Sunder Vichar | जीवन हे एका दीर्घ पश्र्चात्तापाशिवाय दुसरे काय असते…?
पश्चाताप – सुंदर विचार
लहानपणी… फक्त एका सामान्य अशा बॅटबॉल साठी…
आपण आपल्या जिवलग मित्राबरोबर भांडण केल्याचा
पश्चात्ताप आपल्याला… आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी होतो….!
एका मुलीच्या मागे लागून… आपण आपल्या शिक्षणाची
बहुमोल… अशी वर्षे…. वाया घालवल्याचा पश्चात्ताप
आपल्याला आपल्या वयाच्या… पंचविसाव्या वर्षी होतो…!
Sunder Vichar
आपणास आवडलेल्या एखाद्या मुलीसमोर….
आपण साधे आपले मन मोकळेही नाही करू शकलो…
याचा पश्चाताप आपल्याला… आपल्या वयाच्या तिसाव्या
वर्षी होतो…!
आपल्या बायकोने लग्नानंतर…. आपल्यावर भरभरून
केलेल्या….. उत्कट प्रेमाची पावती ना दिल्याचा पश्चात्ताप…
आपल्याला आपल्या वयाच्या चाळीसव्या वर्षी नक्की होतोच….!
पैशाची गुंतवणूक योग्यवेळीच करून…. आपली आर्थिक सुरक्षा…
निश्चित ना केल्याचा पश्चात्ताप आपल्याला आपल्या वयाच्या
पन्नासाव्या वर्षी होतो…!
Sunder Vichar | जीवन हे एका पश्र्चात्तापाशिवाय काय असते…?
कसलाही व्यायाम वगैरे न करता शरीराची आणि आरोग्याकडे
करून घेतल्याचा पश्चाताप होण्याकरिता…
वयाचे साठावे वर्ष उजाडावे लागते…!
आपण आपल्या जीवनात काहीही ना करता….
पूर्ण आयुष्य व्यर्थ थांबल्याचा पश्चाताप…..
जीवनाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी होतो…! परंतु त्यावेळी
फक्त…. वरून आपले बोलावणे येण्याची वाट पाहण्याशिवाय…..
हातात आपल्या काहीही उरलेले नसते…! आणि नेमक्या
अशाच वेळी… विल्यम शेक्सपियरने म्हटलेले वाक्य आठवते…
आणि आपल्याला ते शंभर टक्के पटते हि… तरी सुद्धा…
LIFE IS A STORY TOLD BY AN IDIOT
जीवन म्हणजे काय…? तर एका मुर्खाने सांगितलेली गोष्ट आहे…!
चला तर मग मिळालेले जीवन भरभरून आणि आनंदाने जगू या…!
जीवन हे एका दीर्घ पश्र्चात्तापाशिवाय दुसरे काय असते…? | Sunder vichar in marathi
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी | VB