारला….
तुम्ही जे पण वाहन चालविता… सायकल, मोटारसायकल किंवा
कारयामध्ये ब्रेक्स का लावलेले असतात…?
या प्रश्नावर विद्यार्थ्यांन कडून खूप वेगवेगळी उत्तरेआलीत..
जसे… वाहन थांबण्यासाठी
वाहनाचा वेग कमी करण्यासाठी
होणारे अपघात टाळण्यासाठी
परंतू सर्वात चांगले उत्तर होते…
आपल्याला त्या वाहनाने खूपजास्त वेगाने जाता येण्यासाठी…!
आता असे कसे…? थोडा विचार करा.
तुमच्या वाहनामध्येजर ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त
किती वेगाने आपला वाहन चालवाल…?
आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?
तुमच्या वाहनाला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने वाहन
चालवण्याचे साहस करू शकता… हिंमत करू शकता…
तुम्हाला जिथेही जायचे असेल तिथे पोहोचू शकता…
याच प्रमाणे तुम्हाला आयुष्यातही आई–वडील, सासु–सासरे, कुटुंब
इत्यादी रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला नेहमी टोकत असतात…
वेळेवर अडवतात… काही शंका–कुशंका उभ्या करतात… नेहमी तुमच्या
रस्त्यात नेहमी अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला
खूप राग आणतात.
परंतु लक्षात ठेवा… आयुष्यात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच
तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात.
जर असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भटकले असता.
अपघातात किंवा कोणत्यातरी संकटात सापडला असता.
म्हणूनच आपल्या आयुष्यात कधी-कधीयेणाऱ्या अशा ब्रेक्सची
जाण ठेवा.
मित्रांनो आता कळले…. आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?
मन ओळखणारयांपेक्षा…
मनाला जपणारी माणसे हवीत.
कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात…
तर जपणारी ही आयुष्यभरासाठी असतात…!