Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

0
604
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

कृतीला शब्दावर
अनुरूप करा…!
शब्दाला कृतीवर
अनुरूप करा…!
विल्यम शेक्सपिअर

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

एक काका बांगड्या विकण्यासाठी नेहमीच गावात येत होते.
ते आजूबाजूच्या गावी फिरत असत… आणि गावोगावी फिरून
बांगड्या विकत असत. त्यांना गावात बांगड्यावाले काका
म्हणत असत.

त्याच्याकडे एक गाढवी होती, तिचा नाव काका ने राणी ठेवले होते…
ते त्या गाढवी च्या पाठीवर आपल्या बांगड्यांचा थैला अशा पद्धतीने
ठेवीत होते की सगळ्यांना रंगीबिरंगी बांगड्या दिसून पडतील.

यामध्ये असलेली छान गोष्ट म्हणजे… काकाचे राणीशी होणारे संभाषण…!

जर का चालतांना समोर दगड दिसला तर… काका म्हणायचे…. राणी बेटी…
समोर दगड आहे… थोडे बाजूने चाल…!

जर कधी गाढवी खूपच हळू चालायला लागली तर काका म्हणायचे…
अग राणी… थोडे घाईत पाय उचल…. गावोगावी माझ्या मुली माझी
वाट पाहत आहेत.

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी
जिभेवरचे शब्द

जर राणी कधी वेगाने चालायला लागली… तर म्हणायचे… काय राणी बेटी…
आज काय हरीण झालीस कि काय…? (हे फारच क्वचित व्हायचे )
जरा सांभाळून पाय टाक. बांगड्या फुटतील ना बेटी…!
काका इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय या गाढवीला समजत
असेल का… याचे सर्वांना आश्चर्यच वाटायचे.

एक दिवस बांगड्या घेत असतांना एका बाईने काकाला गाढवीसी
असे बोलतांना पाहिले आणि विचारले… जे दुसरे लोक गाढव पाळतात…
ते नेहमी हातात काठी ठेवतात…. अधूनमधून गाढवाला मारतात हि…
शिव्या हि देतात…. ओरडतात हे आम्ही पाहिले आहे…!
परंतु गाढवीला राणी बेटी म्हणणारे… इतके गोड बोलणारे तुम्ही
पहिलेच माणूस दिसता काका… असे कसे काय…?

बेटा त्याचे असे आहे… हा माझा व्यवसाय बांगड्या विकण्याचा आहे…
आणि हातात भरून देण्याचा आहे… माझ्या कडून बांगड्या ह्या मुली…
आई..बहिणी… घेतात… जर मी राणीला गाढवी म्हणायला लागलो…
तिला शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडातही तेच शब्द
बसलेले असतील…

जर एकदा कोणताही शब्द आपल्या जिभेवर बसला…
तर अचानकपणे… नकळत….तो शब्द कधी बाहेर येईल
हे काही सांगता येत नाही.

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी
जिभेवरचे शब्द

मग बांगड्या विकतांना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून
बाहेर पडतील. मी चुकूनही असा वाईट शब्द गावातल्या
मुलींशी, सूनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील…?
म्हणून मी माझ्या तोंडावर कधीही चुकीचा शब्द येवूच देत नाही.
मी आपल्या जिभेला वाईट शब्दांची सवय लावूनच देत नाही.

ही गोष्ट केवळ धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी…
मित्रांसाठी… समाजात वावरण्यासाठी… संघटनेमधील
सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी… गोडवा निर्माण
करण्यासाठी अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील
व्यक्तिंमध्ये ममता…. बंधुता प्रस्थापित करण्यासाठी
आवश्यक आहे.

जय श्रीराम

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here