Sunder Vichar | दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

0
417
Sunder Vichar | दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

Sunder Vichar |
दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

प्रिय नवरोबा….
तुझा काल अकालीच मृत्यू झाला. जीवनात स्थिरस्थावर होऊन आनंद
उपभोगण्याचे… आपल्या मुलांबरोबर फिरण्याचे…
त्यांच्यासोबत खेळण्याचे… बायको सोबत गप्पागोष्टी… थट्टामस्करी…
करण्याचे तुझे वय…!

परंतु नवरोबा… तू या सुखाला कायमचाच मुकलास रे… तसेच तुझ्या
या अचानक मृत्युमुळे या आनंदाला तुझी मुले देखील पोरकी झाली.
आणि सोबत तुझी बायकोही या सुखाला मुकली रे…

कारण तर काय होते या सगळ्यांचे…? तू या खोट्या आनंदात रममाण
झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच
राहिले नव्हते.

आमचे लग्न झाल्यापासून मी पाहत आहे… तू कायम मित्रांच्या सोबत
दारूच्या पार्ट्या करत रहायचास…

Sunder Vichar |
दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

जीवनात मित्र तर असावेतच, पण आपले कुटुंब सुद्धा आहे…
त्याबद्दल आपली काही जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला
विसरच पडला होता.

या शिवाय दररोज रात्रीला घरीच बाटली घेऊन बसणे होतेच.
याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होईल… याची तुला
काहीही चिंता नव्हतीच.

रोज रात्रीला आठ वाजे नंतर बाबा आपले नाही….
याची जणू मुलांना सवयच लागली होती…!
सोबत तुझी भीतीही वाटत होती.

बायकोवर हात उचलणे… माझ्याशी भांडणे हे तर मुलांसाठी
दररोजचेच झाले होते.

आपली मुले कोणत्या वर्गात शिकत आहेत…
त्यांना काय पाहिजे… काय नाही…
याची तर तुला कधीच चिंता नव्हती…
तुझे मित्र आणि तू… बस्स्….

दारू ही एक औषधी आहे. हृदयविकारापासून दूर ठेवते
वगैरे पेपर मधली माहिती तू मला दाखावायाचास…
परंतु त्याच दारूमुळे वाढलेला आपल्यातलाच दुरावा
तुला कधीच समजलाही नाही आणि कधी तू हे
समजून घेण्याचा प्रयत्न हि केला नाही…!

जर का ही बाटलीच एवढीच आनंद देणारी औषधी आहे…
तर मग हि दारू मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली
असती का…?

Sunder Vichar |
दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

अधूनमधून तुला प्रेमाचे झटके यायचे आणि तू दारू सोडायचे
ठरवायाचास… परंतु पुन्हा मित्रच आडवे यायचे. कुठल्या तरी
आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर
बसायचास… एकदा बसलास… की मग पुन्हा सर्व सुरु.
मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र…?

जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु
तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणे सोडून
बघितले असतेस तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब
झाले असते.

अति दारू सेवनाने तुला आजारपण आले…यात घराची आर्थिक
परिस्थिती अजूनच बिगडली… लिवरची सूज कमी करण्याची
औषधी घेणे… तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे… हे सगळे चालू
झाले.

मी सुद्धा आपल्या कामावरून सुट्टी घेत असे… घरच्या गरजा
पूर्ण होत नव्हत्या… मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात
नव्हती.

तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले.
तू सुधरणार नाही… हे माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा
खर्च मी थांबवला नाही.

दारूबंदी सरकारलाही नको आहे. कारण त्यांचे लक्ष फक्त
मिळणाऱ्या महसूलाकडेच आहे. पण माणसाची काम करण्याची
शक्ती कमी होणे… आजारपण वाढणे… यामुळे होणारे नुकसान
सरकारला दिसत नाही का…? शिवाय नवरा, मुलगा, वडील गमावणे
याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार…?

दारु पिऊन मृत्यू झालेल्या नवऱ्याला बायकोने लिहीलेले पत्र

आता तुझ्या आई वडिलांची सेवा… मुलांचे शिक्षण आणि संस्कार हे
सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच…
पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या एकच प्याला पासून दूर ठेवणे
माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात
दारूचा ग्लास नसेल तरच…

तुझीच प्रिय बायको

अ ब क

विचार करण्यासारखी गोष्ट…

खरच दारू वाईटच असते मग ती कितीही महाग असु द्या…
आनंद साजरा करा पण आपलेच जीवन नष्ट करून नाही.
आपले तर जीवन नष्ट होतेच… परंतु सोबत आपल्या कुटुंबाचे
जीवन आपण नष्ट करतो.

प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या सारख्या
गोष्टींवर खरच विचार करा.

Husband Wife Quotes In Marathi – नवरा बायकोचे अनोखे प्रेम

75+ Best Motivational Quotes In Marathi |प्रेरणादायी सुविचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here